मुंबई: राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका 15 जानेवारी 2026 रोजी पार पडणार आहे. यातही महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं लक्ष ज्या महापालिकेकडे लागून राहिलं आहे ती आहे मुंबई महापालिका. याच महापालिका निवडणुकीदरम्यान 'ठाकरे ब्रँड' याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. मागील 25 वर्षांपासून मुंबई महापालिकेवर ठाकरेंच्या शिवसेनेची सत्ता होती. मात्र, यावेळी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचं तगडं आव्हान ठाकरेंसमोर आहे. यंदा दोन्ही ठाकरे म्हणजे शिवसेना UBT आणि मनसे हे एकत्र आले आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेवर भगवा फडकविण्यासाठी दोन्ही ठाकरेंची नेमकी रणनीती काय हे मुंबईकरांसमोर मांडण्यासाठी दोन ठाकरे पहिल्यांदाच 'मुंबई Tak च्या महाचावडी'वर आले आहेत.
ADVERTISEMENT
मुंबई महापालिका निवडणूक यंदा सर्वार्थाने प्रचंड चर्चेत आहे. कारण महापालिका निवडणुकीत यंदा पहिल्यांदाच दोन शिवसेना आमने-सामने आहेत. तर दुसरीकडे दोन्ही ठाकरेही एकत्र आले आहेत. त्यामुळे मुंबईच्या निवडणुकीत नेमकं काय होणार याकडे मुंबईकरांचे डोळे लागून राहिले आहेत. दरम्यान, मुंबईची सत्ता मिळविण्यासाठी ठाकरे बंधूंची नेमकी रणनीती काय, त्यांच्या विकासाचं व्हिजन कसं असेल या सगळ्या गोष्टी शिवसेना UBT चे नेते आदित्य ठाकरे आणि मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी 'मुंबई Tak च्या महाचावडी'वर सांगितल्या.
या दोन्ही तरूण ठाकरे बंधूंनी मुंबई Tak च्या टीमसोबत एक्स्क्लुझिव्ह गप्पा मारल्या. शिवाजी पार्कवरील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाजवळ ही महाचावडी पार पडली. जिथे या दोन्ही नेत्यांनी त्यांच्या पक्षाची भूमिका मांडली. मुंबई Tak चे संपादक साहिल जोशी आणि संपूर्ण टीमशी गप्पा मारताना आदित्य ठाकरेंनी शिवसेनेने मागील 25 वर्षात मुंबईकरांसाठी कोणकोणती विकासाची कामं केली हे सांगितलं. तर मराठीच्या मुद्द्यावर मनसेचा नेमका अजेंडा काय असेल याबाबत अमित ठाकरेंनी भूमिका मांडली.
कुठे आणि कधी पाहता येईल आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंची महाचावडी?
शिवसेना UBT नेते आदित्य ठाकरे आणि मनसे नेते अमित ठाकरे यांची महाचावडी ही आपल्याला मुंबई Tak च्या यूट्यूब चॅनलवर पाहता येईल. ही संपूर्ण मुलाखत आपल्याला उद्या (7 जानेवारी 2026) सायंकाळी 5.00 वाजता पाहता येईल.
पाहा आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंच्या महाचावडीचा Super Exclusive प्रोमो
ADVERTISEMENT











