Jitendra Awhad : राज्यातील सर्वात मोठी बातमी आता समोर येत आहे. काल 17 जुलै रोजी झालेल्या गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता. त्या दोन्ही कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. यानंतर आता पोलिसांनी जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल करण्यामागचं कारण आता समोर आलं आहे, सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला अशी माहिती समोर येत आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : जितेंद्र आव्हाडांनी पोलिसांच्या गाडीसमोर केलं आंदोलन, पोलिसांवर गंभीर आरोप करत म्हणाले, "हे लोक तंबाखू मळून..."
रात्री राड्यात काय झालं?
दरम्यान, या झालेल्या राड्यात आव्हाडांचा कार्यकर्ता सुनील देशमुख, तर दुसरीकडे गोपीचंद पडळकर यांचा कार्यकर्ता सर्जेराव टकले या दोघांमध्ये तुंबळ हाणामारी झाली होती. नितीन देशमुख यांना शर्ट फाटेपर्यंत मारहाण केली. त्यानंतर आव्हाडांनी विधानभवनासमोर असलेल्या सुरक्षारक्षकांकडे न्यायाची मागणी केली. एवढंच नाही,तर आव्हाडांनी पोलिसांच्या गाडीसमोर ठिय्या आंदोलन केलं. त्यानंतर पोलिसांनी नितीन देशमुखला अटक केली. पोलिसांच्या कामगिरीवर आव्हाडांनी काही प्रश्न उपस्थित करत आरोप केले. त्यानंतर आव्हाडांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
आव्हाडांवर गुन्हा दाखल
जेव्हा आव्हाड गाडीच्या समोर आले तेव्हा त्यांनी आंदोलन केलं. त्यानंतर पोलिसांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना विचारून त्यांच्या कामात अडथळा आणल्याच्या प्रकरणावरून गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात दाखल केला असल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा : हुक्काबारमध्ये तरुण-तरूणी न्यूड अवस्थेत, व्हिडिओ सोशल मीडियावर केले शेअर, नेमकं रात्री काय घडलं?
या राड्यादरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारही त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांनी देखील जितेंद्र आव्हाडांसोबत पोलीस ठाण्यात जाऊन न्यायाची मागणी केली. त्यांचेही व्हिडिओ आता समोर येऊ लागले आहेत. 18 जुलै रोजी विरोधकांनी विधानभवनात या घडलेल्या घटनेचा निषेध केला आहे.
ADVERTISEMENT
