बीड पुन्हा हादरलं! पवनचक्की परिसरात चोरट्यांवर गोळीबार, एक ठार, घटना काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल मध्यरात्री काही अज्ञात व्यक्तींनी यार्डमध्ये चोरीचा प्रयत्न केला. यावेळी तिथे तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकाने चोरट्यांना थांबवण्यासाठी गोळीबार केला.

Mumbai Tak

मुंबई तक

23 May 2025 (अपडेटेड: 23 May 2025, 05:35 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

बीडमध्ये पुन्हा एकदा पवनचक्की परिसरात राडा

point

चोरट्यांचा मोठा धुमाकूळ, सुरक्षा रक्षकांचा गोळीबार

Beed Limbaganesh Crime News :  संतोष देशमुख प्रकरणामुळे राज्यात चर्चेत आलेल्या बीडमधील गुन्हेगारीच्या घटना थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. आता पुन्हा पवनचक्की परिसरात एक घटना घडल्यानं पोलिसांसमोर कायदा व सुव्यवस्थेचं आवाहन निर्माण झालं आहे. बीडच्या लिंबागणेश परिसरातील पवनचक्कीमध्ये चोरीच्या प्रयत्नादरम्यान गोळीबार झाला. या गोळीबारात एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. 

हे वाचलं का?

लिंबागणेश परिसरातील पवनचक्की साहित्याच्या यार्डमध्ये काल मध्यरात्री चोरीचा प्रयत्न झाला. यावेळी चोरीच्या प्रयत्न करणाऱ्या एका चोरट्यावर सुरक्षा रक्षकाने गोळीबार केला. सुरक्षा रक्षकाच्या या गोळीबारात चोराचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

हे ही वाचा >> हगवणेंसारखेच प्रताप, प्रत्येक वादात त्याचं नाव, कोण आहे निलेश चव्हाण?

लिंबागणेश परिसरात पवनचक्की उभारणीचं काम सुरू आहे. याच ठिकाणी साहित्य ठेवण्याचा यार्ड आहे. यापूर्वीही या ठिकाणी चोरीचे प्रकार घडले होते. त्यामुळे सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल मध्यरात्री काही अज्ञात व्यक्तींनी यार्डमध्ये चोरीचा प्रयत्न केला. यावेळी तिथे तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकाने चोरट्यांना थांबवण्यासाठी गोळीबार केला. यात एका चोरट्याला गोळी लागली आणि तो गंभीर जखमी झाला. त्याचा जागीच मृत्यू झाला. 

हे ही वाचा >> अटक केली की आरोपी स्वत:हून हजर झाले? सुषमा अंधारे यांनी उपस्थित केले 3 सवाल

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.  याप्रकरणी सुरक्षा रक्षकाचीही चौकशी करण्यात येत आहे. पवनचक्की प्रकल्पाच्या साहित्याच्या सुरक्षेसाठी आता अधिक कडक उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.

    follow whatsapp