Zilla Parishad Election Result LIVE: प्रत्येक जिल्हा परिषदेचा निकाल, पाहा आता तुमचा नवा जिल्हा परिषद सदस्य कोण?

Zilla Parishad Election Result LIVE: जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याने परिस्थिती बदलली. पुणे जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात प्रचाराचा जोर कमी झाला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर प्रमुख नेत्यांनी प्रचारसभा टाळल्या होत्या.

Zilha Parishad Election Result

Zilha Parishad Election Result

मुंबई तक

09 Feb 2026 (अपडेटेड: 09 Feb 2026, 04:55 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

प्रत्येक जिल्हा परिषदेचा निकाल

point

पाहा आता तुमचा नवा जिल्हा परिषद सदस्य कोण?

Zilla Parishad Election Result LIVE : राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी झालेल्या मतदानाचा निकाल आज जाहीर होणार आहे. या निकालातून कोणत्या पक्षाला यश मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार असून साधारण चार ते पाच तासांत निकालाचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांतील जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांसाठी सरासरी 68.25 टक्के मतदान झाले होते. ग्रामीण भागातील विकासकामांच्या दृष्टीने पंचायत समित्या व जिल्हा परिषदा महत्त्वाच्या मानल्या जातात. त्यामुळे या ठिकाणी सत्ता कुणाच्या हाती जाणार, हे आज स्पष्ट होणार आहे.

हे वाचलं का?

पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण या भागांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात कोणाची सरशी होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. यापूर्वी झालेल्या नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला होता. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला चांगले यश मिळाले होते. मात्र, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याने परिस्थिती बदलली. पुणे जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात प्रचाराचा जोर कमी झाला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर प्रमुख नेत्यांनी प्रचारसभा टाळल्या होत्या. त्यामुळे तुलनेने कमी प्रचारात झालेल्या या निवडणुकांचा निकाल काय लागणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. 

- धाराशिव जिल्हा परिषद – पक्षनिहाय जागा

(एकूण जागा : 55)
    •    भाजप (BJP) : 19
    •    शिवसेना (SS – शिंदे गट) : 15
    •    शिवसेना (SS-UBT – उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) : 7
    •    राष्ट्रवादी काँग्रेस (NCP – अजित पवार गट) : 6
    •    काँग्रेस (INC) : 3
    •    समाजवादी पक्ष : 1
    •    इतर (OTH) : 4
    •    राष्ट्रवादी काँग्रेस (NCP-SP – शरद पवार गट) : 0
    •    AIMIM : 0
    •    VBA : 0

एकूण जागा : 55

- भाजपला वारुंजी गटात काँग्रेसकडून धक्का 

वारुंजी गटातून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे समर्थक नामदेव पाटील यांच्या पत्नी सुनंदा नामदेव पाटील यांचा 243 मतांनी विजय झाल्या आहे.  दरम्यान, वारुंजी गटात भाजपाच्या उमेदवाराचा पराभव झाला असल्याने हा डॉ. अतुल भोसले यांच्यासाठी धक्का मानला जात आहे.

पंचायत समिती 2 काँग्रेस त्यामध्ये तळबीड व जखिनवाडी उमेदवार आणि गटातून वारुंजीतून नामदेव पाटील यांच्या पत्नी विजयी

- सोलापूर, माळशिरस 

सोलापूर माळशिरस तालुक्यातील बोरगाव जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे एसपी नागनाथ भोसले विजयी

- सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निकाल फायनल अपडेट्स 

भाजप-27
शिवसेना-14
उबाठा-3
अपक्ष-6
एकुण-50

- सोलापूर, करमाळा

सोलापूर करमाळा तालुक्यातील वांगी जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस एसपी आमदार नारायण पाटील यांच्या करमाळा तालुका विकास आघाडी च्या रूपाली गोडसे विजयी

- सोलापूर 

पंढरपूर तालुक्यातील वाखरी जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादीचे मयुरी बागल विजयी

भाजपच्या मोनिका काळे यांचा पराभव

- केशेगाव गटात भाजप चे उमेदवार सुमन प्रवीण भद्रे विजयी

- पन्हाळा 

कोतोली जिल्हा परिषद मतदारसंघातून शिवसेनेच्या उमेदवार वर्षाराणी पाटील विजयी 
कोतोली आणि बाजारभोगाव पंचायत समिती मतदारसंघातून शिवसेनेचे दोन उमेदवार विजयी

- मावळ जिल्हा परिषद विजयी उमेदवार 

1) टाकवे बुद्रुक नाणे गट : अनंता पावशे 

2) इंदोरी वराळे : पल्लवी दाभाडे 

3) कार्ला खडकाळा : दीपाली हुलावळे 

4) कुसगाव बुद्रुक काले गट : संतोष राऊत 

5) सोमटने चांदखेड : मनीषा मुर्हे

- हातकणंगले

हातकणंगले तालुक्यातील रुकडी जिल्हा परिषदेत शिवसेना पक्षाच्या अतिश नंदकुमार शिंदे विजयी  

- रत्नागिरी- संगमेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद गट विजयी

सुशिल भायजे  धामापूर गट- राष्ट्रवादी अजित पवार 

संतोष थेराडे कडवई ( शिवसेना UBT) 

विशाखा कुवळेकर  कसबा ( UBT)

माधवी गीते मचूरी  (शिवसेना शिंदे) 

प्रमोद अधटराव कोसूंब ( भाजपा)  

नेहा माने साडवली (शिवसेना UBT) 

विलास चाळके - दाभोळे (शिवसेना शिंदे) 

- रत्नागिरी

माजी राज्यमंत्री रवींद्र माने यांच्या पत्नी नेहा माने विजयी; शिवसेना (उबठा)कडून होत्या रिंगणात

- कोल्हापूर

पन्हाळा: यवलूज जिल्हा परिषद मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या पूजा दिलीप पाटील विजयी

यवलूज पंचायत समिती मतदार संघातून जनसुराज्य च्या वैशाली आडनाईक विजयी

वाघवे पंचायत समिती मधून जनसुराज्यच्या शोभा सुरेश पाटील विजयी

- मुळशी जिल्हा परिषद निकाल

पौड आंबडवेट जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे मिलींद वाळंज विजयी

माण हिंजवडी गटातून भाजपाचे शिवाजी बुचडे विजयी

भुगांव पिरंगुट गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शांताराम इंगवले विजयी.

- छत्रपती संभाजीनगर

सिल्लोड तालुक्यातील 6 जिल्हा परिषदेतील 5 जिल्हा परिषदेच्या जागेवर अब्दुल सत्तार यांचे नेतृत्वात फडकला शिंदेसेनेचा भगवा 

अजिंठा, शिवना, अंभई, घाटनांद्रा आणि डोंगरगाव येथील 5 उमेदवार शिवसेनेचे विजयी तर उंडणगाव येथे भाजपाचा उमेदवार विजयी 

पंचायत समितीच्या 12 जागांपैकी 6 जागेवर शिंदेसेनेला यश तर 6 जागेवर भाजपला यश

- उपळा मतदार संघांतील भाजप उमेदवार प्रमोद शिंदे तब्बल 4000 मतांनी विजयी 

- कुडाळ तालुका विजयी उमेदवार

1. आंब्रड- दिपालक्ष्मी पडते (SS)
2. वेताळ बांबर्डे- नागेश आईर (SS)
3. माणगाव- रुपेश कानडे (SS)
4. ओरोस- सुप्रिया वालावलकर (BJP)
5. घावनळे- दीपक नारकर (SS)
6. पावशी- दादा साईल (SS)
7. तेंडोली- आरती पाटील- (BJP)
8. नेरूर- रुपेश पावसकर (अपक्ष)
9. पिंगुळी- गुरू सडवेलकर (उबाठा)

- सांगली

रयत क्रांती पक्षाच्या मोहिनीताई सागर खोत बागणी जिल्हा परिषद मधून विजय; विजयानंतर आमदार सदाभाऊ खोत आणि त्यांचे पुत्र सागर खोत यांनी विजयाचा जल्लोष केला साजरा

- हातकणंगले 

राजू किसन आवळे माजी आमदार यांचे चिरंजीव रुई मतदार संघातून विजयी... आमदार अशोकराव माने यांचे पीए सुहास राजमाने पराभूत...

- मावळमध्ये राष्ट्रवादीची निर्विवाद सत्ता

पुण्याच्या मावळमध्ये अजित पवार राष्ट्रवादीने पाच ही झेडपीच्या आणि दहा ही पंचायत समितीच्या जागांवर एकहाती विजय मिळवलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळकेंनी ही किमया पुन्हा करुन दाखवली. 

- धाराशिव 

 उमरगा तालुक्यातील आलूर मध्ये शिवसेनेचे बंडखोर उमेदवार अपक्ष तथा कोथळी गावचे माजी सरपंच आप्पासाहेब पाटील यांचा विजय 

- पंढरपूर 

पंढरपूर तालुक्यातील रोपळे जिल्हा परिषद गटातून आमदार अभिजीत पाटील यांच्या उमेदवार गीतांजली साळुंखे विजयी.

- सांगली 

सांगली  जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील  यांनी आपला गड राखला आहे. याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचेच  वर्चस्व अबाधित राहिले आहे.

- परभणी जिल्हा परिषद/ पंचायत समिती 

एरंडेश्वर- रितेश काळे (शिवसेना उबाठा)(पंचायत समिती)
कान्होपात्रा, एरंडेश्वर- चापके (शिवसेना उबाठा) (पंचायत समिती)
आहेरवाडी - शकुंतला बोबडे (भाजप)(पंचायत समिती)

चुडावा- भरत घनदाट (भाजप)(जिल्हा परिषद) 
चुडावा - प्रियांका गच्चे (भाजप)(पंचायत समिती)

देगांव - विलास गीरी (राष्ट्रवादी)(पंचायत समिती)
कावलगांव - अर्चना ढगे (छत्री)(जिल्हा परिषद)
कावलगांव - उज्वला पिसाळ (कपबशी) (पंचायत समिती)
धानोरा मोत्या - मिरा खैरे (कपाट)(पंचायत समिती)
गौर - कोमल पारवे देसाई (राष्ट्रवादी) 
गौर - सुप्रिया किरगे (राष्ट्रवादी)(पंचायत समिती)
ध.टाकळी - रमेश सुर्यवंशी (यशवंत सेना)(पंचायत समिती)

ताडकळस- केशरबाई जल्हारे (शिवसेना उबाठा)(जिल्हा परिषद)
ताडकळस - ज्ञानोबा घोडके (भाजप)(पंचायत समिती)

फुलकळस - काशिनाथ काळबांडे (शिवसेना उबाठा)(पंचायत समिती)

वझुर - बेबीताई कुकर (शिवसेना उबाठा)(जिल्हा परिषद) 
वझुर - चंद्रकांत पवार (शिवसेना उबाठा)(पंचायत समिती)

देऊळगाव - प्रभावती दुधाटे (भाजप)(पंचायत समिती)

- छत्रपती संभाजीनगर 

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातल्या डोंगरगाव गटामधून शिवसेना शिंदे पक्षाचे देविदास पालोदकर दोन मतांनी विजयी.

- सांगली 

सांगली जिल्ह्यातील मिरज पंचायत समितीच्या नरवाड गणामध्ये काँग्रेसची उमेदवार तन्वी सुनील कमलेकर विजयी झाली आहे. केवळ 21 वर्षे 2 महिने वयाची ही उमेदवार असून एमबीएची विद्यार्थिनी आहे. 

- पाटण 

मावशी जिल्हा परिषद गटातून भाजपाचे विजय पवार विजयी

पंचायत समिती गणातून भाजपाचे शंकर घाडगे विजयी

- सोलापूर 

करमाळा तालुक्यातील चिखलठाण जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रशांत पाटील विजयी तर माढा बेंबळे जिल्हा परिषद गटातून शिवसेना शिंदे गटाच्या सविता कोकाटे विजयी

- कोल्हापूर 

गोकुळचे माजी चेअरमन विश्वास आबाजी पाटील यांचे चिरंजीव सचिन पाटील यांचा पराभव झाला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे राजू सूर्यवंशी यांचा विजय झाला आहे. 

- संभाजीनगर 

संभाजी नगर तालुक्यत वडगाव कोल्हाटी मध्य पश्चिम गटात अपक्ष उमेदवार सचिन गरड 1 मताने विजयी

- धाराशिव

शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची मुलगी विजयी; आलूर पंचायत समिती गणातून 3925 मतांनी आकांक्षा चौगुले यांचा विजय 

- धाराशिव 

धाराशिव जिल्ह्याच्या कवठा जिल्हा परिषद गटातून काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव महेश देशमुख हे मराठवाड्यात सर्वात विक्रमी मतांनी म्हणजेच तब्बल 5570 मतांनी विजयी झाले.

- रत्नागिरी 

गुहागर पंचायत समिती गणातून शिंदेंच्या शिवसेनेचे प्रणव पोळेकर 1500 मतांनी विजयी 

- धाराशिव 

उमरगा तालुक्यातील आलूर मध्ये शिवसेनेचे बंडखोर उमेदवार अपक्ष तथा कोथळी गावचे माजी सरपंच आप्पासाहेब पाटील यांचा विजय 

- सांगोला

कडलास जिल्हा परिषद गटातून शिवसेनेच्या शोभाताई खटकाळे विजयी 
शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या सुनबाई राणीताई पाटील कडलास पंचायत समिती गणातून चार हजार तीनशे मतांनी विजयी.

- मुळशी, पुणे 

पुण्याच्या मुळशीतील पंचायत समितीच्या पौड गणातून राष्ट्रवादीच्या काजल अंकुश मोरे विजयी..

- धाराशिव 

जिल्हा परिषदेसाठी बहीण तर पंचायत समिती गणातून भाऊ विजयी

मंगरूळ जिल्हा परिषद गटातून समाजवादी पक्षाचे उमेदवार सीमा माडजे-रोचकरी तर आरळी पंचायत समिती गणातून कृष्णा रोचकरी विजयी 

- रत्नागिरी 

जिल्हा परिषद पंचायत समिती गणामध्ये एकूण 16 जागांवरती शिंदे सेनेचे उमेदवार विजयी झाले आहेत तर दोन ठिकाणी विरोधकांनी खात उघडला आहे. 

गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मतदारसंघात विरोधकांचे दोन धक्के अजित दादांच्या राष्ट्रवादीच्या पंचायत समिती गणाचे उमेदवार तुळसा जाधव या विजयी तर जालगाव पंचायत समिती गणातून भाजपाचे श्रीराम इदाते विजयी

- सोलापूर 

उत्तर सोलापूर तालुक्यातील जिल्हापरिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मोठा पराभव. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे माजी जिल्हाध्यक्ष, माजी जिल्हापरिषद अध्यक्ष बळीराम काका साठे 4961 मतांनी पराभूत 

- कोरेगाव 

कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे बुद्रुक गटात शिवसेनेचे सतीश धुमाळ यांनी विजय मिळवला आहे. तर वाठार स्टेशन गटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराने बाजी मारली असून, या निकालांमुळे कोरेगाव तालुक्यातील राजकीय चित्र अधिकच स्पष्ट होताना दिसत आहे.

-  कुंभारी जिल्हा परिषद गट 

भाजपच्या श्रृती भोरगुंडे तब्बल 4 हजार 295 मतांनी विजयी

- रत्नागिरी 

मंडणगडमधील दोन जिल्हापरिषद गट आणि चार पंचायत समिती गणावर शिवसेना शिंदे विजयी

- सिंधुदुर्ग

अटीतटीच्या नेरूर जि.प मतदारसंघात भाजपचे बंडखोर रूपेश पावसकर यांचा विजय तर शिंदेसेनेचे उमेदवार माजी जि.प अध्यक्ष संजय पडतेंचा पराभव 

- चिपळूण 

कापसाळ पंचायत समिती गणातून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे वंचित युतीचे सुभाष जाधव हे विजयी 

- वेल्हा, पुणे 

पुण्यातील वेल्हा पंचायत समितीवर राष्ट्रवादीचा झेंडा; 4 पैकी 3 जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी.. तर एका जागेवर भाजपचा उमेदवार विजयी. पंचायत समितीच्या वांगणी गणातून संदीप खुटवड, वेल्हे गणातून सीताताई खुळे आणि पानशेत गणातून सुवर्णा राऊत हे राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी 

- कोल्हापूर : शिरोळ

उदगाव जिल्हा परिषद
अमोल चव्हाण ( राजर्षी शाहू विकास आघाडी )

अर्जुनवाड पंचायत समिती
सीमा म्हैशाळे ( राजर्षी शाहू विकास आघाडी )

उदगाव पंचायत समिती
दिप्ती जाधव ( राजर्षी शाहू विकास आघाडी ) 

नांदणी जिल्हा परिषद मतदारसंघात.
प्रचिता कोळी ( राजर्षी शाहू विकास आघाडी.)

नांदणी पंचायत समिती
निलम म्हेत्रे ( काँग्रेस )

चिपरी पंचायत समिती
प्रविण देसाई ( राजर्षी शाहू विकास आघाडी )

- हवेली तालुक्यातील गट क्रमांक 38 कोरेगाव मूळ गटातून सुरेखा हरगुडे 9034 मतांनी विजयी
सुरेखा हरगुडे  यांना मिळालेली मते=18872( राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट)
पराभूत: कविता विजय. पायगुडे= 9838( भाजपा)


पंचायत समिती कोरेगाव मूळ केसनानंद गण क्रमांक 75
कुशाल सातव 4437 मतांनी विजयी (भाजपा)
विजयी :कुशाल सातव मिळालेली मते -10814
पराभूत:  प्रमोद हरगुडे = 6377(राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गट)

कोरेगाव मूळ नायगाव 76
मनोज उर्फ कृषीराज चौधरी अवघ्या  4 मतांनी विजयी
विजयी: मनोज चौधरी यांना मिळालेली मते= 5541( राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट)

पराभूत सुरज चौधरी यांना मिळालेली मते= 5537(भाजपा).

- पंढरपूर 

माळशिरस तालुक्यातील फोंडशिरस गटातून धैर्यशील मोहिते पाटील यांचे चुलत बंधू राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अर्जुनसिंह मोहिते पाटील विजयी

- आमदार अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव अब्दुल आमेर अंभई गटातून दणदणीत विजयी 

- तेर मतदार संघांतील उमेदवार अर्चना राणा जगजीत सिंह पाटील यांचा 2328 मतानी विजय 

- परभणी

पूर्णा - कावलगाव गटात ZP आणि पंचायत समिती मध्ये तिन्ही अपक्ष उमेदवारांची विजयी वाटचाल

- रत्नागिरी 

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हाय व्होल्टेज लढत ठरलेल्या हातखंबा जिल्हा परिषद गटातून शिंदे यांच्या शिवसेनेचे सुयोग कांबळे विजयी 

मिरजोळे पंचायत समिती गणातून शिंदे यांच्या शिवसेनेचे वैभव पाटील 2623 मतांनी विजयी

- पंढरपूर 

माळशिरस तालुक्यातील मांडवे गटातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार गौतम माने विजयी तर भाजपचे उमेदवार धर्मराज माने यांचा पराभव 

- सोलापूर 

माढा तालुक्यातील टेंभुर्णी जिल्हा परिषद गटातून भाजपच्या अमृता वाघे विजयी

- पंढरपूर

सांगोला तालुक्यातील जवळा जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादीचे उमेदवार अतुल पवार विजयी तर माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांचे पुत्र यशराज साळुंखे यांचा पराभव 

- कोल्हापूर 

कसबा तारळे जिल्हा परिषद मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अमृता अरूण डोंगळे विजयी

- भोर, पुणे 

भोरमध्ये राष्ट्रवादीच्या तिकिटावर पती-पत्नी विजयी; भोरमधील भोंगवली-कामथडी गटातून राष्ट्रवादीचे विक्रम खुटवड विजयी.. तर त्यांच्या पत्नी तृप्ती खुटवड भोर पंचायत समितीच्या कामथडी गणातून विजयी

- पैठण 

पैठण तालुक्यातील पाचोड गटातून खासदार संदिपान भुमरे यांचे पुतणे शिवराज भुमरे विजयाच्या उंबरठ्यावर

- रत्नागिरी 

जिल्हापरिषद भांबेड गटातून शिवसेनेच्या विनिता गांगण विजयी; भांबेड पंचायत समिती उमेश पत्की विजयी 

भांबेड पंचायत समिती भाजप- शैलेश खामकर विजयी; महायुतीच्या उमेदवार विजयी

- कोल्हापूर

आमदार सतेज पाटील यांना धक्का; उचगाव मतदार संघात एक जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा भाजप उमेदवार विजयी

- सिंधुदुर्ग 

फोंडाघाट जिल्हापरिषद -भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार राजन चीके विजयी.

- पुरंदर 

पुरंदर तालुक्यातील वीर-भिवडी जिल्हा परिषद गटातून भारतीय जनता पार्टीचे हरिभाऊ लोळे विजयी. 

पंचायत समिती बेलसर गण. माणिक निंबाळकर (शिवसेना) विजयी

- बारामती

बारामतीच्या वडगाव मोरगाव जिल्हा मोरगाव जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोहिणी संदीप कदम (ढोले) विजयी, आतापर्यंत राष्ट्रवादीने जिल्हा परिषदेच्या दोन जागा जिंकल्या

- पंढरपूर

सांगोला तालुक्यातील जवळा जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादीचे उमेदवार अतुल पवार आघाडीवर तर माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांचे पुत्र यशराज साळुंखे पिछाडीवर

- कोल्हापूर 

कसबा तारळे जिल्हा परिषद मतदार संघातील हाय व्होल्टेज लढतीमध्ये गोकुळचे माजी चेअरमन अरुण डोंगळे यांची कन्या व राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवार अमृता अरुण डोंगळे विजयी

- सिंधुदुर्ग 

आचरा जिल्हा परिषद - शिवसेना भाजप महायुतीच्या वर्षा सांबारी विजयी

आचरा पंचायत समिती -  शिवसेना भाजपा महायुतीचे गणेश तोंडवळकर विजयी

- कोल्हापूर 

आळते जिल्हा परिषद शिवसेना शिंदे गटाच्या वर्षा सावर्डेकर विजयी

- धाराशिव 

परांडा जिल्हा परिषद गटातील अटीतटीच्या लढतीमध्ये माजी मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत हे विजयी झाले आहेत तर शिवसेना पक्ष शिंदे गटाचे पंचायत समितीचे उमेदवार परशु चंद्रकांत गवारे हे विजयी झाले आहेत. 

- सिंधुदुर्ग 

सावंतवाडी तळवडे जिल्हा परिषद मतदार संघातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे कट्टर समर्थक संदीप गावडे विजयी

- कोल्हापूर 

संजय मंडलिक यांना धक्का; कागल मध्ये जिल्हा परिषदेच्या सहाही जागांवर मुश्रीफ आणि दोन्ही घाटगे गटाच्या उमेदवारांचा विजय; तसेच पंचायत समितीच्या 11 जागांवर विजय. संजय मंडलिक यांच्या वाटेला केवळ 1 पंचायत समिती जागा...

- धाराशिव

कळंब - डिकसळ जिल्हा परिषद गटातून भाजपाच्या पूजा तुषार शिंदे विजयी. डिकसळ पंचायत समिती गणातून शिवसेनेचे नामदेव जाधव विजयी. लोहटा पंचायत समिती गणातून भाजपाच्या इंदुबाई ओहाळ विजयी

- कागल 

सिद्धनेर्ली जिल्हा परिषद मतदार संघातून भाजप उमेदवार सुयशा घाटगे 7406 मतांनी विजयी

- सिंधुदुर्गात महायुतीचा जल्लोष 

सिंधुदुर्गात  ढोल ताशा डीजे लावत गुलाल उधळत महायुतीच्या कार्यकर्त्यांनी सुरु केला जल्लोष

- कोल्हापूर : पन्हाळा   

कोडोली जिल्हा परिषद मतदारसंघातून जनसुराज्य पुरस्कृत अमरसिंह पाटील भाऊ विजयी

- कागल

नानीबाई चिखली जिल्हा परिषद मतदार संघातून शिवानी विजयसिंह भोसले 2206 मतांनी विजयी

- छत्रपती संभाजीनगर 

खुलताबादमधील जिल्हा परिषदेच्या तिन्ही जागा भाजपने जिंकल्या. प्रतीक्षा कापसे या खुलताबाद गटमधून विजयी. रेखा चव्हाण वेरूळ गटातून विजयी तर कुणाल दांडगे हे  गदाना गटातून विजयी...

- मुळशी, पुणे 

पुण्याच्या मुळशी पंचायत समितीच्या माण गणातून राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या मंदा शेळके विजयी

- सातारा : पाटण

शिवसेना मंत्री शंभूराज देसाई यांच्या तारळे गट व गणातुन उमेदवारांचा विजयी 

तारळे जिल्हा परिषद गट 

जिल्हा परिषद गटातून तिन्ही उमेदवार शिवसेनेचे विजयी; जिल्हा परिषद गटातून स्वप्नाली पाटील विजयी तर पंचायत समिती गणातून सविता पवार प्रकाश जाधव विजयी

- चिपळूण जिल्हा परिषद 

आमदार शेखर निकम यांच्या पत्नी पूजा निकम (अजित पवार राष्ट्रवादी ) पहिल्या फेरीत आघाडीवर

- पैठण /  छत्रपती संभाजीनगर 

चितेगाव गटातून शिवसेनेचे कृष्णा गिधाने तिसऱ्या फेरी अखेर 39 मतांनी आघाडीवर

बिडकीन गटातून ठाकरे शिवसेनेचे मनोज पेरे 700 मतांनी आघाडीवर

पाचोड गटातून खासदार संदिपान भुमरे यांचे पुतणे 1335 मतांनी  पुढे

- छत्रपती संभाजीनगर

जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातल्या बाजार सावंगी, गदाना आणि वेरूळ गटातून तिन्ही भाजपचे उमेदवार विजयी.

- सातारा (शिरवळ गट) 

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राष्ट्रवादी चे उदय कबुले विजयी तर भाजपचे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे पाटील पराभूत

- अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या पत्नी शांभवी कल्याणशेट्टी चपळगाव जिल्हा परिषद गटातून विजयी

- वेल्हा, पुणे 

पुण्याच्या वेल्हा पंचायत समितीच्या विंझर गणातून भाजपचे गणेश जागडे विजयी; संग्राम थोपटे यांच्या नेतृत्वात वेल्हा पंचायत समितीमध्ये भाजपने खाते खोलले

- पैठण  

विजय चव्हाण भाजप :- 540
काकासाहेब टेके शिंदे सेना:- 2010
मनोज पेरे ठाकरे सेना:- 2739

मनोज पेरे :- 739 मतांनी आघाडीवर 

बिडकीन गण

गिता कोढलेकर ठाकरे गट आघाडीवर 

फिरोज सय्यद ठाकरे गट आघाडीवर

- परभणी 

शिंगणापूर, परभणी (महत्वपूर्ण लढत)

पांडुरंग खिल्लारे (उबाठा) विजयी तर समशेर वरपुडकर (भाजप) पराभव

- कोल्हापूर 

बोरवडे जिल्हा परिषद मतदार संघातून राष्ट्रवादीच्या श्रीमती शोभाताई फराकटे विजयी 

बांबवडे जिल्हा परिषद मतदारसंघात राष्ट्रवादीच्या राजकुंवर गायकवाड विजयी

- सांगली 

जत  - दरीबडची जिल्हा परिषद भाजपचे सरदार पाटील विजयी

तासगाव -  सावळज जिल्हा परिषद गटात आर आर आबा गटाचे प्रवीण झेंडे व वायफळे पंचायत समिती गणात काका गटाचे सुखदेव पाटील आघाडीवर. 

सावळज जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विजय धेंडे आघाडीवर

मिरज -  एरंडोली जिल्हा परिषद गट एरंडोली पंचायत समिती आणि सलगर पंचायत समिती गणातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व उमेदवार आघाडीवर.

- महाबळेश्वर 

कुंभरोशी गणातील एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय शिवसेनेचे उमेदवार संजयराव मोरे विजयी 

- धाराशिव 

कळंब तालुक्यातील खामसवाडी गटातुन भाजपाचे विश्वास कोकणे विजयी

- सिंधुदुर्ग 

कोलगाव मधील हाय होल्टेज लढतीत भाजपचे बंडखोर मायकल डिसोजा 250 मतांनी विजयी; भाजपचे महेश सारंग पराभूत

- छत्रपती संभाजीनगर  

ढोरकिन गटातून शिवसेनेच्या राधिका जगताप आघाडीवर तर राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय वाकचौरे यांच्या पत्नी सुनिता वाकचौरे पिछाडीवर

- सातारा

सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुंबरे (भाजप) यांचा 2045 मतांनी विजय

- पुणे : मुळशी 

पुण्याच्या मुळशीतील पिरंगुट पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार विजयी 

- रत्नागिरी 

47 आजगे जिल्हापरिषद गटातून शिवसेनेच्या मनिषा गणेश लाखण विजयी 

पंचायत समिती आजगे गणातून मानसी आंबेकर 

- चिपळूण 

कळवंडे - शिवसेना उबाठा गटाच्या पूजा शिगवण 2 मतांनी आघाडीवर (पंचायत समिती)

कळवंडे - शिवसेना उबाठा गटाच्या निकिता निकम 1 मताने आघाडीवर (जिल्हा परिषद) 

पेढे - राष्ट्रवादीचे मोहन शिंदे 1मताने आघाडीवर (पंचायत समिती)

पेढे - शिवसेना उबाठा गटाच्या स्वरा शिंदे 1 मताने आघाडीवर (पंचायत समिती)

खेर्डी - अजित पवार राष्ट्रवादीच्या नितीन ठसाळे 35 मतांनी आघाडीवर (पंचायत समिती)

खेर्डी -पंचायत समिती..
राहूल कांबळे (अजित पवार राष्ट्रवादी) =16 
सुभाष जाधव (ubt) =16 
 

- शेळगाव जिल्हा परिषद 

शेळगाव जिल्हा परिषद गटांतुन अंतिम फेरीत राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीकांत विटेकर 8334 मतांची विजयी 

शिर्शी पंचायत समितीच्या गणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कस्तुरा भंडारे 2387 मतांनी विजयी 

शेळगाव पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी काँग्रेसचे पद्मसिंह देशमुख विजयी 

- धाराशिव

कळंब तालुक्यातील खामसवाडी गटातुन भाजपाचे विश्वास कोकणे विजयी; शिवसेना उबाठाच्या उमेदवार मनिषा वाघमारे यांचा पराभव 

- मोहोळ

मोहोळ तालुक्यातील खंडाळी पंचायत समिती गणातून राष्ट्रवादीचे गणेश मुळे 1295 मतांनी विजयी

- मंगरूळ  

मंगरूळ जिल्हा परिषद गटातून भाजप उमेदवार जयंवत कुंभार विजयी तसेच उबाठा गटाचे बालाजी जाधवर यांचा पराभव

- पंढरपूर 

माळशिरस मध्ये राम सातपुते यांचा मोठा जल्लोष; मोहिते पाटील यांच्याविरुद्ध दंड थोपटून राम सातपुते यांनी उधळला गुलाल 

- छत्रपती संभाजीनगर

शिवना जि प गट- डॉ.अनिता राजू बाबा काळे शिंदेंची शिवसेना 1005 मतांनी विजयी...

शिवना गण - शेख सलीम शिंदेंची शिवसेना 1159 मतांनी विजयी...

पानवडोद गण- नेहा सुमित खरात भाजपा 1620 मतांनी विजयी.

- धाराशिव जिल्हा परिषद आघाडी :

भाजप :  7
शिवसेना :   6
शिवसेना UBT:   4
NCP :  4
काँग्रेस :   4
वंचित :    00
MIM:  00
अपक्ष : 1

- पैठण 

•बिडकीन गण
-फेरोज सय्यद आघाडीवर ठाकरे गट

•निलजगाव गण
-गीता कोढलेकर आघाडीवर ठाकरे गट

- पंढरपूर  

सांगोला तालुक्यातील एखतपूर गटात शेकाप प्रणित सांगोला आघाडीच्या सिंधू आलदर विजयी

- छत्रपती संभाजी नगर: सोयगाव

भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष इद्रिस मुलतानी यांची मुलगी माहीन इद्रिस मुलतानी फर्दापूर जिल्हा परिषद गटातून विजयी 

- बारामती जिल्हा परिषद

बारामती सुपा मोरगाव जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पल्लवी खेत्रे विजयी 

पंचायत समिती काऱ्हाटी गण  राष्ट्रवादीच्या शामल सुनील वाबळे या 7304 मतांनी विजयी 

- कोल्हापूर

 उचगाव जिल्हा परिषद मतदार संघातून भाजपचे नामदेव वाइंगडे विजयी

- सातारा कोरेगाव  

पिंपोडे गट सतीश धुमाळ (शिवसेना) विजयी
सोनके गण आकाश सोळसकर (घड्याळ)
पिंपोडे गण रूपाली साळुंखे (शिवसेना)

- पाटण 

भाजपाच्या पाटणकरांच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेचा पहिला विजयी उमेदवार; हेळवाक जिल्हा परिषद अशोक पाटील उमेदवार मंगल माने येराड गणातील उमेदवार विद्या दिंडे विजयी

- अलिबाग

आंबेपूर गटातून 4200 मतांनी शिंदे गटाच्या रसिका केणी विजयी.

- आष्टी

आष्टी पंचायत समिती गणनातून राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉक्टर अमित व्यवहारे विजयी; आष्टी जिल्हा परिषद गटातून पहिल्या फेरीत राष्ट्रवादीचे विजयराज डोंगरे 6366 तर भाजपाचे समाधान शेळके 4093

- मोहोळ

मोहोळ तालुक्यातील आष्टी गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयराज डोंगरे विजयी तर भाजपचे उमेदवार समाधान शेळके या ठिकाणी पराभूत

- पंढरपूर

करकंब गटातून भाजपचे आदिनाथ देशमुख विजयी आमदार अभिजीत पाटील यांना मोठा धक्का

- माढा- मानेगाव गटात तानाजी सावंतांचे पुतणे पृथ्वीराज सावंत विजयी

- परभणी

  • शिंगणापूर जी प गटातुन माजी आमदार सुरेश वरपूडकर यांचे पुत्र समशेर वरपूडकर पहिल्या फेरी अखेर पिछाडीवर
  • जांब गटातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार किरण सोनटक्के पहिल्या फेरी अखेर आघाडीवर
  • टाकळी कुंभकर्ण जिल्हाब रिसशड गटातून शिवसेना उबाठाच्या 22 वर्षीय तरुण उमेदवार प्रतिक्षा प्रभाकर जयस्वाल पहिल्या फेरी अखेर आघाडीवर
  • टाकळी बोबडे जिल्हा परिषद गटातून सुचिता आनन्द भरोसे शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार पहिल्या फेरी अखेर आघाडीवर
  • झरी जिल्हा परिषद गटातून भाजपचे उमेदवार दिलीपराव देशमुख आघडीवर
  • पिंगळी जिल्हा परिषद गटात पहिल्या फेरी अखेर शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार पूजा सावंत  आघाडीवर
  • सिंगणापूर गटातून मशालीचे उमेदवार पांडुरंग खिल्लारे दुसया फीई अखेर 260 मतांनी आघाडीवर
  • लोहगाव जिल्हा परिषद गटातून काँग्रेसचे उमेदवार अजित वरपूडकर पहिल्या फेरी अखेर आघाडीवर
  • पाथरी- हादगाव बु जिळ परिषद सर्कल मध्ये शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सुरेश ढगे पहिल्या फेरी अखेर आघाडीवर

- धाराशिव 

लोहारा तालुक्यातील कानेगाव जिल्हा परिषद गटातून शिवसेना शिंदे गटाच्या सुवर्णा सतीश पाटील विजयी 

- बारामती पंचायत समिती 

एकूण जागा : 12

राष्ट्रवादी अजित पवार : आघाडी 10 जागा

भाजप : 01 (विजयी सुपे पंचायत समिती)

भाजप : 01 आघाडीवर (शिरसुफळ पारवडी गण)

- पाटण 

पाटण पंचायत समितीत शिवसेनेने खाते खोलले; हेळवाक गणातून मंगल माने शिवसेना 755 मतांनी विजयी

- कडगाव

जिल्हा परिषद मतदारसंघ :
1. सारिका यशवंत नांदेकर (शिवसेना) विजयी उमेदवार - 11175

2. शुभांगी विश्वजीत जाधव (शिव शाहू आघाडी) - 9,030

पंचायत समिती मतदारसंघ :
1.  अरुणा प्रशांत देसाई (शिवसेना)
विजयी उमेदवार  मते - 5818
  
2.  ऐश्वर्या सुभाष सोनार (शिव शाहू आघाडी) - 5533

- दौंड

दौंड तालुक्यातील राहू पंचायत समिती गणात भाजपच्या शुभांगी शिंदे 1300 मतांनी आघाडीवर

- सोलापूर

जि.प.-करमाळ्यात भाजपच्या रश्मी बागल विजयी

- पंढरपूर 

सांगोला तालुक्यातील एखतपूर गटात शेकाप प्रणित

माळशिरस तालुक्यातील दहिगाव गटात संस्कृती राम सातपुते 300 मतांनी आघाडीवर

गुरसाळे गणात अर्जुनसिंह मोहिते पाटील पिछाडीवर

सांगोला आघाडीच्या सिंधू आलदर आघाडीवर 

दहीगाव जिल्हा परिषद गटात भाजपच्या संस्कृती राम सातपुते यांचा विजय 

- सांगली  

आटपाडी - खरसुंडी जिल्हा परिषद गटातून शिवसेनेचे जयदीप भोसले आघाडीवर

आरग आणि बेडग जिल्हा परिषद गटातून भाजपा 2 ठिकाणी आघाडी वर 

म्हैसाळ जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वर्षा कांबळे आघाडीवर

- कोल्हापूर

जिल्हा परिषदेच्या एकूण जागा - 68

भाजप - 6
शिवसेना (शिंदे) - 5
राष्ट्रवादी - 8
काँग्रेस -   10
शिवसेना (ठाकरे) -
जनसुराज्य - 3
स्वाभिमानी शेतकरी संघटना - 1
इतर - 

पंचायत समिती - एकूण जागा - 136

भाजप - 12
शिवसेना (शिंदे) - 10
राष्ट्रवादी - 16
काँग्रेस - 20 
शिवसेना (ठाकरे) -
जनसुराज्य - 6
स्वाभिमानी शेतकरी संघटना - 2
इतर -2

- धाराशिव 

परंडा तालुक्यातील शेळगाव जिल्हा परिषद गटातून शिवसेना शिंदे गटाचे अमर मोरे विजयी; आमदार तानाजी सावंत यांनी या गटासाठी लावली होती प्रतिष्ठापनाला

- सिंधुदुर्ग 

सावंतवाडी तालुक्यात अपक्षांची बाजी

माडखोल जिल्हा परिषद सह दोन्ही पंचायत समितीवर अपक्षांनी मारली बाजी

शिवानी नाईक- माडखोल जि.प.
अवनी राऊळ- माडखोल पंचायत समितो
प्रथमेश सावंत- कलंबिस्त पंचायत समिती

- सातारा 

पाटखळ गट भाजपच्या उमेदवार गौरी सचिन नलावडे यांचा विजय

- सांगली  

आटपाडी - खरसुंडी जिल्हा परिषद गटातून शिवसेनेचे जयदीप भोसले आघाडीवर

- धाराशिव 

भारतीय जनता पार्टीचे काक्रंबा गटाचे जिल्हा परिषदचे उमेदवार दयानंद शिंदे विजयी; थेट विद्यार्थी चळवळीतून जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणांगणात उतरलेला युवा चेहरा विजयी 

- कोल्हापूर 

मुडशिंगी जिल्हा परिषद भाजपचे तानाजी पाटील 4500 हजारांनी आघाडीवर; काँग्रेसचे रावसाहेब पाटील पिछाडीवर

- पन्हाळा

सातवे पंचायत समिती मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या भारती पाटील विजयी

- धाराशिव 

पारा जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार संध्या मुरकुटे 11 मतांनी आघाडीवर. 

- बारामती

बारामती तालुक्यातील सुपे गणातून भाजपच्या उज्वला पोपट खैरे 2700 मतांनी विजयी; राष्ट्रवादीने या गणात भाजपसाठी सोडली होती जागा

- पुणे 

भोर पंचायत समितीच्या वेळू गणातून भाजपचे ज्ञानेश्वर पांगारे विजयी

- गडहिंग्लज

गडहिंग्लज तालुक्यातील नूल जिल्हा परिषद मतदारसंघात दुसऱ्या फेरीत जनसुराज्यचे अनिरुद्ध रेडेकर विजयी

- रत्नागिरी

रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 10 जागांपैकी 8  जागांवर शिंदे शिवसेना आघाडीवर तर 2 जागेवर अपक्ष उमेदवार आघाडीवर

- अजिंठा जिल्हा परिषद

शिवसेना उमेदवार आयेशाबेगम सय्यद नासेरहुसेन तर अजिंठा गणाच्या उमेदवार रजीनाबेगम अब्दुल समद तसेच हळदा गणाच्या उमेदवार कासाबाई पांडुरंग गवळे विजयी

- कराड 

शिवसेना - 01

भाजप - 04

राष्ट्रवादी अजित पवार गट - 02

राष्ट्रवादी शरद पवार गट -03 

- कोल्हापूर

कोल्हापुरातील पहिला निकाल हाती; घुणकी येथे काँग्रेसच्या शुभांगी महेश कुंभार या जिल्हा परिषदसाठी विजयी. पंचायत समिती नवे पारगावमध्ये काँग्रेसचे भारत विरधवल पाटील विजयी तर घुणकी पंचायत समिती काँग्रेसचया संगीता संग्राम पाठील विजयी

 - सातारा

शिवथर गणातून राजेश मोहन पवार राष्ट्रवादी घड्याळ चिन्हावर विजयी 

पाटखळ गणातून राहुल शिंदे भाजप विजयी

- सिल्लोड तालुका 

अजिंठा गट जिल्हा परिषद आणि पंचायत समिती असे तिन्ही उमेदवार शिवसेनेचे विजयी तर हतनूर गटात भाजप चे माजी मंत्री बबनराव लोणीकर याची कन्या मीनाक्षी पवार आघाडीवर

- ढोकी जिल्हा परिषद

ढोकी जिल्हा परिषद निवडणूकीत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार तीर्थराज घाडगे विजयी

- पंढरपूर 

सांगोल्या पंचायत समितीवर सोनाली पाटील आणि बाळासाहेब बंडगर विजयी

- सातारा 

सातारा पंचायत समिती निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीने खाते खोललं. भाजपला मोठा धक्का; शिवथर गणातून राष्ट्रवादीचे राजेश पवार 376 मतांनी विजयी 

- वैजापूर पंचायत समिती

वैजापूर पंचायत समितीच्या सोळा जागांपैकी सहा जागांवर ठाकरे शिवसेना आघाडीवर

- कागल 

सेनापती कापशी जिल्हा परिषद मतदार संघातून शशिकला खोत आघाडीवर; बोरवडे जिल्हा परिषद मतदार संघातून शोभाताई फराकटे आघाडीवर 

- रत्नागिरी 

रत्नागिरी जिल्हा परिषद निवडणुकीत दोन अपक्ष उमेदवार आघाडीवर, गोळप गटातून उदय बने तर हातखंबा गटातून पर्शुराम कदम आघाडीवर

- रायगड

पंचायत समिती पहिला निकाल राष्ट्रवादीच्या बाजूने; म्हसळा पंचायत समितीत खरसई गणातून राष्ट्रवादी काँग्रेसचे लहू म्हात्रे विजयी

- सोलापूर : माढा

राष्ट्रवादी अजित पवार गटाने राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवाराचा केला पराभव; माढा तालुक्यातील भोसरे जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अश्विनी दळवे विजयी 

- इंदापूर तालुक्यात हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील बावडा गटातून आघाडीवर

- धाराशिव 

धाराशिव मतमोजणी केंद्रावर राजकीय पक्षाचे प्रतिनिधी आणि पोलिसांमध्ये गोंधळ; उमेदवार प्रतिनिधीला ही आत मध्ये सोडलं जात नसल्याचा आरोप  

- पुरंदर तालुक्यातील दिवे गराडे जिल्हा परिषद गटातून बापूसाहेब पठारे यांच्या कन्या रूपाली झेंडे आघाडीवर 

- पंढरपूर 

सांगोल्यात महूद गटातून शिवसेनेचे दादासाहेब लवटे आघाडीवर. शहाजीबापू पाटील यांचे मूळ गाव असणाऱ्या महूद येथून शिवसेना शिंदे गटाचे लवटे आघाडीवर. मंगळवेढा तालुक्यातील दामाजीनगर गटातून भाजपचे रमेश भांजे आघाडीवर 

- सातारा 

जिल्हा परिषदेच्या एकूण जागा - 65

भाजप - 01
शिवसेना (शिंदे) - 
राष्ट्रवादी (अजित पवार) -
कॅांग्रेस -   
शिवसेना (ठाकरे) -
राष्ट्रवादी (शरद पवार)
इतर - 

पंचायत समितीच्या एकूण जागा - 130 

भाजप -02
शिवसेना (शिंदे) - 
राष्ट्रवादी (अजित पवार) -
कॅांग्रेस -  0
शिवसेना (ठाकरे) -
राष्ट्रवादी (शरद पवार)
इतर -

- गडहिंग्लज

गडहिंग्लज तालुक्यातील नूल जिल्हा परिषद मतदारसंघात पहिल्या फेरीत जनसुराज्यचे अनिरुद्ध रेडेकर 102 मतांनी आघाडीवर. दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादीच्या तेजस्वीनी पाटील तर तिसऱ्या क्रमांकावर भाजपचे संतोष तेली आघाडीवर 

- कोल्हापूर

एकूण जागा - 68

भाजप - 1
शिवसेना (शिंदे) - 1
राष्ट्रवादी - 2 
काँग्रेस -   03
शिवसेना (ठाकरे) -
जनसुराज्य - 2
इतर -

- छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद : 63 / 8 

भाजप : 04
शिवसेना : 02
शिवसेना (उबाठा) : 01
राष्ट्रवादी काँग्रेस : 01
काँग्रेस : 00
वंचित : 00
MIM :  00
अपक्ष : 00

- रत्नागिरी

मंडणगड मध्ये शिंदेंची शिवसेना आघाडीवर

- सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील आठ जागा बिनविरोध झाल्या आहेत तर पंचायत समितीच्या 17 जागा या बिनविरोध झाल्या आहेत 

जिल्हा परिषद बिनविरोध उमेदवार
1. खारेपाटण जिल्हा परिषद प्राची इस्वालकर (भाजप) 
2. बांदा जिल्हा परिषद प्रमोद कामत (भाजप)
3. जाणवली जिल्हा परिषद रुहिता तांबे (शिंदे शिवसेना)
4. पडेल जिल्हा परिषद सुयोगी घाडी (भाजप)
5. बापर्डे जिल्हा परिषद अवनी तेली (भाजप)
6.  पोंगुर्ले जिल्हा परिषद अनुराधा नारकर (भाजप) 
7. किंजवडे जिल्हा परिषद सावी लोके (भाजप)
8. कोळपे जिल्हा परिषद प्रमोद रावराणे (भाजप)


कणकवली पंचायत समिती बिनविरोध उमेदवार
1. वरवडे पंचायत समिती सोनू सावंत (भाजपा)
2. नांदगाव पंचायत समिती हर्षदा वाळके (भाजप)
3. जाणवली पंचायत समिती महेश्वरी चव्हाण (भाजप)
4. बिडवाडी पंचायत समिती संजना राणे (भाजप) 
5. हरकुळ बुद्रुक पंचायत समिती दिव्या पेडणेकर (भाजप) 
6. नाटळ पंचायत समिती सायली कृपाळ (भाजप) 

देवगड पंचायत समिती बिनविरोध उमेदवार
7. पडेल पंचायत समिती अंकुश ठूकरूल (भाजप)
8. नाडण पंचायत समिती गणेश राणे (भाजप)
9. बापर्डे पंचायत समिती संजना लाड (भाजप)
10. फणसगाव पंचायत समिती समृद्धी चव्हाण (भाजप)
11. शिरगाव पंचायत समिती शितल तावडे (भाजप) 
12. कोटकामते पंचायत समिती ऋतुजा खाजनवाडकर (भाजप) 


वैभववाडी पंचायत समिती बिनविरोध उमेदवार
13. कोकिसरे पंचायत समिती सौ.साधना नकाशे (भाजप)


वेंगुर्ले पंचायत समिती बिनविरोध उमेदवार
14. आसोली पंचायत समिती संकेत धुरी (भाजप)

मालवण पंचायत समिती बिनविरोध उमेदवार
15. आडवली मालडी पंचायत समिती सीमा परुळेकर (भाजप)


सावंतवाडी पंचायत समिती बिनविरोध उमेदवार
16. शेर्ले पंचायत समिती महेश धुरी (भाजप)


दोडामार्ग पंचायत समिती बिनविरोध उमेदवार
17. कोलझर पंचायत समिती गणेशप्रसाद गवस (शिंदे शिवसेना)

- रत्नागिरी

रत्नागिरी जिल्हा परिषद आणि 9 पंचायत समित्यांच्या मतमोजणीला सुरुवात. ठिकठिकाणी नेमून दिलेल्या ठिकाणी विविध पक्षांचे कार्यकर्ते दाखल

- मावळ 

मावळ तालुक्यात टपाली मतमोजणी सुरु... राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर 

- बार्शी 

बार्शी शहर आणि तालुक्याचा निकाल केवळ स्थानिक न राहता आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतो आहे. कारण हा निकाल म्हणजे भाजप विरुद्ध एकत्रित विरोधकांची थेट लढाई ठरणार आहे.

- कोल्हापूर 

कोल्हापूर जिल्ह्यात सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात होणार असून सुरुवातीला पोस्टल मतमोजणी होईल. उमेदवारांच्या मतमोजणी प्रतिनिधींना पोलीस प्रशासनाकडून विशिष्ट तपासणी केल्यानंतर मतमोजणी केंद्रांपर्यंत पाठवण्यात येत आहे. 

- बारामती

बारामती मधील जिल्हा क्रीडा संकुल येथे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या मतदानाची मतमोजणी होणार. सकाळी दहा वाजता होणार मतमोजणीला सुरुवात

- मावळ

मावळ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 5 आणि पंचायत समितीच्या 10 अशा एकूण 15 जागांसाठी मतमोजणी प्रक्रियेला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. मतमोजणी केंद्राच्या परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला या मतमोजणी प्रक्रियेसाठी 25 प्रशिक्षीत पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

- मतमोजणीनंतर मतदान केंद्रांच्या बाहेर झालेला राडा आणि गोंधळ पाहता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निकाला दरम्यान पोलिसांचा आहे मोठा फौजफाटा स्ट्रॉंग रूम परिसरात राहण्यात आला आहे.

- छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान मोठा गोंधळ झाल्याचं वृत्त आहे. गंगापूर पोलीस ठाण्याच्या आवारात दोन गटांमध्ये हाणामारी झाली, ज्यामुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली.