Kaali Poster : ‘काली’मातेला सिगारेट ओढताना दाखवल्याचा वाद नेमका आहे तरी काय?

मुंबई तक

• 01:45 AM • 06 Jul 2022

काली नावाच्या एका डॉक्युमेंट्रीचं पोस्टर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं आहे. एवढंच नाही तर या पोस्टरवरून वादालाही तोंडही फुटलं आहे. तमिळ फिल्ममेकर लीना मणिमेकलईची ही डॉक्युमेंट्री आहे. तिने या डॉक्युमेंट्रीचं पोस्टर ट्विटरवर पोस्ट केलं आणि वादाला तोंड फुटलं. नेमकं प्रकरण काय आहे आपण जाणून घेणार आहोत. का निर्माण झाला आहे वाद? लीना मणिमेकलई यांनी जे […]

Mumbaitak
follow google news

काली नावाच्या एका डॉक्युमेंट्रीचं पोस्टर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं आहे. एवढंच नाही तर या पोस्टरवरून वादालाही तोंडही फुटलं आहे. तमिळ फिल्ममेकर लीना मणिमेकलईची ही डॉक्युमेंट्री आहे. तिने या डॉक्युमेंट्रीचं पोस्टर ट्विटरवर पोस्ट केलं आणि वादाला तोंड फुटलं. नेमकं प्रकरण काय आहे आपण जाणून घेणार आहोत.

हे वाचलं का?

का निर्माण झाला आहे वाद?

लीना मणिमेकलई यांनी जे पोस्टर ट्विट केलं आहे ते पोस्टर काली या डॉक्युमेंट्रीचं आहे. या पोस्टरवर कालीमातेला सिगारेट ओढताना दाखवण्यात आलं आहे. एवढंच नाही तर कालीमातेच्या हाती LGBTQ समुदायाचा झेंडाही हातात असल्याचं दाखवण्यात आलं आहे. या पोस्टवरवरून प्रचंड वाद निर्माण झाला आहे. हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. हे प्रकरण आता पोलिसात गेलं आहे.

नव्याने समोर आलेल्या माहितीनुसार या प्रकरणात दिल्ली पोलिसांच्या IFSO युनिटने काली या फिल्मच्या वादग्रस्त पोस्टवर कारवाई करण्याचं ठरवलं आहे. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात FIR दाखल केली आहे. दिल्ली पोलिसांना काली या डॉक्युमेंट्रीच्या पोस्टरवर वाद निर्माण झाल्यानंतर अनेक तक्रारी आल्या होत्या त्यानंतर ही कारवाई पोलिसांनी केली आहे.

यानंतर IFSO युनिटने या काली या डॉक्युटमेंट्रीच्या दिग्दर्शिका लीना मणिमेलकाईच्या विरोधात आयपीसी १५३ ए अन्वये धार्मिक भावना भडकवल्या प्रकरणी तसंच त्या धार्मिक भावनांना दुखावल्याप्रकरणी २९५ अ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी आता पोलीस पुढील तपसा करत आहेत. दिग्दर्शक लीना मणिमेलकाई यांना याप्रकरणी ई मेल पाठवून चौकशीसाठीही बोलवलं जाऊ शकतं. याच प्रकरणात लीना मणिमेकलाई यांच्यावर उत्तर प्रदेशातही गुन्हा दाखल झाला आहे.

२ जुलैला लीना मणिमेकलाई यांनी काली या त्यांच्या डॉक्युमेंट्रीचं पोस्टर शेअर केलं होतं. या पोस्टरवर कालीमातेला सिगारेट ओढताना दाखवलं गेलं आहे. तसंच एलजीबीटी समुदायाचा झेंडा दाखवण्यात आला आहे. हे पोस्टर जेव्हा ट्विटरवर पोस्ट करण्यात आलं तेव्हा लीना मणिमेकलाई यांना ट्रोल करण्यास सुरूवात आली आहे. काहींनी लीना मणिमेकलाई यांना अटक केली जावी ही मागणीही केली आहे.

लीना मणिमेकलाई यांचं काय म्हणणं आहे?

या पोस्टरवर जेव्हा वाद निर्माण झाला तेव्हा लीना मणिमेकलाई यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी असं म्हटलं आहे की माझी डॉक्युमेंट्री समाजातल्या विविध घटनांवर भाष्य करते. एका संध्याकाळी काली माता प्रकट होते तेव्हा ती टोरांटोच्या रस्त्यांवर फिरत असते. हा पाहून अरेस्ट लीना मणिमेकलाई हा हॅशटॅग पोस्ट करू नका त्याऐवजी हॅशटॅग लव्ह यू लीना मणिमेकलाई असं लिहा. ही प्रतिक्रिया लीना मणिमेकलाई यांनी दिली आहे. लीना यांनी ही प्रतिक्रिया देऊनही सोशल मीडियावर नाराजी कमी झालेली नाही. लोकांनी तिला ट्रोल करणं सोडलेलं नाही. तसंच आता हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहचलं आहे.

काली या पोस्टरचा वाद संसदेतही पोहचला. त्या दरम्यान तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांची प्रतिक्रियाही समोर आली आहे. त्या इंडिया टुडेच्या कॉनक्लेव्हमध्ये हे म्हणाल्या होत्या की “काली मातेची विविध रूपं आहेत. काली माता मांस आणि मद्य स्वीकार करणारी देवी म्हणूनही मला ठाऊक आहे. लोकांची मतं वेगवेगळी असू शकतात.” असं म्हटलं आहे. मात्र तृणमूल काँग्रेसने महुआ मोईत्रा यांचं व्यक्तिगत मत आहे पक्षाचा त्याच्याशी काही संबंध नाही असं त्यांनी म्हटलं आहे.

महुआ मोइत्रा यांचं हे वक्तव्य आल्यानंतर भाजपचे सुवेंदू अधिकारी यांनीही त्यांच्यावर निशाणा साधला आहे. हिंदू धर्माचा अपमान करणं हे तृणमूल काँग्रेसकडून कायमच केलं जातं. ममता बॅनर्जी या महुआ मोईत्रांच्या विरोधात कारवाई करतील याची आम्ही वाट पाहतो आहोत असंही त्यांनी म्हटलं आहे. हा सगळा वाद समोर आल्यानंतर महुआ मोइत्रा यांनी ट्विट केलं आहे त्यांनी हे म्हटलं आहे की मी कुठल्याही पोस्टरचं समर्थन केलेलं नाही. मी धूम्रपान या शब्दाचा उल्लेख केलेला नाही. जे मला नावं ठेवत आहेत त्यांनी तारापीठ या ठिकाणी जावं तिथे नैवैद्य म्हणून काय पदार्थ असतो एकदा बघावा असंही त्यांनी सुचवलं आहे.

काली या डॉक्युमेंट्रीच्या पोस्टरवरून निर्माण झालेला वाद ट्विटरवरून थेट संसदेतही पोहचला आहे. तसंच पोलिसातही गेला आहे. हे प्रकरण आता किती पुढे जाणार हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp