'जनतेने, विरोधी पक्षांनी फडणवीसांचे जाहीर आभार मानायला हवेत..' बावनकुळेंनी का केली मागणी?

Chandrashekhar Bawankule On Devendra Fadanvis : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या दावोसच्या दौऱ्यावर आहेत. त्याठिकाणी जाऊन महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक आणण्यात ते यशस्वी झाल्याचा दावा सत्ताधाऱ्यांतर्फे केला जात आहे. मात्र विरोधक यावर टीका करत आहेत. याविषयी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Chandrashekhar Bawankule On Devendra Fadanvis

Chandrashekhar Bawankule On Devendra Fadanvis

मुंबई तक

23 Jan 2026 (अपडेटेड: 23 Jan 2026, 02:35 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

महाराष्ट्राच्या जनतेने, विरोधी पक्षांनी फडणवीसांचे जाहीर आभार मानायला हवेत

point

चंद्रशेखर बावनकुळेंची मागणी

Chandrashekhar Bawankule On Devendra Fadanvis : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या दावोसच्या दौऱ्यावर आहेत. त्याठिकाणी जाऊन महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक आणण्यात ते यशस्वी झाल्याचा दावा सत्ताधाऱ्यांतर्फे केला जात आहे. मात्र विरोधक यावर टीका करत आहेत. एका बाजूला काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी दावोस दौऱ्याची श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी केली आहे, तर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी फडणवीस हे दावोसला मटका खेळण्यासाठी गेल्याची टीका केली होती. याविषयी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दावोसमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मोठं कर्तृत्व केलं असून राज्याचे जनतेने आणि विरोधी पक्षाने फडणवीसांचे जाहीर आभार मानायला हवेत असं ते म्हणाले.

हे वाचलं का?

हे ही वाचा : ‘बदललेल्या राजकारणात कधीतरी थोडी लवचिक भूमिका घेतली तरी ती माझ्या…’, राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य

'जनतेने, विरोधी पक्षांनी फडणवीसांचे जाहीर आभार मानावे'

दावोसमधील गुंतवणूकीविषयी विरोधकांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. त्याविषयी प्रतिक्रिया देताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, 'विरोधक प्रत्येकवेळी राजकीय आरसा ठेवून काम करत असतात. कधीतरी विरोधकांनी सुधरलं पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांनी दावोसमध्ये गेल्या तीन-चार दिवसांत केलेलं कर्तृत्व खूप मोठं आहे. यासाठी महाराष्ट्राच्या जनतेने, विरोधी पक्षांनी आणि सर्वांनी मिळून फडणवीसांचे जाहीर आभार मानायला हवेत. त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे आणि महाराष्ट्राची मजबूती दाखवली पाहिजे.'

'राज्यातील 14 कोटी जनता फडणवीसांना सलाम करते'

दावोसमधून किती गुंतवणूक महाराष्ट्रात आली याची श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी केली होती. याविषयी बावनकुळे म्हणाले की, 'फडणवीस हे विकसित महाराष्ट्राच्या संकल्पाला घेऊन काम करत आहेत. महाराष्ट्राला सुजलाम-सुफलाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्रातील 50 लाख तरुणांना रोजगार देण्याचा प्रयत्न ते करत आहेत. अशा वेळी फडणवीसांच्या व्यक्तिमत्त्वावर शंका घेणे योग्य नाही. दावोसमध्ये महाराष्ट्राला पुढं नेण्याचं जे कर्तृत्व फडणवीसांनी केलं आहे, त्याला राज्यातील 14 कोटी जनता सलाम करत आहे. त्यामुळे सतेज पाटलांच्या मागण्यांविषयी चिंता करण्याची गरज नाही. 

हे ही वाचा : बदलापूर: शिंदेसेना-भाजप वाद विकोपाला; शिवसेनेच्या नगरसेवकाला भाजप पदाधिकाऱ्याकडून बेदम मारहाण! VIDEO

दावोसमधून राज्यात किती गुंतवणूक आली?

स्वित्झर्लंडमधील दावोस येथे दरवर्षी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची परिषद घेतली जाते. यावर्षी ही 56 वी परिषद असून 19 ते 23 जानेवारी 2026 दरम्यान ती पार पडत आहे. याठिकाणाहून राज्यात मोठी गुंतवणूक आली आहे. दावोसमधून 30 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असून, याव्यतिरिक्त 7 ते 10 लाख कोटींच्या गुंतवणुकीवर प्राथमिक चर्चा पूर्ण झाली असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.  

    follow whatsapp