बायकोचा पराभव जिव्हारी अन् विजयी नगरसेविकेच्या पतीला सुपारी देऊन संपवलं; मंगेश काळोखे हत्या प्रकरणाचा उलगडा

Mangesh Kalokhe murder case : पत्नीचा निवडणुकीतील पराभव मनावर घेत पराभूत उमेदवाराच्या पतीनेच काळोखे यांच्या हत्येची सुपारी दिल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात आणखी दोघांना अटक करण्यात आली असून, एक आरोपी फरार आहे. त्याचा शोध सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी दिली.

Crime News

Crime News

मुंबई तक

04 Jan 2026 (अपडेटेड: 04 Jan 2026, 09:04 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

बायकोचा पराभव जिव्हारी अन् विजयी नगरसेविकेच्या पतीला सुपारी देऊन संपवलं

point

मंगेश काळोखे हत्या प्रकरणाचा उलगडा

Mangesh Kalokhe murder case, खोपोली : खोपोली नगरपालिकेचे माजी नगरसेवक मंगेश काळोखे यांच्या हत्येमागील कट राजकीय वैमनस्यातून रचण्यात आल्याचा धक्कादायक खुलासा पोलीस तपासात झाला आहे. पत्नीचा निवडणुकीतील पराभव जिव्हारी लागल्याने पराभूत उमेदवाराच्या पतीनेच काळोखे यांच्या हत्येची सुपारी दिल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात आणखी दोघांना अटक करण्यात आली असून, एक आरोपी फरार आहे. त्याचा शोध सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी दिली.

हे वाचलं का?

खोपोली नगरपालिका निवडणुकीत मंगेश काळोखे यांच्या पत्नी मानसी काळोखे या विजयी झाल्या होत्या. त्यांनी रवींद्र देवकर यांच्या पत्नी उर्मिला देवकर यांचा पराभव केला होता. या निवडणुकीनंतर देवकर आणि काळोखे या दोन्ही कुटुंबांतील जुने वैर पुन्हा उफाळून आले. परिस्थिती चिघळू नये म्हणून पोलिसांनी दोन्ही कुटुंबांच्या घराजवळ दोन दिवस बंदोबस्त तैनात केला होता.

तपासात असे समोर आले आहे की, मंगेश काळोखे आणि रवींद्र देवकर यांच्यात यापूर्वीपासूनच तणाव होता. काळोखे यांनी देवकर यांना पूर्वी जीवे मारण्याची धमकी दिल्याची नोंदही पोलिसांकडे आहे. तसेच मंगेश काळोखे यांच्यावर याआधी अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती तपासात उघड झाली आहे.

हेही वाचा : भ्रष्टाचाराचा मुद्दे काढले, आता अजितदादांना पहिला धक्का, पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचे दोन उमेदवार बिनविरोध विजयी

पत्नीचा निवडणुकीतील पराभव आणि जुन्या वैराचा राग मनात धरून रवींद्र देवकर यांनी काळोखे यांचा काटा काढण्याचा निर्णय घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यासाठी त्यांनी तिघांना सुपारी दिली. त्यानुसार 26 डिसेंबर रोजी सकाळी मंगेश काळोखे यांच्यावर हल्ला करण्यात आला आणि या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. या हत्येप्रकरणी खोपोली पोलिसांनी दहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सुपारी घेतलेल्या तिघांपैकी दोघांना अटक करण्यात आली असून, एक आरोपी अद्याप फरार आहे. त्याचा शोध घेण्यासाठी विशेष पथके काम करत आहेत.

दरम्यान, या प्रकरणातील एक आरोपी पुण्यातून अटक करण्यात आला आहे. वानवडी पोलिसांनी खालीद खलील कुरेशी (वय २३) याला ताब्यात घेतले. तो यापूर्वी सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यात संशयित होता. तपासादरम्यान खालीद हडपसरमधील हांडेवाडी परिसरात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. पोलिस चौकशीत खालीदने आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने मंगेश काळोखे यांची हत्या केल्याची कबुली दिली आहे. फरार आरोपीला लवकरच अटक केली जाईल, असा दावा पोलिसांनी केला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

भ्रष्टाचाराचा मुद्दे काढले, आता अजितदादांना पहिला धक्का, पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचे दोन उमेदवार बिनविरोध विजयी

    follow whatsapp