मुख्यमंत्री शिवसेनेचे असते तर…, माईक ओढण्यावरुन संजय राऊतांचा खोचक टोला

मुबई: विधानसभेचे विशेष अधिवेशन काल संपले. अधिवेशनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत सर्वात चर्चेचा विषय ठरला तो एकनाथ शिंदेंसमोरचा माईक घेऊन फडणवीस बोलले यावरुन सर्वच जण टिका करत आहेत. शिवसेना नेते संजय राऊत यांनी यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरती आणि भाजपवरती निशाणा साधला […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 01:03 PM • 05 Jul 2022

follow google news

मुबई: विधानसभेचे विशेष अधिवेशन काल संपले. अधिवेशनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत सर्वात चर्चेचा विषय ठरला तो एकनाथ शिंदेंसमोरचा माईक घेऊन फडणवीस बोलले यावरुन सर्वच जण टिका करत आहेत. शिवसेना नेते संजय राऊत यांनी यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरती आणि भाजपवरती निशाणा साधला आहे.

हे वाचलं का?

मुख्यमंत्र्यांचा रिमोट कंट्रोल कोणाकडे आहे, हे स्पष्ट दिसत आहे. सरकारवर कोणाचा अंकुश आहे हे स्पष्ट दिसत आहे. सरकारचा रिमोट कंट्रोल भाजपकडे आहे. ते शिवसेनेचे मुख्यमंत्री असते तर कोणीही माईक हिसकावून घेऊ शकले नसते. आज त्यांनी माईक हिसकावला आणि उद्या ते मुख्यमंत्री पदही हिसकावून घेतील. आपल्या मुख्यमंत्र्यांकडे माईकही नाही हे यावरून स्पष्ट होते असे खोचक विधान संजय राऊतांनी केले आहे.

पुढे संजय राऊत म्हणाले ”राजीनाम्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पक्ष मजबूत करण्यात व्यस्त आहेत, त्यांनी अनेक बैठका घेतल्या आणि भविष्यातही अनेक बैठका घेणार आहेत. पक्ष मजबूत करण्यासाठी ते राज्यभर फिरणार आहेत. पक्ष पुन्हा शिखरावर पोहोचेल”.

संजय राऊत (Sanjay Raut) कधीच निवडणूक लढले नाहीत, आमच्या मतांवर निवडून आले असा आरोप बंडखोर आमदारांनी केला होता. त्याला उत्तर देताना राऊत म्हणाले ”बंडखोर आमदार कसे निवडून आले. ते निवडून आले कारण त्यांना शिवसेनेने तिकीट दिले होते आणि ते सेनेचे आमदार आहेत हे त्यांनी विसरू नये”.

दरम्यान तब्बल १५ दिवसांनी बंडखोर आमदार आपल्या मतदार संघात गेले आहेत. मतदार संघात पोहोचताच सर्वांनी संजय राऊतांवर निशाणा साधायला सुरुवात केली आहे. बुलढाण्याचे संजय गायकवाड यांनी संजय राऊतांवर गंभीर आरोप करत टिका केली आहे. राष्ट्रवादीला जवळ करुन संजय राऊत शिवसेना संपवायला निघाले होते. त्यामुळे आम्ही व्यतिथ होतो, म्हणून आम्ही हा निर्णय घेतला असे गायकवाड म्हणाले आहेत.

    follow whatsapp