'शिंदे, फडणवीसांचे आमदार पाडण्याची क्षमता...' जरांगेंचा इशारा, नेमकं काय म्हणाले?

मुंबई तक

• 03:10 PM • 06 Aug 2026

मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीतून महायुती सरकारला इशारा दिला. जरांगे यांनी आगामी दौऱ्याची घोषणा केली आहे. या दौऱ्यानंतरच मुंबईला जाण्याबाबतची अंतिम घोषणा करणार असल्याचं स्पष्ट केलं.

Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil

Google CTA

बातम्या हायलाइट

point

शिंदे, फडणवीसांचे आमदार पाडण्याची क्षमता...

point

जरांगेंचा इशारा,

point

नेमकं काय म्हणाले?

Manoj Jarange Patil : मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यात दूरध्वनीवरून झालेली चर्चा अत्यंत वादळी ठरली आहे. अंतरवाली सराटीतून सामंत यांच्याशी संवाद साधताना जरांगे यांनी सत्ताधाऱ्यांवर आक्रमक शब्दांत प्रश्नांची सरबत्ती केली. "आम्ही एकनाथ शिंदे यांच्यासाठी खस्ता खातो, तरीही आमच्या विरोधात आंदोलन उभारण्यासाठी तुमच्या नेत्यांच्या संस्थांमध्ये नेत्यांच्या बैठका का घेतल्या जात आहेत?" असा संतप्त सवाल जरांगे यांनी केला. तसेच प्रवक्तेच एकनाथ शिंदेंचा 'गेम' करत आहेत का, असा संशयही त्यांनी व्यक्त केला. यावर,  शिंदे असे कधीही करू शकत नाहीत, असे सांगत उदय सामंत यांनी  बाजू लावून धरली. यावेळी शिंदे आणि फडणवीसांचे आमदार पाडण्याची क्षमता मराठा समाजात असल्याचा इशारा जरांगेंनी दिला.

हे वाचलं का?

शिंदे, फडणवीसांचे आमदार पाडण्याची क्षमता

या संवादानंतर मनोज जरांगे यांनी महायुती सरकारला थेट इशारा दिला आहे. आपण महायुतीला मोठा राजकीय धक्का देऊ शकतो, असा दावा करत जरांगे म्हणाले की, एकनाथ शिंदे यांचे 25 ते 30 आमदार आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचे 25 ते 30 आमदार पाडण्याची क्षमता मराठा समाजात आहे. बावनकुळे यांच्या धोरणांमुळे फडणवीस यांचे इतके राजकीय नुकसान होईल की ते मोजताही येणार नाही, असा थेट इशारा त्यांनी दिला.

हे ही वाचा : 'क्या बोलती पब्लिक', नावाने देशव्यापी अभियान, कॉकरोज जनता पार्टीची पुढची दिशा ठरली

पुढील आंदोलन कुठे?

पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी मनोज जरांगे यांनी आगामी गाठीभेटी दौऱ्याची घोषणा केली आहे. मराठा समाजाने पुन्हा मुंबईच्या दिशेने कूच करायचे की अंतरवाली सराटीतच आंदोलन करायचे, याचा निर्णय ते या दौऱ्यादरम्यान थेट मराठा बांधवांशी चर्चा करून घेणार आहेत. या गाठीभेटी दौऱ्यात मिळणाऱ्या प्रतिसादानंतर आणि मराठा समाजाचा कौल घेतल्यानंतरच मुंबईला जाण्याबाबतची अंतिम घोषणा केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

हे ही वाचा : मनसेच्या पदाधिकाऱ्यांवर खंडणीचे गुन्हे, परीक्षा केंद्रात घुसून विद्यार्थ्यांची झडती

लाडकी बहीण योजनेच्या पैशांचा गैरवापर

आपल्या वक्तव्यात जरांगे यांनी राज्य सरकारच्या धोरणांवर आणि राजकीय घडामोडींवरही कडाडून टीका केली. विदर्भात मराठा आंदोलनाविरोधात बैठका घडवून आणण्यासाठी फोन फिरवले जात असल्याचा आरोप करत त्यांनी 'लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा गैरवापर होत असल्याचे म्हटले. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना उद्देशून, "तुम्हाला मी बघतोच," असा गंभीर इशारा देत मनोज जरांगे यांनी महायुती सरकारविरोधात आंदोलनाचा पवित्रा अधिक तीव्र केला आहे.