दोन्ही राष्ट्रवादींना घसघशीत फायदा! ठाकरे गट, काँग्रेस आमदारांचे हात रिकामे

भागवत हिरेकर

25 Jul 2023 (अपडेटेड: 25 Jul 2023, 04:49 AM)

निधी वाटपात सरकारकडून अन्याय केला जात असल्याची टीका विरोधकांकडून केली जात असताना समोर आलेली आकडेवारी धक्कादायक आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटातील आमदारांना घसघशीत निधी मिळाला आहे.

huge funds granted in ncp's mla constituency after ajit pawar takes finance ministry charge,

huge funds granted in ncp's mla constituency after ajit pawar takes finance ministry charge,

follow google news

Maharashtra Politics : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थमंत्रिपदाचा कारभार हाती घेतल्यानंतर पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेल्या निधीवरून राजकारण तापलं आहे. निधी वाटपात सरकारकडून अन्याय केला जात असल्याची टीका विरोधकांकडून केली जात असताना समोर आलेली आकडेवारी धक्कादायक आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटातील आमदारांना घसघशीत निधी मिळाला आहे. तर ठाकरे आणि काँग्रेसच्या आमदारांची निराशा झाली आहे. (fund allocation to MLA in Maharashtra)

हे वाचलं का?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात पुरवणी मागण्या मांडल्या. यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटातील (अजित पवार गट-शरद पवार यांचा पक्ष) आमदारांच्या मतदारसंघामध्ये कोट्यवधी रुपयांचा निधी दिला गेला आहे.

वाचा >> Ajit Pawar: मुख्यमंत्री पदाबाबत देवेंद्र फडणवीसांची प्रचंड मोठी घोषणा, अजितदादांना मोठा धक्का?

भाजपचे गंगापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत बंब यांना पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून तब्बल 742 कोटी रुपये निधी दिला गेला आहे. तर महेश बालदी यांच्या मतदारसंघासाठी 28 कोटी रुपयांचा निधी दिला गेला आहे.

जयंत पाटील, राजेश टोपे, रोहित पवारांच्या मतदारसंघात किती निधी?

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. त्यामुळे एक गट विरोधी बाकांवर, तर दुसरा गट सत्ताधारी बाकांवर आहे. पण, राष्ट्रवादीच्या विरोधकी बाकांवरील आमदारांनाही निधी वाटपात घसघशीत लाभ झाला आहे. अजित पवार यांचे ज्यांच्याशी फारसं पडत नाही, त्या आमदार जयंत पाटील यांच्या वाळवा मतदारसंघात तब्बल 580 कोटी 31 लाखांचा निधी दिला गेला आहे.

वाचा >> फेसबुकवर मैत्री केली, हॉटेलवर बोलावलं अन् गॅंगरेप करून…महिलेसोबत घडली भयंकर घटना

जयंत पाटील यांच्याबरोबरच घनसावंगीचे आमदार राजेश टोपे यांच्या मतदारसंघात 293 कोटींचा निधी दिलाय. तर कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांच्या मतदारसंघात 210 कोटी दिले गेले आहेत. बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या मतदारसंघात 35 कोटी दिले गेले आहेत.

काँग्रेसच्या आमदारांची निराशा

निधी वाटपाबद्दल काँग्रेसचे आमदार सभागृहात आक्रमक दिसले. बाळासाहेब थोरातांपासून इतर नेत्यानीही यावर आवाज उठवला. काँग्रेसच्या 15 आमदारांच्या मतदारसंघात शून्य निधी दिला गेला आहे. तर 20 आमदारांच्या मतदारसंघात 1 ते 3 कोटी रुपये इतका निधी सरकारने मंजूर केला आहे. ठाकरे गटाच्या आमदारांचीही अवस्था अशीच आहे.

वाचा >> ‘उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि नवा पायंडा सुरू झाला’, फडणवीसांनी काढला इतिहास

अजित पवार गटातील आमदारांना किती मिळाला निधी?

1) इंदापूरचे आमदार दत्ता भरण – 436 कोटी
2) वाईचे आमदार मकरंद पाटील – 291 कोटी
3) अकोलेचे आमदार किरण लहामटे – 116 कोटी
4) आंबेगावचे आमदार दिलीप वळसे-पाटील – 96 कोटी
5) बारामतीचे आमदार अजित पवार – 73 कोटी
6) श्रीवर्धनच्या आमदार अदिती तटकरे -40 कोटी
7) सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे – 33 कोटी
8) येवल्याचे आमदार छगन भुजबळ – 31 कोटी
9) कागलचे आमदार हसन मुश्रीफ – 22 कोटी
10) परळीचे आमदार धनंजय मुंडे – 21 कोटी
11) गेवराईचे आमदार प्रकाश साळुंखे – 13 कोटी

    follow whatsapp