ठाकरेंची साथ सोडल्यानंतर संजय जाधवांची पहिली पोस्ट, फेसबुकचं कमेंट सेक्शन बंद

मुंबई तक

• 02:04 PM • 19 Jun 2026

Sanjay Jadhav : ठाकरेंची साथ सोडल्यानंतर परभणीचे खासदार संजय जाधव यांनी पहिली फेसबुक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी काय म्हटलंय? जाणून घेऊयात....

Sanjay Jadhav

Sanjay Jadhav

Google CTA

बातम्या हायलाइट

point

ठाकरेंची साथ सोडल्यानंतर संजय जाधवांची पहिली पोस्ट

point

फेसबुकचं कमेंट सेक्शन बंद

Sanjay Jadhav : ठाकरेंची साथ सोडल्यानंतर परभणीचे खासदार संजय जाधव यांनी पहिल्यांदा फेसबुक पोस्ट केलीये. या पोस्टमधून उद्धव ठाकरेंचा फोटो गायब झाला असून केवळ बाळासाहेब ठाकरेंचा फोटो ठेवण्यात आलाय. 'अखंड शिवसेना आणि अटळ हिंदूत्व', असं या पोस्टमधून त्यांनी म्हटलंय. शिवसेनेच्या वर्धापनादिनाच्या निमित्ताने त्यांनी ही खास पोस्ट केलीये. संजय जाधव हे महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांचा पराभव करुन खासदार झाले होते. मात्र, निवडून आल्यानंतर केवळ दोन वर्षांनी त्यांनी भूमिका बदल्याचा निर्णय घेतलाय. दरम्यान, खासदार ओमराजेंचं फेसबुकवर झालेलं ट्रोलिंग पाहता जाधव यांनी सावध भूमिका घेतली आहे. त्यांनी फेसबुकचं कमेंट सेक्शन बंद करुन ठेवलं आहे. 

हे वाचलं का?

हेही वाचा : ‘किमान आदित्य ठाकरेंनी तरी...’, फुटलेले ओमराजे निंबाळकर काय म्हणाले?

ठाकरेंच्या शिवसेनेतून फुटलेल्या खासदारांची नावे 

1. ओमराजे निंबाळकर 

2. संजय जाधव 

3. संजय देशमुख

4. नागेश पाटील आष्टीकर

5.संजय दिना पाटील 

6. भाऊसाहेब वाकचौरे 

ठाकरेंसोबत राहिलेले खासदार 

1. अरविंद सावंत

2. राजाभाऊ वाजे

3. अनिल देसाई 

हेही वाचा : ठाकरेंची साथ सोडल्यानंतर ओमराजेंची पहिली प्रतिक्रिया, पक्षांतराची कारणे सांगितली!

दुसरीकडे, या बंडामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मोठा फटका बसला आहे. सहा खासदारांनी साथ सोडल्यानंतर लोकसभेत पक्षाकडे केवळ तीन खासदार उरले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची राजकीय पकड कमकुवत होण्याची शक्यता आहे. तसेच विरोधी आघाडी असलेल्या महाविकास आघाडीच्या (MVA) ताकदीवरही याचा परिणाम होऊ शकतो.

या घडामोडींचा तिसरा मोठा परिणाम महाराष्ट्रातील सत्तेच्या राजकारणावर दिसून येऊ शकतो. लोकसभेतील संख्याबळ वाढल्यानंतर एकनाथ शिंदे यांची भाजपसमोरची राजकीय बार्गेनिंग पॉवर वाढणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तुलनेत शिंदे यांचा राजकीय दावा अधिक बळकट झाल्याचे मानले जात आहे.

शिंदे गटाला मिळू शकतात मोठे राजकीय लाभ

राजकीय विश्लेषकांच्या मते, या यशस्वी राजकीय रणनीतीचा फायदा शिंदे गटाला आगामी काळात केंद्र आणि राज्य या दोन्ही स्तरांवर मिळू शकतो. पुढील केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाला एखादे महत्त्वाचे खाते मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याशिवाय महाराष्ट्र सरकारमध्येही शिंदे गटाला अधिक प्रभावशाली विभाग मिळण्याच्या अपेक्षा वाढल्या आहेत.