Devendra Fadnavis on NCP Finance portfolio : अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर राज्याचे अर्थखाते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याकडे ठेवले होते. हे राष्ट्रवादीला परत देण्यात येणार की नाही? याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलंय. ते मुंबई तक बैठकमध्ये बोलत होते.
ADVERTISEMENT
राष्ट्रवादीच्या अर्थखात्याच्या ्मागणीबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, सध्यातरी अर्थखाते माझ्याकडे आहे. पुढे कोणाला द्यायचे यासंदर्भात माझ्या पक्षश्रेष्ठींशी चर्चा करेन. त्यांच्या मार्गदर्शनानुसार पुढील निर्णय घेईल.
ऑपरेशन टायगरमध्ये भाजपचा किती सहभाग होता?
पहिल्यांदा तर अशा प्रकारचे ऑपरेशन होतात. त्यात काय घडलं? कसं केलं? या गोष्टी सांगायच्या नसतात. आमच्या मित्र पक्षांनी ते ऑपरेशन केलं. त्यांना आमचा योग्य तो पाठिंबा होता. त्यांना जी आवश्यकता म्हणून आम्ही ती मदत त्यांना केली. याबाबत अधिक सांगणे सुज्ञ राजकारणी व्यक्तीला योग्य नाही, असंही देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केलं.
90 टक्के विरोधी लोकांना काहीना काही पैसे दिले- फडणवीसांचे निधीबाबत स्पष्टीकरण
पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, आम्ही बजेट मांडतो. बजेटमध्ये पीडब्लू विभाग जो आहे..विरोधी पक्षांच्या 90 टक्के लोकांना आम्ही काहीना काही पैसे दिले आहेत. कदाचित आमच्याकडील लोकांना जास्त मिळाले आहेत. सत्ताधारीही असतील ज्यांना कमी मिळाले असतील. कोणाचे प्रोजेक्ट असतात. यावरही अशा गोष्टी निर्भर असतात. एकूणच आपण बघितलं तर 2.5 वर्ष सातत्याने आम्ही आमच्या लोकांना घेऊन भांडत राहिलो. 15 वर्ष विरोधी पक्षात होतो. पण आमचे नेते मुंडे साहेब होते. मुंडे साहेबांचं व्यक्तीमत्व होतं. ते आमच्याशी ज्या प्रकारे वागायचे. त्यांचा सभागृहात प्रेझेंस होता. आम्हाला वाटायचो. आम्ही विरोधात असलो तरी आमच्या नेत्यात ताकद आहे. नेत्याने त्यांच्या लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे. तो आत्मविश्वास निर्माण होत नाही., त्यावेळेस पक्ष संपत असतो. निधी महत्त्वाचा आहे. पण तो सेकंडरी विषय आहे.
ADVERTISEMENT











