रामदेव बाबांचा वादग्रस्त विधानाबद्दल माफीनामा; महिला आयोगाला म्हणाले…

मुंबई तक

• 05:19 AM • 28 Nov 2022

योगगुरु बाबा रामदेव यांनी अखेर महिलांबद्दल केलेल्या अक्षेपार्ह वक्तव्याबद्दल माफी मागीतली आहे. राज्य महिला आयोगाचे अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी याबाबत ट्वीट करुण माहिती दिली आहे. त्या म्हणाल्या बाबा रामदेव उर्फ राम किसन यादव यांनी ठाणे येथील एका सार्वजानिक कार्यक्रमात महिलांसंबंधी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन विधान केले होते. या वक्तव्याची राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेत […]

Mumbaitak
follow google news

योगगुरु बाबा रामदेव यांनी अखेर महिलांबद्दल केलेल्या अक्षेपार्ह वक्तव्याबद्दल माफी मागीतली आहे. राज्य महिला आयोगाचे अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी याबाबत ट्वीट करुण माहिती दिली आहे. त्या म्हणाल्या बाबा रामदेव उर्फ राम किसन यादव यांनी ठाणे येथील एका सार्वजानिक कार्यक्रमात महिलांसंबंधी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन विधान केले होते. या वक्तव्याची राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेत बाबा रामदेव उर्फ राम किसन यादव यांना याबाबतीत आपला खुलासा दोन दिवसाच्या आत सादर करण्यासाठी नोटिस पाठवली होती, याबाबतीत त्यांचा खुलासा आयोग कार्यालयास प्राप्त झाला असून केलेल्या वक्तव्याबाबत त्यांनी माफी मागितली आहे, असं रूपाली चाकणकर यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. यासह त्यांनी बाबा रामदेव यांनी दिलेलं

हे वाचलं का?

बाबा रामदेव यांनी नेमकं काय म्हणलंय उत्तरात ?

राज्य महिला आयोगाने पाठवलेल्या नोटीसला उत्तर देताना बाबा रामदेव म्हणाले की, राज्य महिला आयोग अधिनियम 1993 नुसार आपण कोणताही गुन्हा केलेला नाही. आपण नेहमी विश्वस्तरावर महिला सशक्तीकरणासाठी प्रयत्न केले आहे. कारण महिलांना समाजात समानतेचा दर्जा मिळावा. आपण आत्तापर्यंत भारत सरकारच्या ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’सारख्या योजनांना प्रोत्साहन मिळावा म्हणून विविध संघटनांसोबत मिळून काम केलं आहे, असं रामदेव बाबा आपल्या उत्तरात म्हणाले.

पुढे बोलताना बाबा रामदेव म्हणाले, माझा कोणत्याही महिलेचा आपमान करण्याचा हेतू नव्हता. ठाणे येथील कार्यक्रम हा महिला सशक्तीकरणाचा होता. कार्यक्रमात मी बोलल्या काही सेकंदाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर अधोरेखित केला गेला. माझ्या म्हणण्याचा गैरअर्थ काढण्यात आला. मी माझ्या संपूर्ण भाषणात मातृशक्तीचा गौरव केला. मी कपड्यांबद्दल केलेल्या विधानाचं अर्थ माझ्यासारख्या साध्या कपड्यात असं होतं.तरी देखील माझ्या त्या विधानामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मला त्याचा खेद आहे. माझ्या बोलण्याने दुखावलेल्या सर्वांची मी मनापासून माफी मागतो, असं बाबा रामदेव म्हणाले.

नेमक काय म्हणाले होते बाबा रामदेव

महिलांसाठी योगासनांचे ड्रेस आणण्यात आले आहे. पतंजली महिला संमेलनात अमृता फडणवीसही आल्या होत्या. यावेळी अमृता फडणवीस यांचं त्यांनी कौतुक केलं. अमृता फडणवीस या कायम प्रसन्न असतात. लहान मुलांप्रमाणे त्यांच्या चेहऱ्यावर हसू असतं. असं हसू मला प्रत्येक महिलेच्या चेहऱ्यावर पाहायचं आहे. यापुढे ते म्हणाले महिला साड्या नेसून चांगल्या दिसतात. त्या सलवार सूटमध्येही चांगल्या दिसतात आणि माझ्या नजरेने पाहिलं तर काही नाही घातलं तरीही चांगल्या दिसतात असं रामदेवबाबांनी म्हटलं आहे.

    follow whatsapp