Om RajeNimbalkar यांची बंडखोरी.. निष्ठेचा प्रश्न विचारताच ठाकरेंचे नगरसेवक काय म्हणाले?
omraje nimbalkar : धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू असताना, स्थानिक नगरसेवकांनी विकासाच्या मुद्द्यावर सावध भूमिका घेत त्यांच्या पाठीशी राहण्याचे संकेत दिले आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
Om RajeNimbalkar यांची बंडखोरी..
निष्ठेचा प्रश्न विचारताच ठाकरेंचे नगरसेवक काय म्हणाले?
omraje nimbalkar : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या मोठी उलथापालत पाहायला मिळत असून, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर हे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. या संभाव्य पक्षप्रवेशाच्या पार्श्वभूमीवर धाराशिवमधील स्थानिक राजकारणातही खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया देताना स्थानिक नगरसेवकांनी अद्याप कोणतीही अधिकृत चर्चा झालेली नसल्याचे सांगितले असले, तरी खासदार निंबाळकर जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, असे स्पष्ट संकेत दिले आहेत. राजकारणात निष्ठा आणि विकास या दोन गोष्टींच्या संघर्षात अनेकदा कठीण निर्णय घ्यावे लागतात, असे या नगरसेवकांचे मत आहे.
हेही वाचा : शिर्डी : 'गद्दाराला साईबाबा किडे पाडून मारतील..' वाकचौरेंच्या बंडखोरीनंतर शिवसैनिक पेटले
"राजकीय निर्णय आमच्यासाठी स्वीकारार्ह"
स्थानिक लोकप्रतिनिधींच्या मते, राजकारणात केवळ निष्ठा जपत राहण्यापेक्षा जनतेची कामे मार्गी लागणे अधिक महत्त्वाचे असते. सत्तेत नसताना विकासकामांमध्ये येणारे अडथळे दूर करण्यासाठी आणि जिल्ह्याचा तसेच शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी लोकप्रतिनिधींना अनेकदा मनावर दगड ठेवून पक्ष बदलण्यासारखे कठीण निर्णय घ्यावे लागतात. ओमराजे निंबाळकर हे आमचे नेते आहेत आणि त्यांचा कोणताही राजकीय निर्णय आमच्यासाठी स्वीकारार्ह असेल, असे मत नगरसेवकांनी व्यक्त केले आहे. विकासाच्या धोरणांना प्राधान्य देणे ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा : गोड बोलून प्रेयसीला नेलं अन्..., रेल्वेच्या तिकीटावरुन हत्येचा उलगडा









