CJP च्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कडक सुरक्षा, 5000 जवान तैनात; कलम 163 लागू

मुंबई तक

20 Jul 2026 (अपडेटेड: 20 Jul 2026, 09:02 AM)

cjp chalo sansad march : NEET पेपर लीक आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावर CJP ने 'चलो संसद' मार्चची घोषणा केली आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत BNSS कलम 163 लागू करत कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

cjp chalo sansad march

cjp chalo sansad march

Google CTA

बातम्या हायलाइट

point

CJP च्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कडक सुरक्षा

point

500 जवान तैनात; कलम 163 लागू

cjp chalo sansad march : देशातील NEET पेपर लीक विरोधात कॉकक्रोच जनता पार्टी (CJP)ने आंदोलन अधिक तीव्र करत 20 जुलै 2026 रोजी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 'चलो संसद' मोर्चाची घोषणा केली आहे. संसद अधिवेशनाला सुरुवात होत असतानाच या आंदोलनामुळे राजधानी दिल्लीत सुरक्षा व्यवस्था मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे. या मार्चला पाठिंबा देण्यासाठी देशभरातील विद्यार्थी, विविध स्पर्धा परीक्षांचे तयारी करणारे परिक्षार्थी आणि त्यांच्या पालकांनी 19 जुलैच्या सायंकाळपासून जंतर-मंतर येथे जमण्यास सुरुवात केली होती. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संसद भवन आणि परिसरात विशेष सतर्कता बाळगण्यात आली असून दिल्ली पोलिसांसह गुप्तचर यंत्रणाही पूर्णपणे अलर्टवर आहेत.

हे वाचलं का?

हेही वाचा : नरेंद्र मोदी की राहुल गांधी 2029 मध्ये पंतप्रधान कोण? अंकशास्त्रज्ञाच्या अंदाजानं उडाली खळबळ

अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षा यंत्रणा

सुरक्षा व्यवस्था अधिक प्रभावी करण्यासाठी जंतर-मंतर, पार्लियामेंट स्ट्रीट, सेंट्रल व्हिस्टा, कनॉट प्लेस आणि शंकर चौक परिसरात थ्री-टियर सुरक्षा ग्रिड उभारण्यात आला आहे. या व्यवस्थेत दिल्ली पोलिसांच्या दोन सुरक्षा स्तरांसह पॅरामिलिटरी दलाचा एक स्वतंत्र सुरक्षा स्तर तैनात करण्यात आला आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तातडीने प्रतिसाद देण्यासाठी रॅपिड रिस्पॉन्स पथके चोवीस तास सज्ज ठेवण्यात आली आहेत. संसदेच्या अधिवेशनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षा यंत्रणा सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

हेही वाचा : नरेंद्र मोदी की राहुल गांधी 2029 मध्ये पंतप्रधान कोण? अंकशास्त्रज्ञाच्या अंदाजानं उडाली खळबळ

मोर्चासाठी ना परवानगी मागण्यात आली आहे, ना ती देण्यात आली : दिल्ली पोलीस 

नवी दिल्लीचे डीसीपी सचिन शर्मा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर सार्वजनिक सूचना जारी करत या प्रकारच्या कोणत्याही मोर्चासाठी ना परवानगी मागण्यात आली आहे, ना ती देण्यात आली असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, संसदेचे पावसाळी अधिवेशन आणि प्रस्तावित आंदोलन लक्षात घेऊन नवी दिल्ली परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) अंतर्गत कलम 163 लागू करण्यात आले आहे. या आदेशानुसार पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र जमणे, मोर्चा काढणे, आंदोलन करणे किंवा धरणे देणे यावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, पूर्वपरवानगी घेऊन केवळ जंतर-मंतर येथे शांततापूर्ण आंदोलन करण्याची मुभा असेल.

आदेशाचे उल्लंघन केल्यास गुन्हे दाखल होणार 

दिल्ली पोलिसांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 223 तसेच इतर संबंधित कायदेशीर तरतुदींनुसार गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात येईल. दरम्यान, CJP ने तीन प्रमुख मागण्यांवर सरकारविरोधात आंदोलन छेडले आहे. NEET पेपर लीक आणि इतर स्पर्धा परीक्षांतील गैरव्यवहारांची निष्पक्ष चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी, या प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशा मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या आहेत.