Amit Shah: नवी दिल्ली: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर विरोधकांनी EVM विरोधात जोरदार मोहीम उघडली आहे. यावरून भाजपला सातत्याने टार्गेट केलं जात आहे. आता याचबाबत भाजपचे चाणक्य समजल्या जाणाऱ्या अमित शाह यांनी EVM बाबत पहिल्यांदाच मोठं विधान केलं आहे. (bjp chanakya amit shah spoke on evm for the first time after maharashtra vidhansabha election 2024)
ADVERTISEMENT
'आज तक'च्या अजेंडा आज तक 2024 या विशेष कार्यक्रमात अमित शाह यांची एक्स्क्लुझिव्ह मुलाखत घेण्यात आली. यावेळी अमित शाह यांना सध्या गाजत असलेल्या EVM वर प्रश्न विचारण्यात आले. पाहा त्यावर अमित शाह नेमकं काय म्हणाले.
अमित शाह यांचं EVM वर नेमकं मत काय?
प्रश्न: सध्या EVM वर बरेच आरोप केले जात आहेत. यावर तुमचं म्हणणं काय?
अमित शाह: लोकसभा निवडणूक EVM वर झाल्या. राहुल गांधी मानतात लोकसभा निवडणुका ते जिंकले आहेत. ते मानतात.. जिंकलेले नाही.. पण ते तसं मानतात.. तर EVM बरोबर होतं?
झारखंडमध्ये टपकन शपथ घेऊन सत्तेत बसलं काँग्रेस, तिथे EVM बरोबरं आहे? महाराष्ट्रात जनतेने धोबीपछाड दिलं तर महाराष्ट्रात म्हणे EVM खराब आहे. हरियाणामध्ये जनतेने हरवलं तर तिथे EVM खराब आहे. आता ती म्हण आहे ना.. नाचता येईना अंगण वाकडं...
हे ही वाचा>> Exclusive: 'शिंदेंना नाराज व्हायचं काही कारणच नाही, कारण...' अमित शाहांचं सूचक विधान
EVM वर भारताच्या निवडणूक आयोगाने संपूर्ण तीन दिवस सार्वजनिक जाहिरात देऊन सांगितलं की, EVM हॅक होऊ शकतो हे दाखवून द्यावं. हे सगळे आघाडीतील पक्ष EVM चा विरोध करतात. पण ते तिथे कोणीही गेले नाहीत. यांचं असं आहे की, आरोप करा आणि पळून जा.
आज मी सांगतो तुम्हाला.. ही लोकं म्हणत होते की, आम्ही संविधान बदलू, संविधान बदलू... आमच्या 240 जागा आल्या नाही तर आम्ही संविधान बदललं असं ते म्हणत आहेत. त्यांना हे माहीत नाही की, 10 वर्ष आम्हाला संपूर्ण बहुमत होतं. आम्ही आरक्षणाला हात लावलेला नाही.
हे ही वाचा>> Shrikant Shinde: सावरकरांवरून संसदेत राडा.. राहुल गांधी-श्रीकांत शिंदे भिडले, थेट...
काँग्रेसने मुस्लिम आरक्षण देऊन एससी, एसटी आणि ओबीसी आरक्षणाला कमी करण्याचं काम केलं आहे. मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो.. की, जोपर्यंत भाजपचे खासदार हे संसदेत आहेत तोवर आम्ही धर्माच्या आधारावर आरक्षण आणून देणार नाही. असं अमित शाह यावेळी म्हणाले.
ADVERTISEMENT
