Baramati Bypoll Result 2026 Live: बारामती पोटनिवडणूक निकाल LIVE, सुनेत्रा पवार ऐतिहासिक विजयाच्या उंबरठ्यावर

Baramati By Poll Result 2026 Live Updates: बारामती पोटनिवडणूक ही केवळ जागेची नव्हे, तर पवार कुटुंबाच्या राजकीय वारसदाराची चाचणी म्हणूनही पाहिली जात आहे. या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांना नेमकं किती मताधिक्य मिळतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Mumbai Tak

मुंबई तक

04 May 2026 (अपडेटेड: 04 May 2026, 02:48 PM)

follow google news

Baramati By-Election Result 2026 LIVE: बारामती: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी 23 एप्रिल रोजी झालेल्या मतदानानंतर आता सर्वांचे लक्ष आज (4 मे) रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे लागले आहे. या निवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार (राष्ट्रवादी काँग्रेस) यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. 

हे वाचलं का?

बारामती पोटनिवडणूक निकाल LIVE

• पहिल्या फेरीत सुनेत्रा पवार ६५०० मतांनी आघाडीवर

• EVM च्या २३ फेऱ्या होतील… एकूण ४७८ मतदान केंद्रवरील मतदान काउंट होईल

• सध्या बारामती विधानसभेची पहिली फेरी सुरू

• बारामतीच्या मतमोजणीसाठी एकूण २६ फेऱ्या असणार

• सुरुवातीला पोस्टल मतमोजणी सुरू होईल

• त्यानंतर मुख्य मतमोजणीला सुरुवात होईल

• २ लाख २३ हजार ७०५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलाय

• बारामतीच्या वखार महामंडळाच्या गोडाऊन मध्ये मतमोजणी

• सुनेत्रा पवारांना मताधिक्याचा विक्रम करण्यासाठी १ लाख ६५ हजार मतांची गरज

• पोटनिवडणुकीत २ लाख २३ हजार ७०५ मतदारांनी बजावला होता मतदानाचा हक्क

• बारामती पोटनिवडणूक: मतमोजणीला थोड्याच वेळात होणार सुरुवात

• पहिली फेरी ८८६५ 

• दुसऱ्या फेरीत सुनेत्रा पवार १६,५४३ मतांनी आघाडीवर

• एकूण १६८४३ मतदान मोजणी झाली

• तिसऱ्या फेरी अखेर सुनेत्रा पवार यांना २६,७७३  मतांची आघाडी

• अभिजीत बिचुकले ७ 

• करुणा मुंडे १०

• चौथ्या फेरीत सुनेत्रा पवार 36591 मतांनी आघाडीवर 

• पाचव्या फेरीत सुनेत्रा पवार ५४,५०४ मतांनी आघाडीवर

•  सहाव्या फेरी अखेर एकूण झालेले मतदन - ८८१४

•  सुनेत्रा पवार यांना झालेले मतदान - ८६८२ आणि इतर मते - १३२

• सातव्या फेरी अखेर सुनेत्रा पवार यांनी 631867 मतांची आघाडी घेतली आहे.

• आठव्या फेरी अखेर सुनेत्रा पवार यांना झालेले एकूण मतदान - 70642

• नवव्या फेरीत सुनेत्रा पवार यांना ९२०० मते 

• दहाव्या फेरीत सुनेत्रा पवार यांना झालेले एकूण मतदान - ८७७२८

• अकराव्या फेरी अखेर सुनेत्रा पवार झालेले एकूण मतदान -  95752

• बाराव्या फेरी अखेर सुनेत्रा पवार  1 लाख 3 हजार  809

• तेराव्या फेरीअखेर सुनेत्रा पवार 1 लाख 12 हजार 268 मतांनी आघाडीवर

• चौदाव्या फेरी अखेर सुनेत्रा पवार 1 लाख 21 हजार 855 मतांनी आघाडीवर

• पंधराव्या फेरी अखेर सुनेत्रा पवार 1 लाख 32 हजार 916 मतांनी आघाडीवर 

• सोळाव्या फेरी अखेर सुनेत्रा पवार यांना 1 लाख 41 हजार 909 मतदान

• सतराव्या फेरी अखेरीस सुनेत्रा पवार यांना 1लाख 50 हजार 876 मतदान 

•  अठराव्या फेरी अखेरीस सुनेत्रा पवार यांना 1लाख 59 हजार 066 मतदान 

• एकोणीसव्या फेरी अखेरीस सुनेत्रा पवार 1लाख 68 हजार 555 मतदान 

• विसाव्या फेरी अखेर सुनेत्रा पवार यांना  झालेले एकूण मतदान - 1 लाख 79 हजार 620 मतदान

• एकविसाव्या फेरी अखेर सुनेत्रा पवारांना 1 लाख 89 हजार 657 मतदान 

• बाविस  फेरी अखेर सुनेत्रा पवारांना 2 लाख 03 हजार 003 मतदान

• तेवीस फेरी अखेरीस सुनेत्रा पवार यांना 2 लाख 14 हजार 059 मतदान

निवडणुकीची पार्श्वभूमी

अजित पवार यांचे 28 जानेवारी 2026 रोजी विमान अपघातात निधन झाल्याने बारामतीची जागा रिक्त झाली होती. निवडणूक आयोगाने 15 मार्चला या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर केली. यानुसार 23 एप्रिलला मतदान आणि 4 मे रोजी मतमोजणी निश्चित करण्यात आली.

हे ही वाचा>> बारामती, राहुरीचा Exit Poll; 'रुद्र रिसर्च'ने थेट आकडेच सांगितले.. पाहा कोणाचा किती मतांनी होणार विजय

बारामती ही पवार कुटुंबाची पारंपरिक ताकदवान जागा मानली जाते. गेल्या काही दशकांत अजित पवार यांनी येथून सातत्याने विजय मिळवला होता. या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांना महायुतीचे (राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना) पूर्ण समर्थन आहे.

उमेदवार आणि चुरस

सुरुवातीला ही निवडणूक बिनविरोध होईल अशी चर्चा होती, परंतु अखेर 53 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी (9 एप्रिल) अनेक उमेदवारांनी माघार घेतली. अंतिमतः 23 उमेदवार रिंगणात राहिले. यामध्ये सुनेत्रा पवार यांच्यासह बहुतेक अपक्ष उमेदवार आहेत. काँग्रेसने सुरुवातीला आकाश मोर यांना उमेदवारी दिली होती, परंतु नंतर त्यांना माघार घेण्यास सांगण्यात आलं. त्यामुळे ही निवडणूक एकतर्फी होणार हे जवळजवळ निश्चित झालं.

हे ही वाचा>> सुनेत्रा पवारांचा विजय निश्चित? राहुरीत काय होणार? बघा, काय सांगतो एक्झिट पोल..

मात्र, काही अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी कायम ठेवली. यात करुणा मुंडे, अभिजीत बिचुकले, सतीश कदम आदींचा समावेश आहे. 

मतदान प्रक्रिया

23 एप्रिल रोजी येथे 58.27 टक्के मतदान झालं होतं. पण 2024 च्या विधानसभा निवडणुकीत येथे 72 टक्के मतदान झाले होते. दरम्यान, महायुती नेत्यांनी सुनेत्रा पवार यांना चांगलं मताधिक्य मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे.