“उद्धव ठाकरे, गाड्या अडवून जोड्याने मारू”, ‘कलंक’वाद शिगेला

योगेश पांडे

11 Jul 2023 (अपडेटेड: 11 Jul 2023, 03:51 PM)

उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांना कलंक म्हटल्याने सुरु झालेला राजकीय वाद चांगलाच पेटला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज थेट गाड्या अडवू आणि नागपूरकर जनता तुम्हाला जोड्याने मारेल, असा इशारा दिला.

chandrashekhar bawankule criticized udhhav thackeray on kalank jibe devendra fadnavis maharashtra politics

chandrashekhar bawankule criticized udhhav thackeray on kalank jibe devendra fadnavis maharashtra politics

follow google news

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavsi) कलंक म्हटल्याने सुरु झालेला राजकीय वाद चांगलाच पेटला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी आज थेट गाड्या अडवू आणि नागपूरकर जनता तुम्हाला जोड्याने मारेल, असा इशारा दिला. (chandrashekhar bawankule criticized udhhav thackeray on kalank jibe devendra fadnavis maharashtra politics)

हे वाचलं का?

उद्धव ठाकरे यांनी केलेल्या विधानावर बावनकुळे यांनी संताप व्यक्त केला. ते म्हणाले, “उद्धव ठाकरे तुमचे संतुलन बिघडले असेल, तर मनोरुग्णालयात जा. नागपुरात मनोरुग्णालय आहे, तिथे जाऊन उपचार घ्या. तुम्ही बावचळले असाल, तर डॉक्टर बदला. परंतु, यापुढे जर देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलाल तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही. आता रस्त्यावर आंदोलन केले, पुढे तुमच्या गाड्या अडवल्याशिवाय राहणार नाही”, असा इशारा बावनकुळे यांनी दिला.

उद्धव ठाकरे कलंकित करंटा

“देवेंद्र फडणवीस हे कर्तृत्वाचे धनी आहेत. उद्धव ठाकरे हा कलंकित करंटा आहे. यापुढे तुम्ही पुन्हा असे काही बोललात तर नागपूरची जनता तुम्हाला जोड्याने बदडेल”, बावनकुळे ठाकरे यांना उत्तर देताना म्हणाले.

हे ही वाचा : मविआचं गणित इथेही बिघडलं, महायुतीचं पारडं जड; बंडाचा बसला असाही फटका

देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक, म्हणाले…

“उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी डेटा तयार केला. हायकोर्ट, सुप्रीम कोर्टापर्यंत आरक्षण टिकविले व परत मिळवून दिले. देशातील सर्वात मोठे मेट्रोचे नेटवर्क देवेंद्र फडणवीस यांनी उभारले . महाराष्ट्रातील जनतेला दुष्काळमुक्त करण्यासाठी जलयुक्त शिवारसारखी योजना सुरु केली. राज्यात लोड शेडिंग कमी करण्यासाठी योजना राबविली. एक रुपयांत पीक विमा योजना आणली. महत्वाकांक्षी समृद्धी महामार्ग तयार केला. ही देवेंद्र फडणवीस यांची दूरदृष्टी आहे”, असं कौतुक बावनकुळे यांनी केले.

“उद्धव ठाकरेंची सुरुवात माझे वडील, त्यापुढे माझा कॅमेरा, माझी पत्नी. वयाच्या ६० व्या वर्षी मी, माझा मुलगा, मंत्री, माझी पत्नी आणि मुख्यमंत्री असा असून तेच ‘कलंक’ आहेत”, असा हल्ला बावनकुळे यांनी केला.

हे ही वाचा : ‘उद्धव ठाकरेंना पुन्हा आरोग्यावरुन डिवचलं’, देवेंद्र फडणवीस म्हणाले; तुम्हाला तर..

“ठाकरेनी मराठा समाजाचे, ओबीसींचे आरक्षण घालविले. स्वत:च्या अहंकारासाठी जलयुक्त शिवार योजना बंद पाडली. कमिशन मिळत नसल्याने मेट्रो प्रकल्पाची कामे बंद पाडली. कोरोनाच्या काळात महाराष्ट्राला अंधारात लोटले.. बरेच कलंकित कामे केली”, असा आरोप बावनकुळे यांनी ठाकरे यांच्यावर टीका करताना केला.

संभाजीनगर, धाराशीव, अहिल्यादेवीनगर अशी नावे देऊन अभिमानाने महाराष्ट्राचे नाव उंचविणारे देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदे आणि त्याचवेळी संभाजीनगरला संभाजीनगर म्हणणार नाही अशांची साथ देणारे कलंकित व्यक्ती म्हणजे उद्धव ठाकरे. स्वातंत्र्यवीरांचा अपमान करणाऱ्यांची साथ देणारे उद्धव ठाकरे कलंकित करंटे आहेत. जिहाद्यांना नक्षलवाद्यांच्या मुव्हमेंटला संरक्षण देणारा त्याच्यावर कुठलीही कारवाई न करणारा कलंकित व्यक्ती उद्धव ठाकरे आहेत”, असंही ते म्हणाले.

    follow whatsapp