CJP Protest : दिल्लीत आंदोलकांची धरपकड, अभिजीत दिपके कधी पोहोचणार?

मुंबई तक

10 Oct 2026 (अपडेटेड: 10 Oct 2026, 09:08 AM)

आज (10 ऑक्टोबर) होणाऱ्या सीजेपीच्या आंदोलनासाठी आंदोलक जमायला सुरुवात झाली आहे. मात्र काही आंदोलकांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

CJP Protest Delhi

CJP Protest Delhi

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

दिल्लीत आंदोलकांची धरपकड

point

अभिजीत दिपके कधी पोहोचणार?

CJP Protest Delhi : दिल्लीच्या जंतरमंतरवर 'कॉकरोच जनता पार्टी'च्या (CJP) आंदोलनासंबंधी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आज (10 ऑक्टोबर) होणाऱ्या सीजेपीच्या आंदोलनासाठी आंदोलक जमायला सुरुवात झाली आहे. मात्र काही आंदोलकांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

हे वाचलं का?

अभिजीत दिपके कधी पोहोचणार?

या आंदोलनात सहभागी होण्यासाठी CJP चे संस्थापक अभिजीत दिपके मुंबईहून दिल्लीकडे रवाना झाले आहेत. ते मुंबईच्या फोर सीजन्स हॉटेलमधून विमानतळासाठी निघाले असून, ते सकाळी 10 वाजेपर्यंत दिल्लीत पोहोचण्याची शक्यता आहे, अशी माहिती पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याने दिली आहे.

हे ही वाचा : CJP Protest : मेट्रो बंद, 75 रेल्वे रद्द, पोलिसांचा कडक पहारा...दिल्लीत काय घडतंय?

ड्रोनच्या सहाय्याने नजर

या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक करण्यात आली असून, तिथे दिल्ली पोलीस आणि रॅपिड ॲक्शन फोर्सचे (RAF) जवान तैनात करण्यात आले आहेत. तसेच सुरक्षा कर्मचाऱ्यांनी स्थानक परिसरात मार्च केला असून, ड्रोनच्या साहाय्याने संपूर्ण परिसरावर कडक नजर ठेवली जात आहे. 

हे ही वाचा : Personal Finance: Mutual Fund कंपनी बंद पडली तर तुमचे SIP मध्ये गुंतवलेले पैसे बुडतात का?

जवानांच्या गणवेशावर बॉडी कॅमेरे

कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि पारदर्शकतेसाठी दिल्ली पोलिसांच्या जवानांच्या गणवेशावर बॉडी कॅमेरे बसवण्यात आले आहेत, जे अंधारातही काम करण्यास सक्षम आहेत. धक्काबुक्की किंवा हाथापाईच्या प्रसंगी पोलिसांवर होणाऱ्या आरोपांना स्पष्ट पुरावे देऊन आळा घालण्यासाठी हे कॅमेरे प्रत्येक हालचालीची अचूक नोंद करत आहेत.