महाराष्ट्रातून गुजरातला नेलेला सेमीकंडक्टर चिप निर्मिती प्रोजेक्ट काय? तो का महत्त्वाचा आहे?

मुंबई तक

• 09:31 AM • 13 Sep 2022

महाराष्ट्रात येऊ घातलेला १.५४ लाख कोटी रुपयांचा सेमीकंडक्टर प्रोजेक्ट आता गुजरातमध्ये होणार आहे. सेमीकंडक्टर निर्मितीचा प्रोजेक्ट महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्य सरकारकडून बोलणी सुरू होती. ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात असतानाच आता वेदांता सेमीकंडक्टर प्लांट गुजरातमध्ये उभारणार असल्याचं निश्चित झालंय. त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रातील एक मोठा प्रोजेक्ट गुजरातला पळवल्याच्या चर्चेला तोंड फुटलं आहे. महाराष्ट्राऐवजी गुजरातमध्ये प्लांट उभारणार फॉक्सकॉनचा […]

Mumbaitak
follow google news

महाराष्ट्रात येऊ घातलेला १.५४ लाख कोटी रुपयांचा सेमीकंडक्टर प्रोजेक्ट आता गुजरातमध्ये होणार आहे. सेमीकंडक्टर निर्मितीचा प्रोजेक्ट महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्य सरकारकडून बोलणी सुरू होती. ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात असतानाच आता वेदांता सेमीकंडक्टर प्लांट गुजरातमध्ये उभारणार असल्याचं निश्चित झालंय. त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रातील एक मोठा प्रोजेक्ट गुजरातला पळवल्याच्या चर्चेला तोंड फुटलं आहे.

हे वाचलं का?

महाराष्ट्राऐवजी गुजरातमध्ये प्लांट उभारणार

फॉक्सकॉनचा सेमीकंडक्टर निर्मिती प्रोजेक्टची उभारणी वेदांता समूह करणार आहे. याबद्दलची माहिती वेदांता समुहाचे चेअरमन अनिल अगरवाल यांनी ट्विट करून दिली. फॉक्सकॉनचा सेमीकंडक्टर प्लांट गुजरातमध्ये उभारणार असून यामुळे आत्मनिर्भर सिलीकॉन व्हॅलीचं स्वप्न साकारण्यास मदत होणार आहे. भारताची सिलीकॉन व्हॅली आता एक पाऊल दूर आहे, असं अनिल अगरवाल यांनी म्हटलं आहे.

सेमीकंडक्टर चिप काय असते?

सेमीकंडक्टर एक विशेष प्रकारची सामग्री आहे. यात विजेचे चांगले कंडक्टर आणि खराब कंडक्टर असे गुणधर्म आहेत. ते विजेचा प्रवाह नियंत्रित करण्याचे काम करतात. ते सिलिकॉनपासून बनवले जातात. त्यात काही विशेष प्रकारचे डोपिंग जोडले जाते, ज्यामुळे कंडक्टरचे गुणधर्म बदलता येतात. यामुळे त्याच्या इष्ट गुणधर्मांचा विकास होतो आणि त्याच सामग्रीचा वापर इलेक्ट्रिकल सर्किट चिप्स करण्यासाठी केला जातो.

सेमीकंडक्टर चिप भारतात बनत नाहीत

भारतात सध्या कोणतीही कंपनी सेमीकंडक्टर चिप्स बनवत नाही. या बाबतीत देश पूर्णपणे आयातीवर अवलंबून आहे. बहुतेक चिप्स मलेशियाहुन भारतीय कार निर्मात्यांना पुरवल्या जातात, जेथे कोविडमुळे चिपचे उत्पादन सध्या विस्कळीत झाले आहे.

सेमीकंडक्टर चिप का आवश्यक आहे?

जगात तयार होनारी सर्व वाहने पॉवर स्टीयरिंग, ब्रेक सेन्सर, मनोरंजन यंत्रणा, एअरबॅग आणि पार्किंग कॅमेरामध्ये सेमीकंडक्टर चिप्स वापरली जाते. जवळपास एका वाहनात 1,000 पेक्षा जास्त सेमीकंडक्टर चिप्स बसवल्या जातात. हे चिप कॉम्पुटर प्रोग्रामिंगवर आधारित असतात आणि गाडीतील डेटाला देखील प्रोसेस करतात. सेमी चिपविना आधुनिक गाड्यांची निर्मिती असंभव आहे.

चिपच्या कमतरतेमुळे आयफोनच्या उत्पादनात घट

सेमीकंडक्टर चिप्स फक्त वाहनांमध्येच वापरल्या जात नाहीत, तर त्या इंटरनेटशी जोडलेल्या प्रत्येक गोष्टीत वापरल्या जातात. उदाहरणार्थ मोबाइल फोन, लॅपटॉप, टीव्ही आणि इतर घरगुती उपकरणे. त्यामुळे त्यांच्या उत्पादनालाही या टंचाईचा फटका बसला आहे. Apple या वर्षी आयफोन 13 च्या 90 दशलक्ष युनिट्सचे उत्पादन करणार होते परंतु चिपच्या कमतरतेमुळे केवळ 80 दशलक्ष युनिट्सचे उत्पादन झाले आहे.

    follow whatsapp