भाजप उमेदवाराचा अश्लील व्हिडीओ व्हायरल झाला, तरीही बिहारमध्ये लाखाच्या वर मतं मिळवली, दणदणीत विजय

BJP candidate Sunil Kumar Pintu Won From Sitamarh : भाजप उमेदवाराचा अश्लील व्हिडीओ व्हायरल झाला, तरीही बिहारमध्ये लाखाच्या वर मतं मिळवली, दणदणीत विजय

BJP candidate Sunil Kumar Pintu Won From Sitamarh

BJP candidate Sunil Kumar Pintu Won From Sitamarh

मुंबई तक

14 Nov 2025 (अपडेटेड: 14 Nov 2025, 06:45 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

भाजप उमेदवाराचा अश्लील व्हिडीओ व्हायरल झाला

point

तरीही बिहारमध्ये लाखाच्या वर मतं मिळवली, दणदणीत विजय

BJP candidate Sunil Kumar Pintu Won From Sitamarh : बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल आज समोर आले असून राष्ट्रीय लोकशाही आघाडीने दणदणीत विजय मिळवला. बिहारमध्ये आरजेडीसह काँग्रेसचा अक्षरश: सुपडा साफ झालाय. दरम्यान ही निवडणूक अनेक वादग्रस्त घटनांनी गाजलेली पाहायला मिळाली. त्यापैकी एक प्रकरण म्हणजे सुनील कुमार पिंटू यांचं होतं. मतदानाच्या काही दिवस आधी भाजपचे उमेदवार सुनील कुमार पिंटू यांचे कथित अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्याचे होते. हे व्हिडिओ समोर आल्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली. त्यानंतर पिंटू यांनी स्पष्टीकरण देत प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. दरम्यान, आज सकाळी मतमोजणी सुरु झाल्यापासून सुनील कुमार सध्या सीतामढी विधानसभा मतदारसंघातून आघाडीवर आहेत. मतमोजणीच्या 26 व्या फेरीअखेर सुनील कुमार पिंटू यांनी 104226 मतं मिळवली असून त्यांनी 5562 मतांनी विजय मिळवलाय.  

हे वाचलं का?

सुनील कुमार पिंटू यांच्या अश्लील क्लिप्स 6 नोव्हेंबरला होणाऱ्या पहिल्या टप्प्याच्या मतदानाच्या काही दिवस आधी सोशल मीडियावर व्हायरल झाल्या. व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊनही त्यांनी लाखाच्या वर मत मिळवली आहेत.

हेही वाचा : रायगड : 23 वर्षीय तरुणीला तपासण्यासाठी बेडवर झोपायला सांगितलं, अन् 75 वर्षीय डॉक्टरने...

भाजपचे कार्यकर्ते आणि समर्थकांनी हे व्हिडिओ त्यांचे नसल्याचे म्हणत आरोप फेटाळून लावले होते. हे सर्व मोठ्या राजकीय कटाचा भाग असल्याचा आरोप केला आहे, ज्याचा उद्देश निवडणुकीच्या तोंडावर त्यांची बदनामी करणे आहे. त्यांनी फुटेज एडिटेड आणि मॉर्फ्ड असल्याचा आरोप करत, या व्हिडिओच्या मागचे सत्य समोर आणण्यासाठी निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे.

सुनील कुमार यांनी सांगितले की हेच व्हिडिओ दोन वर्षांपूर्वीही समोर आले होते, तेव्हा ते खासदार होते. त्यांनी असेही स्पष्ट केले की, त्यावेळी त्यांना पक्षाची उमेदवारी मिळू नये म्हणून हा व्हिडिओ मुद्दाम पसरवण्यात आला होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांच्या सीतामढी विधानसभा उमेदवारीची घोषणा केल्यानंतर विरोधकांनी पुन्हा हा जुना व्हिडिओ बाहेर काढला असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. दरम्यान, या निवडणुकीत अमित शाह यांनी त्यांचं कौतुकही केलं होतं. पिंटू बडा आदमी बनेगा असंही अमित शाह यांनी म्हटलं.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

मुंबईची खबर: 'मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर बनवायचं असेल तर मुंबईतील झोपडपट्ट्यांवर कठोर...', मुंबई उच्च न्यायालयाचं निरीक्षण

    follow whatsapp