Congress : 'अशोक चव्हाणांना काँग्रेसनं काय कमी केलं?', रमेश चेन्नीथलांचा संतप्त सवाल

अशोक चव्हाण यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला असला तरी काँग्रेसने त्यांना दोन वेळा मुख्यमंत्री केले आहे, आणि 15 वर्षे त्यांना मंत्रिपदही दिले आहे तरीही ते कोणतंही कारण न देता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

ashok chavan ramesh ramesh chennithala

ashok chavan ramesh ramesh chennithala

मुंबई तक

• 05:24 PM • 13 Feb 2024

follow google news

बातम्या हायलाइट

point

'अशोक चव्हाणांना काँग्रेसनं काय कमी केलं?'

point

भाजप म्हणजे वॉशिंग मशिन्स

point

चव्हाणांमुळे काँग्रेस काहीही फरक पडणार नाही

Ramesh Chennithala: ज्या अशोक चव्हाणांना (Ashok chavan ) काँग्रेसने (Congress) दोन वेळा मुख्यमंत्री केले, 15 वर्षे त्यांना मंत्रिपद दिले तरीही त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे त्यांनी भाजपमध्ये आता प्रवेश का केला असा सवाल काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केला आहे. रमेश चेन्नीथला यांनी पत्रकार परिषद घेत अशोक चव्हाण यांच्या व्यतिरिक्त काँग्रेसचा कोणताही नेता पक्ष सोडणार नसल्याचे त्यांनी स्पष्टपण सांगितले. 

हे वाचलं का?

आदर्शची लोकसभेच चर्चा

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर भाजपने टीका केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांच्यावर आदर्श घोटाळ्यावरून लोकसभा आणि राज्यसभेत जाहीर गंभीर आरोप केले होते. तरीही त्यांना आज भाजपमध्ये प्रवेश दिला जातो. आता जे आरोप केले गेले, त्या आरोपातून त्यांची मुक्तता होणार का  असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

हे ही वाचा >> भाजपात जाताच अशोक चव्हाण म्हणाले, "हा राजकीय अपघातच..."

काँग्रेसला सोडचिठ्ठी का?

अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र त्यांना काँग्रेसने काय कमी केले होते. मोठ मोठी पदं देऊनही त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. मात्र यावेळी त्यांनी कोणतेही सबळ कारण दिले नाही. काँग्रेसने त्यांच्यावर असा काय अन्याय केला आहे ज्यामुळे त्यांनी भाजपचे कमळ हाती घेतले असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.

भाजप म्हणजे वॉशिंग मशिन्स

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडून भाजपचे कमळ हातात घेतले असले तरी त्याचा काँग्रेसवर काहीही फरक पडणार नाही. मात्र त्यांच्या भाजपप्रवेशामुळे आता ज्यांच्याकडे घोटाळ्याचे आरोप आहेत. त्यांच्यासाठी भाजपचे दरवाजे उघडे आहेत. त्यामुळे भाजप ही वॉशिंग मशिन्स आहे का असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

    follow whatsapp