सगळ्यात मोठी बातमी... 'भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम', US राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा दावा

भारत पाकिस्तान दोन्ही देशात गेल्या तीन दिवसांपासून युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. दोन्ही देशांमधील शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत युद्धविरामावर ट्विट केलंय.

Mumbai Tak

मुंबई तक

10 May 2025 (अपडेटेड: 10 May 2025, 06:38 PM)

follow google news

India Pakistan War: वॉशिंग्टन: भारत-पाकिस्तान दोन्ही देशात गेल्या तीन दिवसांपासून युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. दोन्ही देशांमधील वातावरण सातत्याने चिघळत होतं. पाकिस्तान सातत्याने भारताच्या कुरापती काढत अनेक प्रकारे हल्ले करत होता. तर भारतानं देखील पाकिस्तानला प्रत्युत्तर देत अनेक ड्रोन हल्ले करत दहशतवादी स्थळांना लक्ष्य केलं होतं. या दोन्ही देशांमधील वाढता तणाव लक्षात घेऊन जगभरातून युद्धविरामासाठी आवाहन केलं जात होतं. अशातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता थेट दावा केला आहे की, त्यांच्या मध्यस्थीनंतर भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही युद्धविरामासाठी तयार झाले आहेत. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. 

हे वाचलं का?

7, 8 आणि  9 मे रोजी मध्यरात्री दोन्ही देशांमध्ये हल्ले-प्रतिहल्ले सुरू होते. ज्यामध्ये भारतातील काही जवान शहिदही झाले. तर पाकिस्तानात 100 हून अधिक लोक मारले गेले. दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरू झाल्यापासून अमेरिका युद्ध थांबविण्यासाठी आवाहन करत होतं. अशातच आता डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविराम होत असल्याचं ट्विट केलं आहे.

यामुळे दोन्ही देशांमधीत तणाव कमी होणार असल्याची शक्यता आहे. अशातच त्यांचं ट्विट हे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हे ही वाचा>> एक-दोन नव्हे तर भारताचे तब्बल 32 Airport राहणार बंद, मुंबई विमानतळाचं काय? पाहा संपूर्ण यादी

ऑपरेशन सिंदूर पार पडताच भारताने स्पष्ट केलेलं की, त्यांनी पाकिस्तानच्या लष्करी तळांना आणि नागरिकांना लक्ष्य केले नाही. हा हल्ला दहशतवादाविरुद्ध होता. भारताची ही कृती जबाबदार होती. असे असूनही, पाकिस्तान अस्वस्थ झालेला. बुधवारी रात्री पाकिस्तानने जम्मू-काश्मीरसह देशातील अनेक सीमावर्ती शहरांवर ड्रोन हल्ले केलेले. तसेच सीमेपलीकडून जोरदार गोळीबार होत होता. गुरुवारीही पाकिस्तानने ड्रोन हल्ले आणि गोळीबार केलेला. शुक्रवारीही अशाच प्रकारचे हल्ले सुरू होते. पाकिस्तानने सलग तिसऱ्या दिवशी रात्री गोळीबार केला. एवढंच नव्हे तर फतेह 1 हे लांब पल्ल्याचं क्षेपणास्त्र देखील सोडण्यात आलं होतं. जे भारताने हवेतच नष्ट केलेलं

दरम्यान, भारतीय सैन्याने तिन्ही हल्ल्यांना योग्य उत्तर दिलेलं आणि अनेक पाकिस्तानी लष्करी तळांवर मोठा हल्ला केला होता. एकीकडे या सगळ्या गोष्टी सुरू असताना दुसरीकडे अमेरिकेने दोन्ही देशांमधील चर्चा सुरू ठेवली होती. परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी दोन्ही देशांच्या प्रमुखांशी चर्चा केली.

हे ही वाचा>> रात्र वैऱ्याची... रात्रभर सुरू होते पाकिस्तानचे हल्ले, तुमच्या-आमच्या रक्षणासाठी जीवपाड लढतयं लष्कर!

दुसरीकडे शनिवारी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत, पाकिस्तानचे अनेक खोटे दावे उघड करण्यात आले होते. भारताची भूमिका स्पष्ट करताना, सांगण्यात आलं की, भारतीय सशस्त्र दलाला तणाव वाढवायचा नव्हता. परंतु पाकिस्ताननेही असेच वर्तन करणं अपेक्षित आहे.

ट्रम्प यांनी केली युद्धविरामाची घोषणा, भारताकडून दुजोरा

दरम्यान, भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी शनिवारी संध्याकाळी 5 वाजता पत्रकार परिषद घेतली आणि केवळ एवढंच सांगितलं की, 
'मी एक संक्षिप्त विधान करू इच्छितो. आज दुपारी 3.35 वाजता, पाकिस्तानच्या लष्करी ऑपरेशन्स महासंचालकांनी भारताला फोन केला. आज संध्याकाळी 5.00 वाजल्यापासून दोन्ही बाजूने जमीन, हवाई आणि समुद्रातील गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कराराची अंमलबजावणी करण्यासाठी दोन्ही पक्षांना सूचना देण्यात आल्या आहेत.

पाकिस्तानकडून युद्धबंदीची घोषणा

दरम्यान, पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी सोशल मीडियावर माहिती दिली की, 'भारत आणि पाकिस्तानने तात्काळ प्रभावीपणे युद्ध बंदीवर सहमती दर्शविली आहे. पाकिस्तानने नेहमीच आपल्या सार्वभौमत्वाशी आणि प्रादेशिक अखंडतेशी तडजोड न करता या प्रदेशात शांतता आणि सुरक्षिततेसाठी प्रयत्न केले आहेत.ट

 

    follow whatsapp