दोन्ही फ्लाइट रेकॉर्डर जळाले, अजितदादांच्या विमान अपघाताबाबत तपास यंत्रणांनी दिली अधिकृत माहिती

Ajit Pawar Baramati Plane Crash Big Update : तपास संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित विमानात दोन स्वतंत्र फ्लाइट रेकॉर्डर बसविण्यात आले होते. अपघाताच्या वेळी हे दोन्ही रेकॉर्डर दीर्घकाळ तीव्र उष्णतेच्या संपर्कात आले. त्यामुळे आगीमुळे त्यांचे नुकसान झाले असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Ajit Pawar Baramati Plane Crash Big Update

Ajit Pawar Baramati Plane Crash Big Update

मुंबई तक

17 Feb 2026 (अपडेटेड: 17 Feb 2026, 02:05 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

दोन्ही फ्लाइट रेकॉर्डर जळाले,

point

अजितदादांच्या विमान अपघाताबाबत तपास यंत्रणांनी दिली अधिकृत माहिती

Ajit Pawar Baramati Plane Crash Big Update ,नवी दिल्ली : महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि दिवंगत नेते अजित पवार यांचं 28 जानेवारी 2026 रोजी झालेल्या बारामती येथील विमान अपघातात निधन झालं होतं. त्यांचा विमान अपघात कशामुळे झाला? याबाबत गेल्या 20 दिवसांपासून तपास सुरु आहे. दरम्यान, याबाबत पहिल्यांदाच तपास यंत्रणांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.  बारामती येथे 28 जानेवारी 2026 रोजी झालेल्या लियरजेट 45 (व्हीटी-एसएसके) विमान अपघाताच्या तपासाबाबत तपास यंत्रणांनी अधिकृत माहिती प्रसिद्ध केली आहे. 

हे वाचलं का?

तपास संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित विमानात दोन स्वतंत्र फ्लाइट रेकॉर्डर बसविण्यात आले होते. अपघाताच्या वेळी हे दोन्ही रेकॉर्डर दीर्घकाळ तीव्र उष्णतेच्या संपर्कात आले. त्यामुळे आगीमुळे त्यांचे नुकसान झाले असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. एल3- कम्युनिकेशन्स कंपनीने तयार केलेला डिजिटल फ्लाइट डेटा रेकॉर्डर विमान अपघात तपास संस्थेच्या प्रयोगशाळेत यशस्वीरीत्या डाउनलोड करण्यात आला आहे. या प्रक्रियेमुळे अपघातासंदर्भातील तांत्रिक माहिती उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

तर हनीवेल कंपनीने तयार केलेल्या कॉकपीट व्हॉइस रेकॉर्डरची सध्या सखोल तांत्रिक तपासणी सुरु आहे. या रेकॉर्डरमधील डेटा पुनर्प्राप्त करण्यासाठी विशेष तांत्रिक सहाय्य आवश्यक असल्याने उत्पादन करणाऱ्या देशाच्या मान्यताप्राप्त प्रतिनिधीकडून मदत मागविण्यात आली आहे. तपास प्रक्रियेत कोणतीही घाई न करता, सर्व तांत्रिक बाबींची पडताळणी करूनच पुढील निष्कर्ष जाहीर केले जातील, असेही संस्थेने नमूद केले आहे.

हेही वाचा : लातूर : पॉलिटेक्निक कॉलेजच्या वसतीगृहासमोर रक्ताचा सडा, विद्यार्थ्याची हत्या; चौघांवर धारदार शस्त्रांनी वार

विमान अपघात तपास संस्था ही चौकशी समावेशक, वस्तुनिष्ठ आणि पुराव्यांवर आधारित पद्धतीने करत आहे. तपासादरम्यान सर्व विहित तांत्रिक आणि प्रक्रियात्मक प्रोटोकॉलचे काटेकोर पालन केले जात असल्याचे अधिकृत निवेदनात म्हटले आहे. तसेच संपूर्ण पारदर्शकतेची भूमिका कायम ठेवत, योग्य वेळी पुढील माहिती सार्वजनिक केली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, या संवेदनशील प्रकरणात कोणत्याही प्रकारचे तर्कवितर्क किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित करू नये, अशी विनंती विमान अपघात तपास संस्थेने सर्व संबंधित घटकांना केली आहे. प्रस्थापित कार्यपद्धतीनुसार चौकशी प्रक्रिया सुरळीतपणे पार पडू द्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

2 मुलांच्या आईवर तरुणाचं एकतर्फी प्रेम... शेवटी, वैतागलेल्या महिलेने आई-वडिलांसोबत मिळून काढला काटा!
 

    follow whatsapp