Maharashtra Congress Committee Press Conference : "सरकारमध्ये जुन्या आणि नव्यांचा संग्राम झाला आहे.गंगा पवित्र होऊन निघते आणि नर्मदा अपवित्र होऊन दिल्लीतून निघते. सगळे भ्रष्टाचारी या मंत्रिमंडळात आहेत. ज्यांच्या म्होरक्या त्यांच्यावर गंभीर आरोप होते, त्यांना थेट सहभागी करून तिजोरीची चावी दिली जाते, ज्याला जनाची नाही त्याला मनाची कशी असेल. जे काही धस दोघांच्या भेटीने टारगेट झाले, त्यातून लोकांच्या नजरेतून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. यातून काही निष्पन्न निघणार नाही. सरकार गेंड्याच्या कातडीचे आहे. इतर महाराष्ट्रात स्पर्धा आहे, जो जास्त खाईल, तो मोठ्या पदावर जाईल. त्यामुळे कारवाई होईल असे वाटत नाही, असं म्हणत काँग्रेसचे नेते आणि माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. ते काँग्रेसच्या नव्या प्रदेशाध्यक्षांच्या (हर्षवर्धन सपकाळ) पदग्रहण सोहळ्यात बोलत होते.
ADVERTISEMENT
विजय वडेट्टीवार आमदारांच्या सुरक्षेच्या प्रश्नाबाबत म्हणाले, सरकार बदललं की सुरक्षेचा दहावा घेतला जातो. कदाचित गाढवा घेतला गेला असेल. शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटली म्हणून त्यांना सुरक्षा दिली. या खर्चावर होत असलेली उधळपट्टी थांबवत असेल तर त्यात गैर काय? सुरक्षेच्या नावाखाली अतिरिक्त बोजा पडतो. बुलढाण्याचा आमदाराने गाडी धुवायला लावली. त्यामुळे याचा अर्थ वेगळा काढण्यापेक्षा सर्वांचा विचार करून ज्याला गरज आहे, त्याला ती सुरक्षा द्यावी. नको त्या मंडळांना सुरक्षा दिली जातात,ही भूमिका ठेऊ नये.
हे ही वाचा >> Santsoh Deshmukh Case : "संतोष देशमुख हत्याकांड अवैध संबंधांतून घडलंय असं दाखवण्याचा प्लॅन होता"
वैद्यकीय मदत कक्षावर बोलताना वडेट्टीवार म्हणाले, मी प्रत्येक गोष्टीकडे निगेटिव्ह बघत नाही. मुख्यमंत्री असल्यापासून काही लोकांना फायदा झाला होता. सरकारची तोंड दोन दिशेला आहेत हे दिसत आहे.दोन तोंड एका बाजूला आणि एक तोंड एका बाजूला. त्रिमूर्ती दिसत नाही. मात्र किमान आरोग्यासाठी दक्ष आहेत. फार मोठा गैरप्रकार मुख्यमंत्री आरोग्य सहाय्यता निधी देण्यात आला होता, असे गैरप्रकार होऊ नये त्यामुळे असे दोन कक्ष काढल्याने एकमेकांकडे लक्ष देत येईल. नॅनो युरिया खताबाबत बोलताना वडेट्टीवार म्हणाले, तिजोरीचा चुराडा करायचा आणि मंत्र्यांची घर भरली जात असतील तर सखोल चौकशी व्हावी. शेतकऱ्यांनी नॅनो युरियाची मागणीच केली नाही.
काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ काय म्हणाले?
"माझ्यासारख्या एक सर्वसामान्य कार्यकर्त्याचा पार्टीने खूप मोठा सन्मान केला आहे. बूथवर मतदारांच्या वोटर्स स्लिप वाटणे, बूथ एजंट म्हणून काम करणे. दोन वेळ जिल्हा परिषद सदस्य, विधानसभेचा सदस्य आणि गेल्या बारा वर्षापासून अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचा पदाधिकारी या नात्यानं मला वेगवेगळ्या जबाबदाऱ्या मिळाल्या. दरम्यानच्या काळात सामाजिक सांस्कृतिक क्रिडा क्षेत्रात वेगवेगळी रचनात्मक आणि संघर्षात्मक कामं करता आली. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना मी माझ्या घरातील राजकीय प्रकियेतील पहिलाच कार्यकर्ता आहे.
हे ही वाचा >> Mahayuti : एकनाथ शिंदेंच्या 20 आमदारांची Y सुरक्षा काढली, महायुतीमधील धुसफूस आणखी वाढणार?
अशा परिस्थितीत प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देणे, हा माझ्या आयुष्यातील सुवर्ण अक्षराने नोंदवण्याचा क्षण आहे. माझ्या पहिल्या राजकीय प्रवासापासून जे साक्षी आहेत आणि मला भावासारखे आहेत, ज्यांच्याकडून मी पदभार स्वीकारत आहे, असे नाना भाऊ पटोले याठिकाणी आहेत. काँग्रेसने याआधी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या मिळाल्या. रमेश चेन्निथला देखील हजर आहेत. मी आनंद व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळात जाण आणि मान ठेऊन काम करेन. जातीवादीच्या विरोधात काम करेन, अशी मोठी प्रतिक्रिया हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलीय.
ADVERTISEMENT











