Suresh Dhas : करुणा मुंडेंच्या गाडीत 'तो' पिस्तूल कुणी ठेवला? सुरेश धस यांनी थेट नावच सांगितलं, म्हणाले...

Suresh Dhas On Walmik Karad: संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी एसआयटी दाखल केली. यातील काही कर्मच्याऱ्यांवर तुम्ही आक्षेप नोंदवला होता. मुख्यमंत्र्यांकडून याबाबत पुढे काय केलं जाईल, यावर प्रतिक्रिया देताना भाजपचे आमदार सुरेश धस म्हणाले,...

Suresh Dhas On Walmik Karad

Suresh Dhas On Walmik Karad

मुंबई तक

• 06:20 PM • 03 Jan 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

वाल्मिक कराडांबाबत सुरेश धस यांचं खळबळजनक विधान!

point

"करुणा मुंडे यांच्या गाडीत पिस्तुल ठेवणारी व्यक्तीसुद्धा..."

point

पत्रकार परिषदेत सुरेश धस नेमकं काय म्हणाले?

Suresh Dhas On Walmik Karad: संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी एसआयटी दाखल केली. यातील काही कर्मच्याऱ्यांवर तुम्ही आक्षेप नोंदवला होता. मुख्यमंत्र्यांकडून याबाबत पुढे काय केलं जाईल, यावर प्रतिक्रिया देताना भाजपचे आमदार सुरेश धस म्हणाले, वाल्मिक अण्णा कराड यांनी गडचिरोलीवरून एकाची बदली करून आणली आहे. त्याची स्वामिनिष्ठा त्यांनी करू नये. काही लोक त्यांच्याशी अति कनेक्टमध्ये आहेत. हे ही पुढे आलं आहे. करुणा मुंडे यांच्या गाडीत पिस्तुल ठेवणारी व्यक्तीसुद्धा साडी नेसलेली बीड जिल्ह्यातील पोलीस दलातील एक व्यक्ती होती. त्याचं नाव सुद्धा मला माहिती आहे. पण ते मी बाहेर सांगणार नाही. एसपींना सांगेन. तेली साहेबांवर ऑब्जेक्शन नाही. इतर काही अधिकाऱ्यांवर नाही. परंतु, खालचे जे क्लास 3 वाले कर्मचारी अधिकारी आहेत, त्यांच्यावर माझा ऑब्जेक्शन आहे. हे मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं आहे.

हे वाचलं का?

सुरेश धस पत्रकार परिषदेत नेमकं काय म्हणाले? 

करुणा मुंडेंच्या गाडीत आकाच्याच सांगण्यावर तो पिस्तोल ठेवण्यात आला होता. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता आणि काही दिवस त्या जेलमध्ये होत्या. या प्रकरणाच्या अनुषंगाने तुम्ही पोलीस अधिकाऱ्यांना भेटणार आहात का? या प्रश्नाचं उत्तर देताना धस म्हणाले, अॅडिशनल एसपींना भेटणार आहे. पोलीस दलातली बिंदू नामावली प्रमाणे अधिकारी कर्मचारी आहेत का, याबाबतचं पत्रही मी त्यांना देणार आहे. 

हे ही वाचा >> Mumbai Tak Chavdi : "धनंजय मुंडे पंकजा मुंडेंची फाईल घेऊन माझ्या घरी...", अंजली दमानीयांचं खळबळजनक विधान

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत बोलताना सुरेश धस म्हणाले, नैतिकच्या आधारावर पाहिलं तर, तर शंभर टक्के प्रकाश दादा सोळंके जे बोलले आहेत, त्याला माझं समर्थन आहे. आजच त्यांचा त्या प्रकरणाशी संबंध आहे, असं मी म्हणणार नाही. जोपर्यंत संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाची चौकशी पूर्ण होत नाही, चार्जशीट दाखल होत नाही, तोपर्यंत त्यांनी पदावर राहावं, असं मला वाटत नाही. त्यांनी बिन खात्याचे मंत्री म्हणून राहावं किंवा अजितदादा पवार यांनी त्यांना थोडसं बाजूला सरकावं. अशी एकंदरीत सर्व जनतेची भावना आहे. 

हे ही वाचा >> Viral Video: "मुंब्रा बंद करून टाकेन..."; मराठी भाषेवरून मुंब्य्रात राडा; मराठी तरुणालाच मागायला लावली माफी