Personal Finance: Mutual Fund कंपनी बंद पडली तर तुमचे SIP मध्ये गुंतवलेले पैसे बुडतात का?
Mutual Fund कंपनी बंद पडल्यास गुंतवणूकदारांचे पैसे बुडतात का आणि फंड दुसऱ्या कंपनीकडे गेल्यास काय होतं, हे जाणून घ्या याबाबत सविस्तर माहिती.
ADVERTISEMENT

Personal Finance Mutual Fund Money: Mutual Fund मध्ये गुंतवणूक करणाऱ्या अनेकांना एक प्रश्न पडतो, तो म्हणजे ज्या कंपनीच्या माध्यमातून आपण पैसे गुंतवले आहेत तीच कंपनी बंद पडली तर आपल्या गुंतवणुकीचं काय होणार? आयुष्यभराची बचत बुडेल का, पैसे परत मिळतील का, की दुसरी कंपनी फंडाचा ताबा घेईल? याचं उत्तर समजून घेण्यासाठी Mutual Fund कंपनी आणि त्या कंपनीच्या फंडात असलेल्या गुंतवणुकीतील फरक जाणून घेणं महत्त्वाचं आहे. कंपनी बंद पडली म्हणजे गुंतवणूक आपोआप बुडते, असं नाही.
Mutual Fund कंपनी बंद पडली तर पैशांचं काय होतं?
भारतात Mutual Fund क्षेत्रावर Securities and Exchange Board of India म्हणजेच SEBI यांचं नियमन असतं. Mutual Fund मध्ये गुंतवलेले पैसे केवळ त्या फंडाचं व्यवस्थापन करणाऱ्या Asset Management Company (AMC) च्या मालमत्तेचा भाग नसतात. संबंधित योजनेनुसार फंडातील रक्कम शेअर्स, बाँड्स आणि इतर आर्थिक साधनांमध्ये गुंतवलेली असते. त्यामुळे AMC च्या व्यवसायात अडचण आली, तरी गुंतवणूकदारांचे पैसे थेट कंपनीच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरले जातात, असं समजणं चुकीचं ठरेल.
मात्र, याचा अर्थ गुंतवणुकीची पूर्ण हमी मिळते असा नाही. फंडातील मालमत्तेच्या बाजारभावात घट झाली असेल, तर गुंतवणूकदारांना अपेक्षेपेक्षा कमी रक्कम मिळू शकते.
1. दुसरी कंपनी फंडाचा ताबा घेऊ शकते
एखादी Asset Management Company (AMC) आर्थिक अडचणीत आली किंवा तिला व्यवसाय सुरू ठेवणं शक्य नसेल, तर संबंधित Mutual Fund योजनांचं व्यवस्थापन दुसऱ्या AMC कडे सोपवलं जाऊ शकतं. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांचे युनिट्स कायम राहू शकतात आणि नवीन कंपनी फंडाचं व्यवस्थापन करू शकते.
