नाशिक: मराठीच्या भाषेच्या मुद्द्यावर एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंची निवडणुकीसाठी युती होणार की नाही याबाबत आतापर्यंत कोणीही उघडपणे भाष्य केलं नव्हतं. शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे किंवा मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सातत्याने हेच म्हणत होते की, योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ. मात्र, आता पहिल्यांदाच शिवसेना (UBT) आणि मनसेच्या युतीबाबत एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. ती देखील शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांच्याकडून.
ADVERTISEMENT
'शिवसेना-मनसेची ताकद ही फक्त मुंबईतच नाही तर महाराष्ट्रत आहे. त्यामुळे केवळ मुंबईतच नाही तर नाशिक, ठाणे, कल्याण-डोंबिवली येथे आम्ही एकत्र लढू.' असं मोठं विधान संजय राऊत यांनी केलं आहे. ते नाशिकमध्ये माध्यमांशी बोलताना केलं आहे.
पाहा संजय राऊत नेमकं काय म्हणाले
'राज ठाकरे चुकीचं काय बोलले? मुंबईसह महाराष्ट्रात म्हणतोय मी.. मुंबई तर ताकद आहेच. मुंबई महानगरपालिका ही ठाकरे बंधू एकत्र येऊन जिंकणार आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येऊन जिंकतील. नाशिकमध्ये सुद्धा आम्ही एकत्र लढणार आहोत, ठाण्यात आम्ही एकत्र लढणार आहोत.'
हे ही वाचा>> 'ठाकरे बंधूची युती अन् मुंबई...' उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांना सगळंच सांगून टाकलं
'कल्याण-डोंबिवलीत आम्ही एकत्र लढू. अशा अनेक महानगरपालिका आहेत मुंबईसह... जिथे आमच्या एकमेकांशी चर्चा सुरू आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची ताकद ही मराठी माणसाच्या एकजुटीची ताकद आहे.'
'आता कोणतीही अघोरी शक्ती आली तरी ही वज्रमूठ मराठी माणसाची तोडू शकत नाही.' असं म्हणत संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे.
उद्धव ठाकरेंकडून युतीसाठी सकारात्मक पावलं
राज ठाकरेंसोबत युती करावी यासाठी उद्धव ठाकरे हे मागील अधिकच सकारात्मक असल्याचं दिसून आलं आहे. मराठी भाषेच्या विजयी मेळाव्यानंतर दोन्ही ठाकरे बंधू हे राजकीय आणि कौटुंबिक पातळीवर देखील अधिक जवळ आल्याचं पाहायला मिळालं आहे.
हे ही वाचा>> 'एकत्र येऊ नये म्हणून यांच्या मालकाचे नोकर...' मनसेच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं आजवरचं सगळ्यात मोठं विधान
दरम्यान, काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंनी सामनाला जी मुलाखत दिली होती. त्यामध्ये त्यांनीही राज ठाकरेंसोबतच्या युतीबाबत मोठं विधान केलं होतं.
यावेळी संजय राऊतांनी त्यांना सवाल विचारलेला की, महापालिकेच्या निवडणुकीत राज आणि उद्धव एकत्र येणार का?
यावर उद्धव ठाकरे म्हणालेले की, 'यायला काय हरकत नाही. काहींना एकत्र आल्याने पोटशूळ उठलंय. महापालिका निवडणूक जरी असली तरी तुम्ही केवळ मुंबई आणि महाराष्ट्राचा वेगळा विचार करून चालणार नाही. एकत्र विचार करणं गरजेचं आहे. राज्य म्हणून प्रत्येक महापालिकेची स्वायत्त आहे. तिथं प्रत्येक युनिट शिवसेना आणि प्रत्येक पक्षाचा आहे. आता लढायचं तर नक्कीच आहे. महाराष्ट्रात अनेक अमराठी लोक राहतात, पण मी कोरोनाकाळात सर्व पाहिलं आहे. कोणी मुस्लिम होता म्हणून मदत केली नाही, असं झालेलं नाही. एवढंच नाहीतर मी ही हिंदू असल्याने कोरोनाकाळात जरा वेगळं वागवलं होतं.'
दरम्यान, या मुलाखतीनंतर काही दिवसातच उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाला थेट मातोश्रीवर जाऊन राज ठाकरेंनी त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या.
ADVERTISEMENT
