Mumbai Crime: मुंबईतील सरकारी नोकरी करणाऱ्या एका तरुणीसोबत धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. अचानक, तिला वेगवेगळ्या मोबाईल नंबर्सवरून कॉल येण्यास सुरूवात झाली. कॉल उचलल्यानंतर लोक तिच्यासोबत अश्लील बोलायचे. इतकेच नव्हे तर, काहींनी पीडितेला एका रात्रीसाठी रेटसुद्धा विचारला. हे सगळं नेमकं काय चाललंय, याबाबत तरुणीला काहीच समजत नव्हतं. तिने एकेक करुन सगळे नंबर्स ब्लॉक केले पण, तरुणीच्या मोबाईलवर असे कॉल्स, मॅसेजेस आणि अश्लील फोटो येणं थांबतच नव्हतं. अखेर, या सगळ्या प्रकाराला वैतागून पीडितेने पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार दाखल केली. त्यानंतर, तपासादरम्यान धक्कादायक बाब उघडकीस आली.
ADVERTISEMENT
तरुणीचा कॅब चालकासोबत मोठा वाद
खरं तर, काही महिन्यांपूर्वी एकदा पीडितेने दक्षिण मुंबई ते दादर पर्यंत कॅब बुक केली होती. विनय कुमार यादव नावाचा एक तरुण या कॅबचा ड्रायव्हर होता. प्रवासादरम्यान, विनयने त्या तरुणीला एका जागी टोलचे पैसे भरण्यास सांगितलं, मात्र पीडितेने यासाठी नकार दिला. त्या कारणावरून, पीडिता आणि कॅब ड्रायव्हरमध्ये मोठा वाद झाला. अखेर, कॅब चालकानेच त्या टोलचे पैसे भरले आणि त्या ठिकाणाहून ते निघून गेले. त्यानंतर तरुणी दादरला उतरली आणि कॅब चालकासोबत झालेल्या वादाबद्दल ती विसरून गेली.
मात्र, या वादातून पीडितेसोबत एक भयानक घटना घडले, याची तिला काहीच कल्पना नव्हती. त्या ड्रायव्हरकडे पीडितेचा फोन नंबर होता. तसेच, तिचं नाव आणि तिच्या घराचा पत्ता सुद्धा त्याच्याकडे होता, कारण त्याच ठिकाणाहून त्याने त्या दिवशी पीडितेला ड्रॉप केलं होतं. संबंधित तरुणीचा फोटो सुद्धा त्या कॅब चालकाकडे होता. याच गोष्टींचा फायदा घेत आरोपी ड्रायव्हरने एक भयानक योजना आखली.
हे ही वाचा: तीन मुलांच्या आईचे गावातील तरुणासोबत जुळले सूत! प्रियकरासोबत मिळून पतीच्या हत्येचं प्लॅनिंग अन् शेतात बोलवून...
पीडितेच्या नावाने बनावट इंस्टाग्राम अकाउंट...
आरोपी विनयने तरुणीच्या नावाने एक बनावट इंस्टाग्राम अकाउंट तयार केलं. त्यासाठी, त्याने पीडितेचा फोटो, नाव आणि पत्ता या माहितीचा वापर केला. या इंस्टाग्राम अकाउंटवर तरुणी कॉल गर्ल असल्याचं आरोपीने सांगितलं. इतकेच नव्हे तर, तो त्या अकाउंटवर घाणेरडे कंटेंट टाकू लागला. त्यात, पीडितेचा नंबर टाकून "मी कॉल गर्ल आहे, माझ्यासाठी संपर्क साधण्यासाठी या नंबरवर कॉल करा." असं त्याने लिहिलं. त्यानंतर, पीडित तरुणीला अश्लील कॉल येण्यास सुरूवात झाली.
अश्लील कॉल येण्यास सुरूवात
पोलिसांच्या तपासातून आरोपी विनय कुमार मूळचा झारखंडचा रहिवासी असून तो मुंबईतील एका खाजगी ट्रॅव्हल्स कंपनीमध्ये कॅब ड्रायव्हर म्हणून कार्यरत असल्याचं समोर आलं. घटनेनंतर, आरोपीने स्वत: तरुणीला सतत कॉल करून तिला फोनवर शिवीगाळ केली. त्यानंतर, तरुणीने त्याचा नंबर ब्लॉक केला आणि काही वेळानंतर, तिला बऱ्याच अनोळखी नंबरवरून कॉल येण्यास सुरूवात झाली. पीडितेने याचा शोध घेतल्यानंतर, तिचा फोटो वापरून एका बनावट इंस्टाग्राम अकाउंट तयार केल्याची तिला माहिती मिळाली.
हे ही वाचा: मोठी बातमी : रुपाली चाकणकरांवर टीका करणं रुपाली ठोंबरे पाटलांना महागात पडलं, राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा निर्णय
यानंतर, पीडितेने दादर पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार नोंदवली. पीडितेच्या तक्रारीच्या आधारे, आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच, माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी विनय कुमार यादवच्या मोबाईल नंबरवरून त्याचं मूळ ठिकाण शोधलं आणि त्याला हजर राहण्याची नोटीस पाठवली.
ADVERTISEMENT











