Gadkari: ‘गाडीत चहाचा थेंब जरी पडला तर मी तुम्हाला…’, गडकरींनी सांगितला भन्नाट किस्सा

मुंबई तक

09 Dec 2022 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:24 AM)

Nitin Gadkari Mumbai-Pune Express Way : नवी दिल्ली : मोदी सरकारमधील (Modi Govt) सर्वात लोकप्रिय मंत्री म्हणून ओळख असलेल्या नितिन गडकरींच्या (Nitin Gadkari) कामांबाबत आपण नेहमीच ऐकत-वाचत आलेलो आहोत. मात्र, गडकरींची कामाची नेमकी पद्धत कशी आहे, विशेषत: रस्ते बांधणीबाबत गडकरी किती काटेकोर आहेत याचा एक किस्साच स्वत: गडकरींनी ‘अजेंडा आज तक’ या विशेष कार्यक्रमात सांगितला. […]

Mumbaitak
follow google news

Nitin Gadkari Mumbai-Pune Express Way : नवी दिल्ली : मोदी सरकारमधील (Modi Govt) सर्वात लोकप्रिय मंत्री म्हणून ओळख असलेल्या नितिन गडकरींच्या (Nitin Gadkari) कामांबाबत आपण नेहमीच ऐकत-वाचत आलेलो आहोत. मात्र, गडकरींची कामाची नेमकी पद्धत कशी आहे, विशेषत: रस्ते बांधणीबाबत गडकरी किती काटेकोर आहेत याचा एक किस्साच स्वत: गडकरींनी ‘अजेंडा आज तक’ या विशेष कार्यक्रमात सांगितला. (bjp minister nitin gadkari told about pune mumbai expressway awesome anecdote)

हे वाचलं का?

रस्ते बांधणी आणि दळणवळण यावर नितिन गडकरींचं विशेष प्रेम आहे. यामधून देशाला विकासाची गती पकडता येते आणि त्यामुळे देशात चांगल्या रस्त्यांचं जाळं निर्माण झालं पाहिजे असं गडकरींचं मत आहे. त्यामुळेच जेव्हा गडकरी पहिल्यांदा 1995 साली सेना-भाजप सत्तेत असताना मंत्री झाले तेव्हा त्यांनी मुंबई-पुणे हा एक्सप्रेस वे बांधून त्यांच्या कामाची चुणूक दाखवून दिली. पण हाच रस्ता नेमका कसा बांधला, कंत्राटदारांना ते कसे धारेवर धरायचे.. या सगळ्याबाबत त्यांनी किस्सा सांगितला आहे. जाणून घेऊयात गडकरी नेमकं काय म्हणाले.

‘नितीन गडकरी जेव्हा बोलतात तेव्हा वाटतं…’; ‘फाऊंटेन शो’ बघून राज ठाकरे काय म्हणाले?

पाहा गडकरी नेमकं काय म्हणाले:

‘मी संघाचा स्वयंसेवक आहे. माझ्या आयुष्यात मी विद्यार्थ्यांचा प्रतिनिधी म्हणून काम सुरु केलं होतं. मला चार डि.लीट पदव्या मिळाल्या. पण मी काही एवढा विद्वान नाहीए. पण मला माझ्या आयुष्यात जे शिकायला मिळालं संघ, विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून त्यातून मला समजलं की, मी लोकांसाठी समाजासाठी काम केलं पाहिजे.’

‘मला एका मुलाखतीत विचारण्यात आलं की, तुम्ही एवढं काम का करता. सगळ्यांना वाटतं की, यांना काही ‘माल’ मिळत असेल. मी तुम्हा सगळ्यांना सांगू इच्छितो की, मी 50 लाख कोटींचे वर्क ऑर्डर दिलेले आहेत. तुम्ही एकाही कंत्राटदाराला उभं करु शकत नाही की, जो म्हणेल काम करण्याआधी मला एक रुपया द्यावा लागला.’

‘जर थोडी जरी गडबड झाली… मी जेव्हा हायवे बनवतो एक्सप्रेस हायवे.. मी जेव्हा मुंबई-पुणे एक्सप्रेस वे बनवला होता तेव्हा माझ्यासोबत दोन मोठे कंत्राटदार बसले होते. 120 किमी वेगाने मर्सिडीज आम्ही चालवली. मी त्यांना म्हणालो की, कपमध्ये चहा टाकेन.. जर गाडीत चहाचा थेंब जरी पडला तर मी तुम्हाला सोडणार नाही.’

Nana Patekar : राजकारणात अजातशत्रू कसं असावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे नितीन गडकरी

‘आता मी हीच ट्रायल 180 किमीची दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेवर केली. जनता ही मालिक आहे. मी ट्रस्टी आहे. आपण देशासाठी काम केलं पाहिजे.’

‘मी काही साधू-संन्यासी नाही. पहिले माझं घर पाहतो मग माझं कुटुंब पाहतो आणि नंतर समाज आणि देशासाठी काम करतो. मी हेच म्हणतो की, मीही राजकीय नेता आहे मी देखील निवडणूक लढवतो. मी लोकांना सांगितलं आहे की, पोस्टर-बॅनर लावणार नाही, चहा नाही पाजणार, नाश्ता नाही देणार मी जाहीर करुन टाकलं आहे. तुम्हाला मत द्यायचं आहे तर द्या. मी माझ्या मतदारसंघात तसं कामही केलेलं आहे. त्यामुळे मला मतंही मिळतील. मी काही आमिष देऊ मतं मागणार नाही. मला हिंदू-मुस्लिम सगळे मतं देतील. सगळे माझ्यासोबत आहेत. कारण मी कामात काही भेदभाव केला नाही.’ असा किस्सा नितिन गडकरीं जाहीर कार्यक्रमात सांगितला.

    follow whatsapp