विषारी पदार्थ खाऊनही वाचला नंतर घेतला गळफास; 24 तासांत तीन वेळा आत्महत्येचा प्रयत्न

टॅक्सी चालवणाऱ्या एका व्यक्तीने 24 तासांत तीन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केल्याची अंचबित करणारी घटना समोर आली आहे. ही घटना मध्य प्रदेशातील बैतूलमध्ये घडली आहे. या व्यक्तीने स्वतःला संपवण्यासाठी दारू, विष प्राशन केलं. त्यातून वाचल्यानंतर गळफास लावून घेतला. बैतुलमधील (मध्य प्रदेश) चिचोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या पाठाखेडा गावात ही घटना घडली आहे. रविंद्र कटारे असं तीन […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 10:00 AM • 13 Nov 2021

follow google news

टॅक्सी चालवणाऱ्या एका व्यक्तीने 24 तासांत तीन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केल्याची अंचबित करणारी घटना समोर आली आहे. ही घटना मध्य प्रदेशातील बैतूलमध्ये घडली आहे. या व्यक्तीने स्वतःला संपवण्यासाठी दारू, विष प्राशन केलं. त्यातून वाचल्यानंतर गळफास लावून घेतला.

हे वाचलं का?

बैतुलमधील (मध्य प्रदेश) चिचोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या पाठाखेडा गावात ही घटना घडली आहे. रविंद्र कटारे असं तीन वेळा आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे. त्याला चिचोली प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला होता. त्यावरून त्याच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

MBBS Student Murder: मूळच्या ठाण्यातील MBBS च्या विद्यार्थ्याची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार रविंद्र कटारे याने आत्महत्या करण्यासाठी बेशुद्ध होईपर्यंत दारु प्राशन केली. मात्र, काही वेळाने तो शुद्धीवर आला. त्यानंतर त्याने पुन्हा विषारी पदार्थ खाल्ला. मात्र, विषारी पदार्थामुळेही त्याचा मृत्यू झाला नाही. इतकं करूनही वाचल्यानंतर रविंद्र कटारेनं घरात गळफास घेऊन स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला.

रविंद्रला वेळीच रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी त्याने खाल्लेला विषारी पदार्थ बाहेर काढला. मात्र, त्याची प्रकृती बिघडली. डॉक्टरांच्या माहितीनुसार रुग्ण उपचारांसाठी अजिबात सहकार्य करत नसून, उपचार करताना अडचणी येत आहेत. रविंद्र कटारेची स्वतःची टॅक्सी असून, शुक्रवारी सकाळी तो घरी आला होता, अशी माहिती समोर आली आहे.

लग्न का करुन देत नाही म्हणून मुलाने केली वडिलांची हत्या

रविंद्रच्या भावाने घटनेबद्दल माहिती दिली. रविंद्रने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती मिळाल्यानंतर मी रुग्णालयात पोहोचलो. रविंद्रचं पत्नीशी वाद झाला असावा, ज्यामुळे त्याने दारु पिऊन आणि विषारी पदार्थ खाल्ला. त्याने कशाचं सेवन केलं, हे कळू शकलं नाही. त्याने घरातच गळफास घेतला होता. वेळीच निदर्शनास आल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

सध्या रविंद्रवर उपचार केले जात आहे. त्याची प्रकृती गंभीर असून, पोलिसांनी असून त्याचा जबाब नोंदवलेला नाही. याप्रकरणाची चौकशी केली जाईल, असं चिचोली पोलीस ठाण्याचे अजय सोनी यांनी सांगितलं.

    follow whatsapp