राम मंदिरातील चोरीबाबत राहुल गांधींचं पीएम मोदींना पत्र, नेमंक काय म्हणाले?

मुंबई तक

19 Jul 2026 (अपडेटेड: 19 Jul 2026, 02:49 PM)

rahul gandhi letter to pm modi : राम मंदिरातील चोरीप्रकरणी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून स्वतंत्र चौकशीची मागणी केली आहे. दरम्यान, पोलिसांनी ट्रस्टच्या आर्थिक व्यवहारांशी संबंधित व्यक्तींच्या भूमिकेचाही तपास सुरू केला आहे.

rahul gandhi letter to pm modi

rahul gandhi letter to pm modi

Google CTA

बातम्या हायलाइट

point

"आपले मौन अस्वीकार्य आहे"

point

राम मंदिरातील चोरीबाबत राहुल गांधींचं पीएम मोदींना पत्र

rahul gandhi letter to pm modi ayodhya ram mandir donation theft case : राम मंदिरातील चोरीप्रकरणी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून स्वतंत्र चौकशीची मागणी केली आहे. मंदिरातील चोरी प्रकरणात आठ आरोपींना अटक केल्यानंतर पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवली असून मंदिराच्या दैनंदिन आर्थिक व्यवहारांशी संबंधित सर्व व्यक्तींच्या भूमिकेची चौकशी सुरू केली आहे. यासोबतच ट्रस्टमधील काही वरिष्ठ पदाधिकारी तसेच वेळोवेळी ट्रस्टच्या कामकाजाशी संबंधित राहिलेल्या सरकारी अधिकाऱ्यांची भूमिकाही तपासाच्या कक्षेत आली आहे. दरम्यान, राहुल गांधी यांनी पीएम मोदींना लिहिलेल्या पत्रात काय म्हटलंय? जाणून घेऊयात..

हे वाचलं का?

हेही वाचा : "त्यांना ब्लड प्रेशरचा त्रास, कृपया ...", अभिजीत दिपकेंचं आई-वडिलांबाबत सर्वांना महत्त्वाचं आवाहन

राहुल गांधी यांची राम मंदिर चोरीसंदर्भात पोस्ट 

"पंतप्रधानजी, कोट्यवधी भाविकांनी आपल्या कष्टाच्या कमाईतून श्रद्धेने श्रीराम मंदिरात देणग्या अर्पण केल्या आहेत. त्या देणग्यांमधील कथित चोरीची बाब आता कोणापासूनही लपून राहिलेली नाही. या ट्रस्टमधील प्रत्येक सदस्याची नियुक्ती आपल्या सरकारने केली आहे. त्यामुळे या कथित देणगी चोरीप्रकरणी आपले मौन अस्वीकार्य आहे. या प्रकरणाची तात्काळ स्वतंत्र चौकशी करण्यात यावी, संपूर्ण आर्थिक हिशोब सार्वजनिक करण्यात यावा आणि दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी. आपल्या सरकारची विश्वासार्हता आता आपण या प्रकरणात कोणती भूमिका घेता आणि काय कारवाई करता, यावर अवलंबून आहे.", असं कॅप्शन राहुल गांधी यांनी ट्वीटरवर पत्र पोस्ट करताना दिलं आहे. 

राहुल गांधींनी पीएम मोदींना लिहिलेलं पत्र जसंच्या तसं 

मा. पंतप्रधान महोदय,

श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टमध्ये हजारो कोटी रुपयांच्या कथित आर्थिक गैरव्यवहाराची व देणग्यांच्या कथित चोरीची माहिती आपल्याला आहे. श्रद्धा, भक्ती आणि विश्वासाने आपल्या कष्टाच्या कमाईतून देणगी देणाऱ्या लाखो भाविकांना या कथित प्रकारामुळे फसवणूक झाल्याची भावना निर्माण झाली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आपण संसदेत या ट्रस्टच्या स्थापनेची घोषणा केली होती. मात्र, या ट्रस्टमधील सर्व सदस्यांची नियुक्ती आपल्या सरकारनेच केली आहे. ट्रस्टमधील अनेक सदस्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS), विश्व हिंदू परिषद (VHP) आणि त्यांच्याशी संबंधित संघटनांशी संलग्न असल्याचे सार्वजनिकरीत्या ज्ञात आहे. तसेच, ट्रस्टचे माजी सरचिटणीस, ज्यांची प्रतिमा नंतर वादग्रस्त ठरली, ते देखील आपल्या निकटवर्तीयांपैकी असल्याचे म्हटले जाते. अशा गंभीर कथित प्रकारासमोर आपले मौन अस्वीकार्य आहे. या प्रकरणात जबाबदारी निश्चित करणे आणि न्याय मिळवून देणे हे आपले कर्तव्य आहे.

श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या सर्व आर्थिक व्यवहारांची, तसेच रोख रक्कम, सोने, चांदी आणि इतर सर्व प्रकारच्या अर्पणांच्या हाताळणीची स्वतंत्र व सर्वंकष चौकशी तात्काळ करण्याचे आदेश द्यावेत, अशी आमची आपणास विनंती आहे. या चौकशीचा अहवाल आणि ट्रस्टचे संपूर्ण आर्थिक हिशोब सार्वजनिक करण्यात यावेत, जेणेकरून प्रत्येक भाविकाला त्याने अर्पण केलेली देणगी कशा प्रकारे वापरण्यात आली, हे समजू शकेल. या प्रकरणात कोणताही व्यक्ती कितीही प्रभावशाली किंवा कोणत्याही पदावर असला तरी तो दोषी आढळल्यास त्याच्यावर कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी. आपल्या सरकारची आणि ट्रस्टची विश्वासार्हता आपण या प्रकरणात किती पारदर्शकपणे आणि किती वेगाने कारवाई करता, यावर अवलंबून आहे. संपूर्ण देशातील नागरिक याकडे लक्ष ठेवून आहेत.

हेही वाचा : उद्धव ठाकरेंचे किती फोन आले? कोणते नेते थेट संपर्कात? अभिजीत दिपकेंनी थेट सांगितलं

जय हिंद!

पोलीस तपासात काय समोर आलं? 

पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, मंदिरात भाविकांकडून देण्यात येणाऱ्या रोख देणग्यांची मोजणी करण्यासाठी सुमारे 50 कर्मचारी कार्यरत होते. या कर्मचाऱ्यांची नियुक्ती ट्रस्टचे पदाधिकारी किंवा त्यांच्याशी संबंधित व्यक्तींच्या शिफारशीवर करण्यात आली होती. तपास यंत्रणांनी आता या सर्व कर्मचाऱ्यांची पार्श्वभूमी तपासण्यास सुरुवात केली आहे. रोख रकमेची मोजणी करण्याची जबाबदारी मिळाल्यानंतर या कर्मचाऱ्यांपैकी कोणाकडे त्यांच्या ज्ञात उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता आढळली आहे का, याचीही चौकशी केली जात आहे.

आठ आरोपींपैकी सहा जणांविरोधात थेट पुरावे मिळाले

तपास अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अटक करण्यात आलेल्या आठ आरोपींपैकी सहा जणांविरोधात थेट पुरावे मिळाले आहेत. या फुटेजमध्ये देणगीची मोजणी सुरू असताना संबंधित आरोपी नोटांची बंडले कपड्यांमध्ये, खिशात आणि बुटांमध्ये लपवत असल्याचे दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे. ही घटना मंदिरातील पिलग्रिम फॅसिलिटेशन सेंटरमध्ये घडल्याचे सांगितले जात आहे, जिथे देणगीची मोजणी केली जाते. या प्रकरणात श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या तक्रारीवरून 25 जून रोजी एफआयआर नोंदविण्यात आला होता.