ShivSena Anniversary : शिवसेनेचा आज (19 जून) 60 वा वर्धापन दिन साजरा होत आहे. 1966 मध्ये आजच्याच दिवशी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली होती. 2022 मध्ये शिवसेनेत पडलेल्या मोठ्या फुटीनंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे दोन्ही गट हा वर्धापन दिन स्वतंत्रपणे साजरा करत आहेत. यंदाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी सोशल मीडियावर एक खास टीझर रिलीज केला असून, यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
ADVERTISEMENT
टीझरची चर्चा
सोशल मीडियावरील या टीझरच्या माध्यमातून शिवसैनिकांमध्ये नवा उत्साह भरण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचे जुने, धगधगते विचार आणि त्यांचे शिवसैनिकांशी असलेले भावनिक नाते पुन्हा एकदा ठळकपणे मांडण्यात आले आहे. प्रखर हिंदुत्वाची आठवण करून देणाऱ्या या ट्रेलरमुळे चांगलीच चर्चा रंगली आहे.
हे ही वाचा : 'तुमच्या मतदारसंघात जाऊन दाखवा..', संजय राऊतांनी फुटीर खासदारांना दम भरला
काय आहे टीझरमध्ये?
या टीझरच्या बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी वेगवेगळ्या भाषणांमध्ये व मुलाखतींमध्ये मांडलेल्या विचारांची जोडणी करण्यात आली आहे. यात बाळासाहेबांचे 'मी माझ्या शिवसेनेची काँग्रेस कधीच होऊ देणार नाही' आणि 'आय एम अ हिंदू, आय एम मॅड मॅड हिंदू' हे प्रसिद्ध संवाद ऐकायला मिळतात. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचे 'शिवसेना ही बाळासाहेबांच्या विचारांची आहे' आणि 'इथं कोणी मालक नाही, कोणी नोकर नाही, आपण सर्व कार्यकर्ते आहोत' हे विचार अधोरेखित करण्यात आले आहेत.
हे ही वाचा : फॉर्च्युनरमध्ये कोंडून भाजप नेत्यासह तिघांना जिवंत जाळलं, धक्कादायक कारण समोर
खासदारांचा प्रवेश होणार का?
दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचा हा वर्धापन दिन सोहळा मुंबईतील गोरेगाव येथील 'नेस्को सेंटर'मध्ये पार पडत आहे. या सोहळ्यात ठाकरे गटातून फुटलेले सहा खासदार शिंदे गटात जाहीर प्रवेश करणार का? किंवा त्यांच्या पक्षप्रवेशाची औपचारिक घोषणा होणार का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
ADVERTISEMENT











