Arvind Kejriwal On Delhi Election 2024: दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल आज 8 फेब्रुवारीला जाहीर झाला असून या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आम आमदी पार्टीसह काँग्रेसचा सुफडा साफ केला आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार भाजप 47, तर आम आदमी पार्टी 23 जागांवर आघाडीवर आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही. अशातच आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी माध्यमांशी बोलताना मोठी प्रतिक्रिया दिली आहे. केजरीवाल म्हणाले, "आम्ही राजकारणात सत्तेसाठी आलो नाहीत. आम्ही राजकारणाला एक विकल्प मानतो, या माध्यमातून जनतेची सेवा केली जावी. या माध्यमातून लोकांच्या सु:ख दु:खात कामी येऊ. ते काम आम्ही करत राहू.भारतीय जनता पक्षाला या विजयासाठी मी खूप खूप धन्यवाद देतो."
ADVERTISEMENT
आज दिल्लीच्या निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. जनतेचा जो काही निर्णय आहे, त्याला आम्ही नम्रपणे स्वीकारत आहोत. भारतीय जनता पक्षाला या विजयासाठी मी खूप खूप धन्यवाद देतो. ज्या आशा-अपेक्षेने लोकांनी त्यांना बहुमत दिलं आहे, ते सर्व आशा-अपेक्षांवर खरे उतरतील. मागील दहा वर्षांपासून जनतेनं आम्हाला जी संधी दिली, त्या दहा वर्षात आम्ही खूप कामं केली.
हे ही वाचा >> Delhi Election Result: 'लढा अजून आपआपल्यात...', कोणी साधला काँग्रेस-आपवर निशाणा?
शिक्षण, आरोग्य, पाणी, वीज विभाग, तसच इतर वेगवेगळ्या पद्धतीतून लोकांची सेवा करण्याचा प्रयत्न केला. दिल्लीच्या इन्फ्रास्ट्रक्चरलाही सुधारण्याचा आम्ही प्रयत्न केला. आता जनतेनं आम्हाला जो निर्णय दिला आहे, आम्ही फक्त विरोधक म्हणूनच नाही, तर समजाची सेवा, जनतेच्या सु:ख-दु:खात उभं राहणं, व्यक्तीगत रित्या ज्या कोणालाही गरज असेल, आम्ही लोकांच्या सु:ख दु:खात नेहमीच कामी येऊ.
कारण आम्ही राजकारणात सत्तेसाठी आलो नाहीत. आम्ही राजकारणाला एक विकल्प मानतो, या माध्यमातून जनतेची सेवा केली जावी. या माध्यमातून लोकांच्या सु:ख दु:खात कामी येऊ. ते काम आम्ही करत राहू. यापुढेही आम्हाला जनतेच्या सु:ख दु:खात सहभावी व्हायचं आहे. मला आम आदमी पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना खूप खूप धन्यवाद द्यायचं आहे. त्यांनी खूप शानदार निवडणूक लढवली. त्यांनी खूप मेहनत घेतली आणि खूप काही सोसलं. त्यामुळे मी सर्व कार्यकर्त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो..
हे ही वाचा >> Delhi Election 2025: भाजपने कमाल केली, राजधानीत कमळ फुलणार.. पाहा विधानसभा निवडणुकीचा निकाल
ADVERTISEMENT
