मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना युतीने आज (3 जानेवारी) संयुक्त सभा घेत प्रचाराला सुरुवात केली. सध्या मुंबईचा महापौर मराठी होणार की अमराठी होणार.. यावर बरीच चर्चा रंगली आहे. अशावेळी आजच्या सभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याच मुद्द्यावर बोलताना ठाकरे बंधूंना डिवचलं आहे.
ADVERTISEMENT
वारिस पठाण म्हणाले की, 'बुरखेवाली मेयर बनेगी...' याचा उल्लेख करत फडणवीसांनी शिवसेना UBT आणि मनसेच्या युतीला डिवचलं आहे. यावर ते का काही बोलत नाही असा सवाल त्यांनी या दोन्ही पक्षांना यावेळी केला आहे.
'आम्हाला वाटलं आता मराठी माणसाबद्दल बोलणारे तुटून पडतील...', CM फडणवीसांचं ठाकरेंना आव्हान.. पाहा काय म्हणाले
'पण परवा वारिस पठाण बोलून गेले 'बुरखेवाली मेयर बनेगी...' आम्हाला वाटलं आता मराठी माणसाबद्दल बोलणारे तुटून पडतील. पण मला समजलंच नाही.. अचानक भोंग्याचे सेल डाऊन झाले.. सकाळचा भोंगा बोलेनाच.. विचारलं तर तोंडातून शब्दच निघेना. एक जण यांच्यातला बोलायला तयार नाही. हे त्याचं उत्तर देण्याकरिता तयार नाही. आता आम्हालाच त्यांना चार्ज करावं लागेल तर कदाचित या भोंग्यातून आवाज निघतील. म्हणून त्यांच्या छातीवर उभा राहून सांगतो की, या ठिकाणी महापौर हिंदूच बनेल. या ठिकाणी महापौर मराठीच बनेल..', असं म्हणत फडणवीसांनी पुन्हा एकदा ठाकरे बंधूंना चँलेंज दिलं आहे.
हे ही वाचा>> मुंबई Tak महाचावडी: अमराठी Vote Bank असताना BJP मुंबईचं मराठीपण टिकवू शकेल का? पाहा CM फडणवीसांचं उत्तर काय
पाहा आजच्या सभेत देवेंद्र फडणवीस नेमकं काय-काय म्हणाले..
'शिंदे साहेब तुम्ही यांचं कॅम्पेन बघितलं मला तर आता लक्षात आलंय की, मुंबईत निवडणुकीमध्ये श्रेय चोरणारी टोळी सक्रीय झाली आहे. या टोळीमध्ये काही अबोध बालकं देखील आहेत. जे श्रेय चोरण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणतात सगळं आम्हीच केलं. त्याठिकाणी कोस्टल रोड आम्हीच केला, मेट्रोही आम्हीच केली.'
'पर ये पब्लिक है.. ये सब जानती है.. अरे अर्ध्या रात्रीतही मुंबईकरांना उठवून विचारलं कोस्टल रोड कोणी केला, बीडीडीचं काम कोणी केलं, मेट्रोचं काम कोणी केलं.. अर्ध्या रात्रीत मुंबईकर सांगतील हे महायुतीने केलं.'
'अर्ध्या रात्रीतून त्यांना हे पण विचारलं की, प्रत्येक कामात खोडा कोणी घातला, प्रत्येक कामाला स्थगिती कोणी दिली. ते एकच नाव घेतील की, माननीय उद्धवजी ठाकरे.. ते आपलंच नाव घेतील.'
हे ही वाचा>> 'मी देवेंद्रजींना सांगितलं म्हणून मागचा महापौर...', मुंबईच्या महापौराबाबत एकनाथ शिंदेंचा अत्यंत मोठा गौप्यस्फोट
'मुंबईचा महापौर कोण होणार असा मुद्दाही आला.. मी परवाच स्पष्ट सांगितलं. मुंबईचा महायुतीचाच होणार, मुंबईचा महापौर हिंदूच होणार, मुंबईचा महापौर मराठीच होणार.'
'पण परवा वारिस पठाण बोलून गेले 'बुरखेवाली मेयर बनेगी...' आम्हाला वाटलं आता मराठी माणसाबद्दल बोलणारे तुटून पडतील. पण मला समजलंच नाही.. अचानक भोंग्याचे सेल डाऊन झाले.. सकाळचा भोंगा बोलेनाच.. विचारलं तर तोंडातून शब्दच निघेना. एक जण यांच्यातला बोलायला तयार नाही. हे त्याचं उत्तर देण्याकरिता तयार नाही. आता आम्हालाच त्यांना चार्ज करावं लागेल तर कदाचित या भोंग्यातून आवाज निघतील. म्हणून त्यांच्या छातीवर उभा राहून सांगतो की, या ठिकाणी महापौर हिंदूच बनेल. या ठिकाणी महापौर मराठीच बनेल..'
'आमचं कुठल्या धर्माशी वैर नाही. आमचा विरोध त्या ताकदीला आहे जी ताकद या महाराष्ट्रात, या हिंदुस्थानच्या भूमीमध्ये वंदे मातरम् म्हणायला नकार देते त्यांच्याविरुद्ध आम्ही आहोत.'
'ज्यावेळी त्या माहीमच्या दर्ग्यावर मला बोलावलं, मला सांगितलं की, भारताचा तिरंगा या माहीमच्या दर्ग्यावर फडकविण्याकरिता तुम्हाला बोलावतोय. त्यावेळेस मुख्यमंत्री म्हणून हा देवा भाऊ त्या ठिकाणी गेला आणि त्या माहीमच्या दर्ग्यावर चादर चढवली आणि तिरंगा झेंडा फडकवला.'
'या भारतात कोणाशी दुश्मनी नाही. पण ज्याची भारताशी दुश्मनी आहे त्याला मात्र सोडणार नाही.' असं मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.
ADVERTISEMENT











