Jemimah Rodrigues On Period Pain Women Struggles : भारतीय महिला क्रिकेट संघाने आयसीसी विश्वचषक 2025 जिंकल्यानंतर संघातील खेळाडूंच्या परिश्रम, संघर्ष आणि जिद्दीच्या अनेक गोष्टी पुढे येत आहेत. याचदरम्यान, भारताची स्टार क्रिकेटपटू जेमिमा रॉड्रिग्ज हिचा एक जुना व्हिडिओ पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. हा व्हिडिओ रणवीर अलाहाबादिया याच्या ‘BeerBiceps’ या पॉडकास्टमधील असून, त्यात जेमिमा महिला क्रिकेटपटूंना मासिक पाळीदरम्यान मैदानावर कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतं, याबाबत अत्यंत प्रामाणिकपणे भाष्य केलं आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, लोक त्यावर चर्चा करत आहेत.
ADVERTISEMENT
मैदानावर मासिक पाळी आल्यास क्रिकेटपटू काय करतात?
जेमीमा म्हणाली, मुलींना मासिक पाळी येते तेव्हा मुलींच्या पोटात फार दुखतं आणि पोटाच्या मागील भागात देखील प्रचंड वेदना होतात. त्यामुळे हे फार टफ असतं. या वेदना प्रत्येकाला वेगळ्या पद्धतीने जाणवतात. यामध्ये जीन्सचा वगैरेही परिणाम होतो. माझ्या आईला मासिक पाळी आल्यानंतर प्रचंड वेदना होतात. मात्र, मला एवढा त्रास होत नाही. मासिक पाळी आल्यानंतर मी माझ्या टीममधील मुलींना पाहिलं आहे. फार वाईट असतं. कधीकधी त्यांना नीट चालताही येत नाही. तुमची सगळी एनर्जी जाते. तुमचे मुड स्विंग होतात. त्या दिवशी काहीही करायचं नाही, अशी इच्छा होते. कधीकधी बेडच्या खाली देखील उतरू वाटत नाही. समजा तुम्ही मैदानावर क्रिकेट खेळत आहात, तुमच्या कपड्यावर डाग पडले तर हा विचार सातत्याने येत असतो. मी हे फार उघडपणे सांगते की, मनात असतं हे लोकांना दिसलं तर लोकं चेष्टा करतील. पाळी आल्यामुळे महिला क्रिकेट संघातील मुलींना खेळण्यास नकार दिला, असं 95 टक्के झालेलं पाहिलं नाही. आम्ही गोळ्या घेतो किंवा वेदनाशामक (पेनकिलर) गोळ्या घेतो. त्यानतंर मैदानात जातो. कारण शेवटी आम्ही टीम इंडियासाठी खेळत असतो.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतकी खेळीनंतर जेमीमा चर्चेत
जेमिमाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य फेरीत 134 चेंडूंमध्ये 127 धावा करत विक्रमी खेळी केली होती. तिच्या या कामगिरीमुळे भारताने विजय मिळवला आणि देशभरात तिच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. तिच्या या अप्रतिम खेळीनंतरच लोक तिच्याबद्दल अधिक जाणून घेऊ लागले, आणि त्याचवेळी तिचा जुना व्हिडिओ पुन्हा समोर आला. दरम्यान, तिच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या खेळीमुळे टीम इंडियाला अंतिम फेरी गाठता आली. त्यामुळे सोशल मीडियावर तिच्याविषयी चर्चा सुरु झाल्या होत्या. कारण त्या सामन्यापूर्वी तिला संघातून बाहेर जावं लागलं होतं.
इतर महत्त्वाच्या बातम्या
बलात्कारामुळे प्रेग्नंट झालेल्या 15 वर्षीय मुलीला गर्भपात करण्यास परवानगी, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
ADVERTISEMENT











