आताच निवडून आलेले उद्धव ठाकरेंचे 3 नगरसेवक फोडले, कल्याण डोंबिवली महापालिकेत शिंदेंची मोठी खेळी

ऋत्विक भालेकर

Kalyan-Dombivali Municipal Corporation : मुंबई महानगरपालिकेचा महापौर कोण होणार याकचे सर्वांच्या नजरा लागलेल्या असतानाच कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत राजकीय हालचालींना वेग आला आहे. ठाकरे गटाचे तीन नगरसेवक फुटल्याने सत्तेचे समीकरण बदलणार असल्याचे बोलले जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे गटाच्या तीन नगरसेवकांनी शिंदे सेनेत प्रवेश केला आहे.

ADVERTISEMENT

Kalyan-Dombivali Municipal Corporation
Kalyan-Dombivali Municipal Corporation
social share
google news

बातम्या हायलाइट

point

आताच निवडून आलेले उद्धव ठाकरेंचे 3 नगरसेवक फोडले

point

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिंदेंची मोठी खेळी

Kalyan-Dombivali Municipal Corporation : मुंबई महानगरपालिकेचा महापौर कोण होणार याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या असतानाच कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत राजकीय हालचालींना वेग आला आहे. ठाकरे गटाचे तीन नगरसेवक फुटल्याने सत्तेचे समीकरण बदलणार असल्याचे बोलले जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे गटाच्या तीन नगरसेवकांनी शिंदे सेनेत प्रवेश केला आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत सत्ता स्थापनेसाठी 62 जागा गरजेच्या आहेत. त्यादृष्टीने शिंदे सेनेने प्रयत्न सुरु केल्याचे समोर आले आहे.

हे ही वाचा : BMC Mayor: एकनाथ शिंदेंचा महापौर बसू शकतो, भाजपसोबत ‘प्रेशर टॅक्टीस’मागे ‘या’ आहेत 10 शक्यता

ठाकरे गटाचे तीन नगरसेवक शिंदे सेनेत

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत बहुमताचा आकडा 62 इतका आहे. सद्यस्थितीत शिंदे सेनेकडे 53, तर भाजपकडे 50 नगरसेवक आहेत. अशा परिस्थितीत शिवसेना UBT चे 11 आणि मनसेचे 5 नगरसेवक किंगमेकरच्या भूमिकेत आले आहेत. सूत्रांच्या दाव्यानुसार, बहुमताच्या आकड्यापर्यंत पोहोचण्यासाठी जबरदस्त हॉर्स ट्रेडिंग सुरु झाले आहे.ठाकरे गटाच्या तीन नगरसेवकांनी शिंदे सेनेत प्रवेश केल्याने सत्तेचे पारडे शिंदे गटाकडे झुकले आहे.

भाजप-शिंदे सेनेत बैठकांना वेग

या सर्व पार्श्वभूमीवर भाजप आणि शिंदे सेनेत बैठका सुरु आहेत. मात्र याठिकाणी दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढल्याने महापौरकपदाची खुर्ची कोणाकडे जाणार असा प्रश्न विचारला जात आहे. यामुळेच कल्याण-डोंबिवलीत स्थानिक राजकारण तापल्याचं पहायला मिळत आहे. भाजप आणि शिंदेसेनेकडे बहुमताचा आकडा नसल्याने शिवसेना UBT आणि मनसेचे नगरसेवक महत्त्वाच्या भूमिकेत आले आहेत. महापौरपद ही फक्त प्रशासनिक जबाबदारी नाही तर शहराच्या राजकारणावर आपली पकड मजबूत करण्याचा मार्ग आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp