‘आता पवारांची भाकरी बदली वैगरेची ताकद नाही’, राणेंचं शरद पवारांना खुलं आव्हान

मुंबई तक

• 11:32 AM • 29 Apr 2023

Narayan Rane: भाजपचे मंत्री नारायण राणे यांनी थेट शरद पवार यांना आव्हान दिलं आहे. शरद पवारांची राजकीय ताकद संपल्याचं वक्तव्यही त्यांनी यावेळी केलं आहे.

bjp minister narayan rane has directly challenged sharad pawar on the issue of power change in the state

bjp minister narayan rane has directly challenged sharad pawar on the issue of power change in the state

follow google news

सिंधुदुर्ग: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी काही दिवसांपूर्वी आता भाकरी फिरवायची वेळ आली आहे. असं विधान करत काही मोठे राजकीय संकेत दिले होते. मात्र, आता शरद पवारांच्या याच वक्तव्यावर टीका करताना भाजपचे (BJP) मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी एकप्रकारे खुलं आव्हानच दिलं आहे. ‘आता म्हणा बदली वैगरेची ताकद नाही.. त्याला वेळ, काळ… वय असतं..’ असं म्हणत राणेंनी शरद पवार यांच्या भाकरी फिरवण्याचा वक्तव्याची खिल्ली उडवली आहे. सिंधुदुर्गात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नारायण राणेंनी बारसूच्या मुद्द्यावरुन देखील विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. (bjp minister narayan rane has directly challenged sharad pawar on the issue of power change in the state)

हे वाचलं का?

शरद पवारांची भाकरी करपली होती ती आम्ही…

‘शरद पवारांची भाकरी करपली होती ती आम्ही बदलली.. जनता म्हणाली भाकरी करपली.. मग एकनाथ शिंदे आणि देवेंद्रनी बदलली. आता ही भाकरी आताशी टाकली आहे. लोकांनी अजून चव चाखायची आहे. त्यानंतर पवार साहेबांनी बोलावं. आता म्हणा बदली वैगरेची ताकद नाही.. त्याला वेळ, काळ… वय असतं ओ..’ असं म्हणत नारायण राणेंनी पवारांच्या वक्तव्य फारसं महत्त्वाचं नसल्याचं म्हटलं आहे.

उद्धव ठाकरेंवर पुन्हा टीका

‘कोण विरोधक.. काय त्यांचं कोकणात योगदान? किती प्रकल्प त्यांनी कोकणात आणले. विमानतळ, धरणं, रेल्वे… सगळ्याला यांचा विरोध.. आता सव्वा ते दीड लाख कोटीचा प्रकल्प येतोय त्याला विरोध.. प्रत्येक प्रकल्पाला विरोध करतायेत. लोकांना रोजगार मिळण्यासाठी काय केलं उद्धव ठाकरे.. चिवसेना.. चिवसेनेने..’ असं म्हणत नारायण राणेंनी यावेळी पुन्हा उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

हे ही वाचा>> मनसे कोणाला टाळी देणार? अमृता फडणवीसांच्या प्रश्नावर राज ठाकरेंचा बाऊन्सर

‘आंदोलकांना पोलिसांनी मारल्याचा पुरावा आहे का?’

‘आंदोलकांना मारलं याचा पुरावा आहे का? तुम्ही दाखवा सरकार खोटं बोलतं म्हणून.. प्रकल्प बाहेर गेला की ओरड.. आणि इथे आला की ओरड.. कोण खासदार आहे तो.. स्वत:ची जमीन घेऊन ठेवलीय तिकडे. जे काही झालं ते कमी झालं असं वाटतं मला.. मी काय ते बोललो नाही.. कमी झालं.’ असं विधान नारायण राणेंनी केलं आहे.

हे ही वाचा>> ‘आता भाकरी फिरवायची वेळ…’, शरद पवारांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

‘देवेंद्र फडणवीसांनी मॉरिशिअसवरुन आदेश दिले याचा काही पुरावा आहे का तुमच्याकडे..? हे कोण बारसूला उद्धव ठाकरेने संवाद साधू दे.. मग दुसऱ्या दिवशी आम्ही जाणार ना.. हजेरी घ्यायला. मीच जाणार..’ असं म्हणत नारायण राणेंनी विरोधकांवरच टीकेची झोड उठवली.

राणेंनी दिलं उद्धव ठाकरेंना बारसूला येण्याचं आव्हान

तसंच बारसूला उद्धव ठाकरेंनी येऊनच दाखवावं आम्ही त्यांच्या स्वागतला हजरच असू… होऊनच जाऊदे एकदा काय ते.. कोकणापासून मुंबईत पळत जावं लागेल.. कोकणापासून मुंबई किती लांब आहे ते माहितए ना.. आणि चालता येत नाही साधं त्याला.. पळणार कुठून.. असं म्हणत राणेंनी उद्धव ठाकरेंना बारसूला येऊन दाखवायचं आव्हान दिलं आहे.

    follow whatsapp