Abhijeet Dipke on Uddhav Thackeray phone calls : नीट पेपरफुटीसंदर्भात सरकारला जाब विचारण्यासाठी आणि संबंधित मंत्र्यांनी जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्यावा, या मागणीसाठी सोनम वांगचुक गेल्या 20 दिवसांपासून उपोषणाला बसले होते. मात्र, शनिवारी सकाळी (दि.18) सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी उपोषणस्थळावरुन हटवलं आणि प्रकृती बिघडल्याने त्यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दरम्यान, त्यानंतर आता कॉकरोज जनता पार्टीचे अभिजीत दिपके त्याठिकाणी उपोषणासाठी बसले आहेत. दरम्यान, यावेळी त्यांनी 'मुंबई Tak' ला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना आंदोलनादरम्यान महाराष्ट्रासह देशातील कोणत्या नेत्यांनी फोन करुन चौकशी केली? उद्धव ठाकरे यांनी किती फोन केले? कोणी-कोणी पाठिंबा दिला? यासंदर्भात दिपके यांनी भाष्य केलं. ते नेमकं काय म्हणाले? हे जाणून घेऊयात...
ADVERTISEMENT
हेही वाचा : 'सफदरजंग रुग्णालयावर विश्वास नाही...' वांगचुक यांच्या पत्नीची उच्च न्यायालयात धाव
उद्धव ठाकरे यांचे किती फोन आले? अभिजीत दिपके यांचं उत्तर
"मला सर्वात जास्त आभार कोणाचे मानायचे असतील तर उद्धव ठाकरेंचे मानायचे आहेत. मागील अनेक दिवसांपासून ते आमच्या संपर्कात आहेत. ते मला स्वत:च्या मुलाप्रमाणे बोलले. मी तुला अरे-तुरे करेन म्हणाले. कारण मला तू माझ्या मुलासारखाच आहे. स्वत:ची काळजी घे असं आवाहनही त्यांनी केलं. सोनम वांगचुक हे उपोषणाला बसले होते, तेव्हा ते त्यांच्याबाबत विचारपूस करत होते. सोनम वांगचुक यांना काही झालं नाही पाहिजे, अशी त्यांची भावना होती. काहीही मदत लागली तरी मी फक्त एक कॉल दूर आहे. त्यांच्याशी सतत बोलणं झालं. गरज पडली तर मी तिथे येईल, असं आश्वासही उद्धव ठाकरेंनी दिलं होतं. उद्धव ठाकरेंचे जवळपास रोज फोन येतात. त्यांचा आम्हाला खास सपोर्ट आहे." असं अभिजीत दिपके म्हणाले आहेत..
हेही वाचा : बायकोच्या वाढदिवसानिमित्त सरप्राईज द्यायला गेला अन् गमावला जीव, नेमकं काय घडलं?
कोण-कोणत्या नेत्यांनी पाठिंबा दिला?
यावेळी इतर विरोधी पक्षातील नेत्यांचाही अभिजीत दिपके यांनी उल्लेख केला. सुप्रिया सुळे यांनी भेटून कोणतीही मदत लागल्यास सांगण्याचे आश्वासन दिल्याचे त्यांनी सांगितले. तसेच महुआ मोइत्रा यांच्याकडूनही नियमित फोन येत असल्याचे त्यांनी म्हटले. राहुल गांधी स्वतः आले नसले तरी त्यांच्या वतीने पवन खेडा भेटल्याचे आणि आंदोलनाला पाठिंबा असल्याचा संदेश दिल्याचे दिपके यांनी सांगितले. विविध विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून सातत्याने पाठिंबा मिळत असल्याचे सांगताना उद्धव ठाकरे यांचा मात्र विशेष आणि सातत्यपूर्ण संपर्क असल्याचे त्यांनी पुन्हा अधोरेखित केले.
पुढे बोलताना अभिजीत दिपके म्हणाले, देशात कोणतेही आंदोलन सुरु असले की, तेथे हिंदू धर्माचा अपमान होतोय.. देशविरोधी घोषणा दिल्या जात आहेत. अशा दरवेळीच्या स्क्रिप्टने त्यांना बदनाम केलं जातं. जेएनयूपासून हा प्रकार सुरु झाला. शेतकरी आंदोलनातही अशाच प्रकारे प्रयत्न झाले. डॉक्टरांनाही पाकिस्तानशी जोडून देशद्रोही म्हणण्यात आलं. कोणतेही लोकं देशात आवाज उठवतात. तेव्हा भाजप समर्थक हिंदू विरोधी आहेत, असं म्हणतात. आमच्या स्टेजवरुन एकही देशविरोधी घोषणा दिली गेलेली नाही. तसं असेल तर पुरावा द्या, असं आव्हानही अभिजीत दिपके यांनी केलं.
ADVERTISEMENT












