बंडखोरांना इंगा दाखवण्यासाठी ठाकरेंचं पहिलं पाऊल, दिल्लीत मोठ्या घडामोडी

पक्षातील संभाव्य फूट रोखण्यासाठी आणि खासदारांना रोखण्यासाठी ठाकरे गटाकडून मोठी कायदेशीर खेळी खेळण्यात आली आहे.

Operation Tiger

Operation Tiger

मुंबई तक

18 Jun 2026 (अपडेटेड: 18 Jun 2026, 01:10 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

बंडखोरांना इंगा दाखवण्यासाठी ठाकरेंचं पहिलं पाऊल

point

दिल्लीत मोठ्या घडामोडी

Operation Tiger : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेत पुन्हा एकदा मोठी फूट पडणारआहे. राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चेनुसार, ठाकरे गटाचे काही खासदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. शिंदे गटात जाणाऱ्या संभाव्य खासदारांमध्ये ओमराजे निंबाळकर, संजय देशमुख, बंडू जाधव, नागेश आष्टीकर, संजय दिना पाटील, भाऊसाहेब वाकचौरे यांच्या नावांची जोरदार चर्चा सुरू आहे. ही संभाव्य फूट टाळण्यासाठी ठाकरे गटाकडून पहिलं पाऊल उचलण्यात आलं आहे.

हे वाचलं का?

खासदारांसमोर पेच

ही संभाव्य फूट रोखण्यासाठी आणि खासदारांना रोखण्यासाठी ठाकरे गटाकडून मोठी कायदेशीर खेळी खेळण्यात आली आहे. ठाकरे गटाने तातडीने एक व्हिप जारी केला असून, सर्व खासदारांसाठी एका महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन केले आहे. या व्हिपमुळे शिंदे गटाच्या वाटेवर असलेल्या खासदारांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. पक्षाचा आदेश डावलून बैठकीला गैरहजर राहिल्यास त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याची रणनीती ठाकरे गटाने आखली आहे.

हे ही वाचा : शिर्डी : 'गद्दाराला साईबाबा किडे पाडून मारतील..' वाकचौरेंच्या बंडखोरीनंतर शिवसैनिक पेटले

काही तासांचाच वेळ

मिळालेल्या माहितीनुसार, जे खासदार या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत, त्यांना आजच कायदेशीर नोटीस बजावण्यात येणार आहे. या नोटिसीद्वारे प्रत्येक खासदाराकडून त्यांच्या अनुपस्थितीबाबत स्पष्टीकरण मागवले जाईल. विशेष म्हणजे, या नोटिसीला उत्तर देण्यासाठी खासदारांना अतिशय कमी अवधी दिला जाणार आहे. दिलेल्या वेळेत समाधानकारक उत्तर न मिळाल्यास, पक्षाकडून संबंधित खासदारांवर तात्काळ पुढील कायदेशीर आणि अपात्रतेची कारवाई केली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

हे ही वाचा : Om RajeNimbalkar यांची बंडखोरी.. निष्ठेचा प्रश्न विचारताच ठाकरेंचे नगरसेवक काय म्हणाले?

पुढं काय घडणार?

दरम्यान, या संपूर्ण घडामोडींवर संबंधित खासदारांकडून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी कालच संजय राऊत यांच्यासोबत पत्रकार परिषदेत हजेरी लावून आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबतच एकनिष्ठ असल्याचा पुनरुच्चार केला आहे. दुसरीकडे, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी 20 जूननंतर आपण आपली भूमिका मांडणार असल्याचे सांगितले आहे. यासोबतच बंडखोर खासदारांनी आपल्या स्वतंत्र गटाला मान्यता मिळावी यासाठीचे पत्र कालच लोकसभा अध्यक्षांना दिल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे येत्या काही तासांत हा वाद काय वळण घेतो आणि किती खासदार पक्षात टिकून राहतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.