हिवरखेड नगरपालिकेत भाजपच्या उपसभापतीपदाच्या उमेदवाराला काँग्रेसचा सूचक आणि एमआयएमचा अनुमोदक

Akola Politics : भाजप नेत्या अनिता वाकोडे यांच्या नामनिर्देशन अर्जात सूचक म्हणून काँग्रेसच्या नगरसेविका रुबिजा अब्दुल सलमान यांचे नाव आहे. तर अनुमोदक म्हणून एमआयएमचे एकमेव नगरसेवक आजम खान सुभेदार खान यांचे नाव नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या बाबतचे पुरावेही समोर आल्याने हा प्रकार अधिकच चर्चेचा विषय ठरला आहे. विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी भाजपच्या उमेदवाराच्या अर्जावर सूचक आणि अनुमोदक म्हणून स्वाक्षऱ्या केल्याने राजकीय समीकरणे नेमकी काय आहेत, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

Akola Politics

Akola Politics

मुंबई तक

21 Jan 2026 (अपडेटेड: 21 Jan 2026, 08:54 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

हिवरखेड नगरपालिकेत भाजपच्या उपसभापतीपदाच्या उमेदवाराला काँग्रेसचा सूचक

point

भाजपच्या उपसभापतीपदाच्या उमेदवाराला एमआयएमचा अनुमोदक

Akola Politics : अकोला जिल्ह्यातील हिवरखेड नगरपालिकेत बाल कल्याण समितीच्या उपसभापती पदाच्या निवडीदरम्यान राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. भाजपकडून उपसभापती पदासाठी महिला उमेदवार म्हणून अनिता वाकोडे यांचा नामनिर्देशित अर्ज दाखल करण्यात आला असून, या अर्जात काँग्रेसच्या नगरसेविकेचे नाव सूचक म्हणून तर एमआयएमच्या नगरसेवकाचे नाव अनुमोदक म्हणून असल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे नगरपालिकेतील राजकीय हालचालींना वेग आला आहे.

हे वाचलं का?

भाजप नेत्या अनिता वाकोडे यांच्या नामनिर्देशन अर्जात सूचक म्हणून काँग्रेसच्या नगरसेविका रुबिजा अब्दुल सलमान यांचे नाव आहे. तर अनुमोदक म्हणून एमआयएमचे एकमेव नगरसेवक आजम खान सुभेदार खान यांचे नाव नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या बाबतचे पुरावेही समोर आल्याने हा प्रकार अधिकच चर्चेचा विषय ठरला आहे. विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी भाजपच्या उमेदवाराच्या अर्जावर सूचक आणि अनुमोदक म्हणून स्वाक्षऱ्या केल्याने राजकीय समीकरणे नेमकी काय आहेत, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

हेही वाचा : लग्नानंतर पत्नीचे दोन तरुणांसोबत संबंध, विरोध केल्यावर धमक्या आणि छळ; शेवटी पतीने स्वत:ला संपवलं

या घडामोडीनंतर हिवरखेड नगरपालिकेत वेगवेगळ्या तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. भाजपच्या उपसभापती पदाच्या उमेदवाराच्या नामनिर्देशन पत्रात काँग्रेस आणि एमआयएमच्या नगरसेवकांची नावे असल्याने राजकीय भूमिका आणि आघाड्यांबाबत चर्चा रंगू लागली आहे. या प्रकारामुळे विरोधकांना टीका करण्याची संधी मिळाली असून, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, हिवरखेड नगरपरिषदेतील सध्याची राजकीय स्थिती पाहता भाजपने सत्ता राखली आहे. नगराध्यक्षपदासाठी भाजपच्या सुलभा दुतोंडे या विजयी उमेदवार ठरल्या आहेत. नगरपालिकेतील एकूण जागा 20 असून, त्यातील पक्षीय बलाबल स्पष्ट झाले आहे. भाजपकडे सर्वाधिक 11 जागा आहेत. शिंदे गटाच्या शिवसेनेकडे 5 जागा असून, काँग्रेसकडे 2 जागा आहेत. वंचित बहुजन आघाडीकडे 1 जागा आहे, तर एमआयएमकडेही 1 जागा आहे.

या पार्श्वभूमीवर बाल कल्याण समितीच्या उपसभापती पदाच्या निवडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. भाजपकडे स्पष्ट बहुमत असतानाही विरोधी पक्षातील नगरसेवकांची नावे नामनिर्देशन प्रक्रियेत समोर आल्याने राजकीय चर्चांना वेगळे वळण मिळाले आहे. आगामी काळात या घटनेचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता असून, हिवरखेड नगरपालिकेतील पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

आताच निवडून आलेले उद्धव ठाकरेंचे 3 नगरसेवक फोडले, कल्याण डोंबिवली महापालिकेत शिंदेंची मोठी खेळी
 

    follow whatsapp