'मी देवेंद्रजींना सांगितलं म्हणून मागचा महापौर...', मुंबईच्या महापौराबाबत एकनाथ शिंदेंचा अत्यंत मोठा गौप्यस्फोट

मुंबई महापालिका 2017 च्या निवडणुकीनंतर शिवसेनेचा जो महापौर झाला त्याबाबत मी देवेंद्र फडणवीसा्ंना विनंती केली म्हणून शिवसेनेचा महापौर झालेला असा दावा एकनाथ शिंदे यांनी आपल्या आजच्या भाषणात केला आहे.

because i told devendra fadnavis, a shiv sena mayor was elected in mumbai in 2017 eknath shinde makes a huge revelation regarding mumbai mayor election

मुंबईच्या महापौराबाबत एकनाथ शिंदेंचा अत्यंत मोठा गौप्यस्फोट

मुंबई तक

04 Jan 2026 (अपडेटेड: 04 Jan 2026, 09:35 AM)

follow google news

मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीच्या (BMC Election) प्रचाराचा नारळ शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप यांच्या महायुतीने आज वरळी डोम येथील सभेत फोडला. प्रचाराच्या सुरुवातीलाच शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. मुंबईचा मागचा महापौर शिवसेनेचा व्हावा यासाठी मी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं. असा अत्यंत मोठा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

हे वाचलं का?

2017 साली मुंबई महापालिकेची जी निवडणूक झालेली त्यामध्ये शिवसेना (अखंडीत) आणि भाजप यांची युती तुटली होती. तेव्हा दोन्ही पक्ष हे स्वबळावर लढत होते. त्यावेळी   एकीकडे भाजप आणि शिवसेना हा राज्यातील सरकारमध्ये सत्तेत होते. पण मुंबई महपालिका निवडणुकीत ते आमने-सामने आले होते. त्यावेळी मुंबईत शिवसेनेचे 84 नगरसेवक आणि भाजपचे 82 नगरसेवक निवडून आले होते. शिवसेनेकडे बहुमत नसल्याने त्यांना थेट महापौर निवडणं कठीण होऊन बसलं होतं. त्याकाळात अगदी शेवटच्या क्षणापर्यंत महापौर पदाबाबत अनेक घडामोडी सुरू होत्या.

हे ही वाचा>> मुंबई Tak महाचावडी: अमराठी Vote Bank असताना BJP मुंबईचं मराठीपण टिकवू शकेल का? पाहा CM फडणवीसांचं उत्तर काय

अखेर महापौर निवडीच्या शेवटच्या दिवशी अगदी काही वेळ शिल्लक असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलं की, भाजप महापौर पदाच्या शर्यतीतून माघार घेत आहे. ज्यामुळे शिवसेनेचा महापौर पदाचा मार्ग सुकर झाला आणि शिवसेनेला महापौर पद राखता आलं होतं.

पण यात याचबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज (3 जानेवारी 2026) केलेल्या भाषणातून अत्यंत खळबळजनक दावा केला. 

'मी देवेंद्रजींना सांगितलं.. म्हणून मागचा महापौर...', शिंदेंचा अत्यंत मोठा दावा..

'ज्यांनी विचार सोडले.. भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला, 50 फोन देवेंद्रजींनी केले याचा मी साक्षीदार आहे. ज्या देवेंद्रजींनी मी सांगितलं, विनंती केली त्यामुळे मागचा महापौर कसा झाला तो माहीत आहे. आतल्या गोष्टी आम्हाला माहिती आहे. तुम्हाला सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत नसतील. पण त्या माणसाचा फोन तुम्ही घेऊ शकत नाही. तुम्ही ठरवलं होतं काय करायचं..' असं म्हणत एकनाथ शिंदेंनी आता दावा केला आहे की, त्यांच्या विनंतीमुळेच देवेंद्र फडणवीस यांनी 2017 साली शिवसेनेचा मुंबईत महापौर होऊ दिला होता.

पाहा आजच्या प्रचार सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले.. 

'आपल्याला बकासुराच्या तावडीतून मुंबईला बाहेर काढायचंय... कोण आहे बकासूर? यासाठी शिवसेना भाजपचा बलभीम तयार झाला आहे. मुंबईवर महायुतीचा भगवा फडकणार आणि मुंबईचा महापौर हा मराठीच होणार. ही काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे.'

'यांचा म मराठीचा नाही.. मलिद्याचा आहे. म मतलबाचा आहे, म मुजोरीचा आहे. वरून किर्तन आतून तमाशा असं यांचं काम आहे. आमचा म मराठीचा आहे. आमचा म महाराष्ट्राचा आहे, आमचा म महायुतीचा आहे.. हा फरक आहे.. त्यांच्यात आणि आमच्यात.'

हे ही वाचा>> Super Exclusive: मुंबईचा महापौर कोण होणार.. मराठी की अमराठी?, मुंबई Tak च्या महाचावडीवर CM फडणवीसांनी केलं घोषित

'मराठी माणसासाठी एकत्र आल्याची दवंडी पिटवत आहेत. 20 वर्षापूर्वी तुम्ही कोणासाठी वेगळे झाले होतात, कशासाठी वेगळे झाले होतात.. ते पण एकदा सांगून टाका.. यामध्ये तुमचा स्वार्थ होता. अहकांर होता. आता जनतेने बँड वाजवल्यावर ब्रँडची आठवण आली. खरा ब्रँड फक्त आणि फक्त बाळासाहेब..'

'संभाजीनगरात.. त्या रशीद मामूला पक्षात घेतलं, तिकीट दिलं.. काय चालू आहे. त्याने काय-काय केलं ते आपल्याला माहिती आहे. बाळासाहेब असते तर यांना उलटं टांगून फटके दिले असते. काही जण निवडणूक आल्या की इतिहासात जातात. सातवीचं पुस्तक उघडतात. सूर्याजी पिसाळ, अब्दाली, अफजलखान.. यांना सगळे आठवतात. मला एकच सांगा.. बाळासाहेबांचा विचार जपणारा.. सूर्याजी पिसाळ की त्यांच्या विचारांचे मारेकरी सूर्याजी पिसाळ?'

'ज्यांनी विचार सोडले.. भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला, 50 फोन देवेंद्रजींनी केले याचा मी साक्षीदार आहे. ज्या देवेंद्रजींनी मी सांगितलं, विनंती केली त्यामुळे मागचा महापौर कसा झाला तो माहीत आहे. आतल्या गोष्टी आम्हाला माहिती आहे. तुम्हाला सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत नसतील. पण त्या माणसाचा फोन तुम्ही घेऊ शकत नाही. तुम्ही ठरवलं होतं काय करायचं..'

असा अत्यंत मोठा दावा एकनाथ शिंदे यांनी यावेळी केला आहे. आता एकनाथ शिंदे यांच्या या दाव्यावर उद्धव ठाकरे नेमकं काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp