Akshay Kumar and Devendra Fadnavis : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याने काही वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीत त्याने मोदींना आंबा कापून खाता की चोखून खाता? असा प्रश्न विचारला होता. त्यानंतर अक्षय कुमारला ट्रोलिंगला सामोरे जावे लागले होते. मात्र, अजूनही अक्षय कुमार त्याची चूक सुधारण्याचं नाव घेत नाहीये. अक्षय कुमार याने आता 'महाराष्ट्र आणि सिनेमा - भारताच्या सर्जनशील अर्थव्यवस्थेचे भविष्य' या विषयावर देवेंद्र फडणीस यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्याने देवेंद्र फडणवीसांना "तुम्ही नागपूरचे आहात? तुम्ही संत्री कशी खाता?", असा सवाल केलाय.
ADVERTISEMENT
अक्षय कुमारचा प्रश्न ऐकून आमदार रोहित पवार संतापले
दरम्यान, अक्षय कुमारने हा प्रश्न विचारल्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार संतापलेले पाहायला मिळाले आहेत. रोहित पवार यांनी x या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवरुन प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. रोहित पवार म्हणाले, मायबाप सरकार तुम्ही आंबे चोखून खा नाहीतर चावून खा… संत्री कापून त्यावर मीठ टाका नाहीतर तिखट टाका… फक्त मुख्य मुद्द्यावरुन लोकांचं लक्ष भरकटवू नका, शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळू नका आणि अश्रू भरलेल्या त्याच्या डोळ्यात तिखट टाकू नका…! संत्र्याची चव चाखतानाच आज कॅबिनेटमध्ये संपूर्ण कर्जमाफी, हेक्टरी ५० हजार रु. मदत, शेतमजूरांना भरीव मदत आणि विद्यार्थ्यांचं शैक्षणिक शुल्क माफीचा निर्णय घ्यायला विसरू नका…!
अक्षय कुमारच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
अक्षय कुमारने मुलाखत सुरू करताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गंमतीदार प्रश्न विचारला. तो म्हणाला, “मी एकदा पंतप्रधान मोदींना विचारलं होतं की त्यांना आंबा कापून खायला आवडतो की चोखून? त्यावेळी सगळ्यांनी मला ट्रोल केलं होतं. पण मी सुधारलो नाही. तुम्ही नागपूरचे आहात, त्यामुळे आता तुम्हालाच विचारतो तुम्ही संत्री कशी खायला आवडते?”
अक्षयचा प्रश्न ऐकून फडणवीस हसले. त्यानंतर त्यांनी उत्तर देताना सांगितलं, “मी तुला एक खास नागपूरकर पद्धत सांगतो. संत्र्याचं साल न काढता त्याचे दोन भाग करायचे, साल जसंच्या तसं ठेवायचं. मग त्यावर थोडं मीठ शिंपडून खायचं. जसं आंबा खातो, तशीच संत्री खायची. अशी चव दुसरीकडे मिळणार नाही. ही पद्धत फक्त नागपूरच्या लोकांनाच ठाऊक आहे.”
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT
