Solapur Vidhan Parishad Election 2026 : सोलापूर विधान परिषद निवडणुकीच्या मतदानादरम्यान एक अत्यंत लक्षवेधी घडामोड समोर आली. मनसे नेते बाळासाहेब सरवदे खून प्रकरणातील आरोपी आणि सोलापूर महानगरपालिकेच्या भाजप नगरसेविका शालन शिंदे यांनी तुरुंगातून थेट मतदान केंद्रावर येत आपला मतदानाचा हक्क बजावला.
ADVERTISEMENT
हेही वाचा : ठाणे : बायकोवर नजर ठेवण्यासाठी कॅमेरे, अन् भयंकर घडलं, डॉक्टर पतीला अटक
मनसेचे पदाधिकाऱ्याची हत्या अन् शालन शिंदे तुरुंगात
शिंदे आणि सरवदे कुटुंबात झालेल्या वादात मनसेचे पदाधिकारी असलेल्या बाळासाहेब सरवदे यांची हत्या झाली होती. या प्रकरणात गेल्या सहा महिन्यांपासून त्या या गंभीर गुन्ह्याच्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत आहेत. या निवडणुकीत आपल्याला मतदान करायचे असल्याने त्यांनी न्यायालयाकडे विशेष विनंती अर्ज केला होता. त्यांच्या या मागणीची दखल घेत न्यायालयाने त्यांना केवळ मतदानासाठी ही विशेष परवानगी दिली.
हेही वाचा : ठाणे : बायकोवर नजर ठेवण्यासाठी कॅमेरे, अन् भयंकर घडलं, डॉक्टर पतीला अटक
शालन शिंदे यांना कडेकोट बंदोबस्तात मतदानासाठी हजर
न्यायालयाच्या या आदेशानंतर पोलीस प्रशासनाने शालन शिंदे यांना कडेकोट बंदोबस्तात उत्तर सोलापूर तहसील कार्यालयातील मतदान केंद्रावर आणले. पोलिसांच्या कडक सुरक्षेमध्ये त्यांना मतदान केंद्राच्या आत नेण्यात आले, जिथे त्यांनी आपली मतदान प्रक्रिया पूर्ण केली. मतदानासाठी त्यांचे आगमन होताच उपस्थित राजकीय नेते व मतदारांमध्ये त्यांची उपस्थिती चर्चेचा विषय ठरली.
शालन शिंदे यांच्यावरील बाळासाहेब सरवदे यांच्या खून प्रकरणाचा खटला सध्या न्यायप्रविष्ट आहे आणि त्या मागील काही काळापासून तुरुंगात आहेत. तरीही, लोकशाहीच्या प्रक्रियेत सहभाग घेण्याचा त्यांचा अधिकार लक्षात घेता, न्यायालयाने त्यांना ही सवलत दिली आहे.
दिवसभर सोलापूरच्या राजकीय वर्तुळात शालन शिंदे यांच्या या मतदान प्रक्रियेची चर्चा रंगली होती. विधान परिषद निवडणुकीचे महत्त्व ओळखून प्रत्येक मताला असलेले मूल्य लक्षात घेता, त्यांची ही उपस्थिती राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे. मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांना पुन्हा एकदा कडेकोट पोलीस बंदोबस्तात तुरुंगात हलवण्यात आले. एका खूनाच्या खटल्यातील आरोपी लोकप्रतिनिधी मतदानासाठी बाहेर पडणे, ही घटना सोलापूरच्या निवडणुकीच्या इतिहासात कायम लक्षात राहील अशी ठरली आहे.
ADVERTISEMENT











