6 खासदार फुटल्यानंतर आदित्य ठाकरे संतापले, काय म्हणाले?

मुंबई तक

19 Jun 2026 (अपडेटेड: 19 Jun 2026, 03:19 PM)

Aaditya Thackeray : ठाकरेंच्या शिवसेनेचे सहा खासदार फुटल्यानंतर आमदार आदित्य ठाकरे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. ते काय म्हणाले? जाणून घेऊयात...

Aaditya Thackeray

Aaditya Thackeray

Google CTA

बातम्या हायलाइट

point

'एहसान फरामोश, विकाऊ अन् सडक्या वृत्तीचे'

point

6 खासदार फुटल्यानंतर आदित्य ठाकरे संतापले

Aaditya Thackeray : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या तीन दिवसांत मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सहा लोकसभा खासदार फुटले आहेत. फुटलेले खासदार एकनाथ शिंदे गटात सामील होणार असल्याचे बोलले जात आहे. या घडामोडीमुळे उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांच्या राजकीय ताकदीत मोठी वाढ झाली असून, उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : ठाकरेंची साथ सोडल्यानंतर ओमराजेंची पहिली प्रतिक्रिया, पक्षांतराची कारणे सांगितली!

एनडीएमधील शिंदे यांचे राजकीय वजन वाढणार 

या राजकीय घडामोडीचा पहिला मोठा परिणाम राष्ट्रीय राजकारणावर झाला आहे. सहा खासदार शिंदे गटात दाखल झाल्यास लोकसभेतील त्यांच्या पक्षाची संख्या वाढणार आहे. त्यामुळे एनडीएमधील शिंदे यांचे राजकीय वजन आणि प्रभाव अधिक मजबूत होणार आहे. तसेच केंद्र सरकारची सहयोगी पक्षांवर, विशेषतः Telugu Desam Party (टीडीपी) आणि Janata Dal (United) (जेडीयू) यांसारख्या पक्षांवरील अवलंबित्व काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, खासदार फुटल्यानंतर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी X या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते काय म्हणाले? जाणून घेऊयात....

हेही वाचा : 'तुमच्या मतदारसंघात जाऊन दाखवा..', संजय राऊतांनी फुटीर खासदारांना दम भरला

आदित्य ठाकरे यांची पोस्ट जशीच्या तशी

"आज आपला ६० वा वर्धापन दिन! पुन्हा एकदा आपण घाणेरड्या राजकारणाचे विदारक उदाहरण पाहत आहोत. एहसान फरामोश आणि विकाऊ अशा सडक्या वृत्तीचे हे काही ठराविक व्यक्ती २०२४ मध्ये ज्यांच्यामुळे जिंकून आले, त्यांनाच दगा देत आहेत!  कितीही कारणे द्या...सत्य एकच आहे. तुम्ही स्वतःला निर्लज्जपणे विकले आहे. स्वतःला तर विकलेच, पण त्यासोबत तुमची प्रतिष्ठा, तुमचे नाव आणि तुमच्या कुटुंबाचे नावही पणाला लावले आहे. महाराष्ट्र हे घाणेरडे राजकारण सहन करणार नाही… मुळीच नाही! ह्या काळोखात प्रकाश देणार ती फक्त आणि फक्त आपली मशाल!",  असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय.