शिंदे-फडणवीस सरकारचा दुसरा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार?, सुधीर मुनगंटीवार म्हणाले…

मुंबई तक

• 08:51 AM • 02 Sep 2022

चंद्रपूर: शिंदे-फडणवीस सरकारचा पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार १५ ऑगस्टच्या पूर्वसंधेला पार पडला होता. परंतु जिल्ह्याला अजून पालकमंत्री मिळालेले नाहीत. १५ ऑगस्टला सरकारने ठरवून दिलेल्या मंत्र्यांनी त्यांच्या जिल्ह्यात जाऊन झेंडावंदन केले होते. परंतू विरोधक सतत प्रश्न विचारत आहेत की दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार आणि जिल्ह्यांना पूर्णवेळ पालकमंत्री कधी मिळतील. आता याचं उत्तर राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य […]

Mumbaitak
follow google news

चंद्रपूर: शिंदे-फडणवीस सरकारचा पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार १५ ऑगस्टच्या पूर्वसंधेला पार पडला होता. परंतु जिल्ह्याला अजून पालकमंत्री मिळालेले नाहीत. १५ ऑगस्टला सरकारने ठरवून दिलेल्या मंत्र्यांनी त्यांच्या जिल्ह्यात जाऊन झेंडावंदन केले होते. परंतू विरोधक सतत प्रश्न विचारत आहेत की दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार आणि जिल्ह्यांना पूर्णवेळ पालकमंत्री कधी मिळतील. आता याचं उत्तर राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलं आहे. आता मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या टप्प्यातील विस्तारात कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

हे वाचलं का?

सुधीर मुनगंटीवार काय म्हणाले?

”अनंत चतुर्थीच्या अगोदर पालकमंत्र्यांची घोषणा होईल आणि दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार येत्या दिवळीपर्यंत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करु नका, आता आम्ही २० जण आहोत आगामी काळात अजून आमच्या काही सहकाऱ्यांना राज्याची सेवा करण्याची संधी मिळेल.” असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत.

पुढे सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ”राज्यामध्ये ४३ मंत्री असतात. सध्या राज्याच्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासह शिवसेना-भाजपाचे मिळून प्रत्येकी ९-९ असे २० मंत्री सध्या मंत्रिमंडळात आहेत. आता उर्वरित २३ मंत्र्यांचाही लवकरच मंत्रिमंडळात समावेश होईल. महाराष्ट्रात सध्या २८८ मतदारसंघ आहेत. ४३ मंत्र्यांपैकी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासह २० मंत्री सध्या राज्याचा कारभार पाहत आहेत. लवकरत इतर २३ मंत्र्यांचा विस्तार केला जाईल.”

पहिल्या मंत्रिमंडळ विस्ताराला लागला होता महिना

राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर तब्बल महिन्याहून अधिक काळ राज्याला मंत्रिमंडळ नव्हते. दोघेच जण सरकार चालवत आहेत अशी अनेकदा टीका देखील त्यांच्यावर झाली होती. त्यानंतर महिन्यानंतर भाजपच्या ९ आणि शिंदे गटाच्या ९ मंत्र्यांनी शपथ घेतली.

पहिल्या टप्प्यात कोण झाले मंत्री?

शिंदे गट: गुलाबराव पाटील, दादा भुसे, दीपक केसरकर, संदिपान भूमरे, उदय सामंत, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, शंभूराज देसाई, संजय राठोड.

भाजप: राधाकृष्ण विखे पाटील, गिरीष महाजन, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, सुरेश खाडे, डॉ. विजयकुमार गावित, रवींद्र चव्हाण, अतुल सावे, मंगल प्रभात लोढा.

    follow whatsapp