BMC Election 2026: राज ठाकरेंनी दाखवलं अदानींचं 'मुंबईतील साम्राज्य' अन् सांगितला 'तो' धोका

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील जाहीर सभेत मुंबई आणि महाराष्ट्रातील अदानी ग्रुपचे नेमके किती प्रोजेक्ट आहेत हे दाखवत भाजपवर जोरदार टीका केली.

bmc election 2026 raj thackeray exposed adani empire in mumbai alleging it is an attempt to connect mumbai to gujarat

राज ठाकरेंनी दाखवलं अदानींचं 'मुंबईतील साम्राज्य'

मुंबई तक

• 10:13 PM • 11 Jan 2026

follow google news

मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना UBT आणि मनसे यांची आज (11 जानेवारी) मुंबईच्या शिवाजी पार्कात सभा पार पडली. या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी अत्यंत घणाघाती भाषण करत भाजपवर गंभीर आरोप केले. आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरेंनी भाजप हे अदानींच्या माध्यमातून मुंबई गिळण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला.
यावेळी राज ठाकरे सभेत व्हिडिओच्या माध्यमातून थेट अदानींचं साम्राज्यच दाखवलं. सुरुवातीला त्यांनी देशभरात अदानी ग्रुपचे किती प्रोजेक्ट आहे हे दाखवलं आणि त्यानंतर महाराष्ट्र आणि मुंबई महानगर क्षेत्रात (MMR) अदानी ग्रुपचे नेमके किती प्रोजेक्ट सुरू आहेत याचं प्रझेंटेशनच दाखवलं. त्यानंतर राज ठाकरेंनी भाजपवर अक्षरश: टिकेची झोड उठवली.

हे वाचलं का?

पाहा राज ठाकरे नेमकं काय म्हणाले...

'हे मी तुम्हाला सांगतोय ना.. हे तुम्हाला कशा प्रकारे तुम्हाला आवळलं जातंय याचा तुम्हाला काही अंदाज.. आपल्याला कळतंय हे काय चाललंय? वाढवणला बंदर येतंय. बाजूला विमानतळ.. विमानतळ कशासाठी.. तर मुंबई विमानतळावरचा कार्गो तिकडे नेणार. मुंबईतील इंटरनॅशनल आणि डोमेस्टिक विमानतळ हे नवी मुंबई विमानतळ बांधलंय ना तिकडे घेऊन जाणार.ही प्रोसेस हळूहळू सुरू झाली आहे.पुढे हा संपूर्ण विमानतळ विकायला काढणार..'

'अशी नाही ना आम्हाला मुंबई मिळवता येत तर आम्ही पैसे ओततो बदाबदा पैसे ओतते, जमिनी विकत घेतो.. या सरकारमध्ये जे बसलेत त्यांचं काय घेऊन बसलोय आपण.. ते काही तरी करू शकतात का? काहीच करू शकत नाही. डोक्यात गेलीए सत्ता..' 

'भूगोल समजून घ्या.. हे वाढवण बंदरापासून वर लगेच लागून गुजरात आहे. यांचं पहिल्यापासून जे डोक्यात होतं ना की, मुंबई ही गुजरातला न्यायची.. त्याआधी पालघर जिल्हा ताब्यात घ्यावा लागेल. ठाणे जिल्ह्याचा भाग ताब्यात घ्यावा लागेल तर मुंबईपर्यंत पोहोचता येईल.'

'हे सगळं करून मुंबई गुजरातला कशी जोडता येईल याच्यासाठीचा सगळा प्लॅन आहे. आम्ही बेसावध, आमच्या जातीपातीत भांडणं लावली जात आहेत. एकदा मुंबई हातातून गेली ना तर महाराष्ट्र झारखंडपेक्षा काही वेगळा करणार नाहीत हे. मुंबई ही तुमची राजधानी आहे, तुमची ताकद आहे. पण जो मस्तवाल पणा यांच्या अंगात शिरला आहे. की आम्ही काहीही करू कुठूनही मतदान आणू.. जे त्यांनी विधानसभेत केलं.. तेच आताही करणार.' असं म्हणत राज ठाकरेंनी भाजपवर जोरदार टीका केली.
 

    follow whatsapp