Shivaji Maharaj Statue : अजित पवार राजकोट किल्ल्यावरील पाहणी दरम्यान का भडकले?

अजित पवारांनी आज राजकोट किल्ल्यावर पाहणी केली. शिवरायांचा पुतळा कोसळला त्या ठिकाणी आढावा घेतला आणि ते संतापले.

मुंबई तक

30 Aug 2024 (अपडेटेड: 01 Sep 2024, 09:28 AM)

follow google news

Shivaji Maharaj Statue :  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज राजकोट किल्ल्यावर पाहणी केली. शिवरायांचा पुतळा कोसळला त्या ठिकाणी जाऊन आढावा घेतला. त्यावेळी अजित पवार चांगलेच संतापले होते. त्यांनी माध्यमांच्या कॅमेऱ्यांना दूर जाण्याची मागणी केली आणि बाजूला व्हा मला बघू द्या असे म्हणाले. त्यांनी 'बोलूच देत नाहीत, ही कुठली पद्धत आहे' असे म्हणत सेक्युरिटीला विनंती करुन माध्यमाच्या कॅमेऱ्यांना दुसरीकडे घेऊन जाण्याच्या सूचना दिल्या.

    follow whatsapp