Bhima Koregoan : अजित पवारांचा संजय राऊतांवर पलटवार, ‘सोम्या गोम्याच्या…’

प्रशांत गोमाणे

01 Jan 2024 (अपडेटेड: 01 Jan 2024, 03:47 AM)

“हवा बहुत तेज चल रही है, अजितराव. टोपी उड जायेगी” अशी टीका केली होती. तसेच आमच्या पाडापाडीच्या खेळात तुम्ही पडाल, तर आधी तुम्ही पडाल असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

ajit pawar criticize sanjay raut koregaon bhima maharashtra politics

ajit pawar criticize sanjay raut koregaon bhima maharashtra politics

follow google news

Ajit pawar Reply Sanjay Raut : कृष्णा पांचाळ,कोरेगाव भीमा / पुणे :  कोरेगाव भीमा येथे आज विजयस्तंभ 206 वा अभिवादन दिन साजरा केला जात आहे. या विजयस्तंभाला आज पहाटे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांनी अभिवादन केले होते. यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती. दरवर्षी येथे मोठ्या संख्येने जनसमुदाय येत असतो. चांगल्या सुविधा कोरेगाव भीमा (koregaon bhima) इथं देण्याचा सरकारचा प्रयत्न असतो. कोरेगाव भीमा इथं येणाऱ्या सर्व अनुयायांनी शांततेत शौर्यस्तंभास अभिवादन करावं, असे आवाहन अजित पवार यांनी यावेळी केले. तसेच हा कार्यक्रम सुरळीत पार पडावा यासाठी प्रशासनाने संपुर्ण तयारी केली असल्याचे देखील अजित पवारांनी सांगितलं. (ajit pawar criticize sanjay raut koregaon bhima maharashtra politics)

हे वाचलं का?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाची सांगता शनिवारी पुणे जिल्हाधिकार्यालयासमोर झाली. या सभेला संबोधित करताना संजय राऊत यांनी भाषणात अजित पवार यांची मिमिक्री करत प्रतिक्रिया दिली होती. “हवा बहुत तेज चल रही है, अजितराव. टोपी उड जायेगी” अशी टीका केली होती. तसेच आमच्या पाडापाडीच्या खेळात तुम्ही पडाल, तर आधी तुम्ही पडाल असा इशारा संजय राऊत यांनी दिला. संजय राऊतांच्या या टीकेवर आता अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. सोम्या गोम्याच्या प्रश्नावर मी बोलत नाही, असे अजित पवार यांनी सांगितले आहे.

हे ही वाचा : आई-वडिलांसह बहिणीची कुऱ्हाडीने हत्या, पोटच्या पोरानेच का घेतला जीव?

पाणबुडी प्रकल्पावर काय म्हणाले?

राज्यातला पहिला पाणबुडी पर्यटन प्रकल्प सिंधुदुर्गातून गुजरातला जात असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे.राज्यातील पाणबुडी प्रकल्प कुठेही गेला नाही असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केल्याचे अजित पवार यांनी सांगितले. दरम्यान खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका. हा आपल्या राज्याचा प्रकल्प आहे. तो राज्याबाहेर जाणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी सांगितले

हे ही वाचा : ‘मविआ’पासून दूर जाण्यासाठी 12 जागांची मागणी? आंबेडकर स्पष्टच बोलले, काँग्रेसला दाखवला आरसा

कोरेगाव भीमा य़ेथे विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने आंबेडकरी अनुयायी येत असतात. चांगल्या सुविधा कोरेगाव भीमा इथं देण्याचा सरकारचा प्रयत्न असतो. शासनाच्या प्रत्येक विभागाने आपल्या घरच्या सारखे काम केलं आहे. कोरेगाव भीमा इथं येणाऱ्या सर्व अनुयायांनी शांततेत अभिवादन करावं, असे आवाहनही अजित पवार यांनी यावेळी केले.

    follow whatsapp