"...त्यावेळी मी भाजपसोबत नसेल", छगन भुजबळ यांचं मोठं वक्तव्य

Chhagan Bhujbal on BJP : 'शाहू,फुले,आंबेडकरांच्या विचारांचे पुढे काय होणार? ' या विषयावर छगन भुजबळ यांनी मुंबई Tak बैठकीत चर्चा केली. यावेळी ते बोलत होते.

 Chhagan Bhujbal on BJP

Chhagan Bhujbal on BJP

मुंबई तक

01 Jul 2026 (अपडेटेड: 01 Jul 2026, 05:36 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

"..त्यावेळी मी भाजपसोबत नसेल"

point

छगन भुजबळ यांचं मोठं वक्तव्य

Chhagan Bhujbal on BJP : "ज्यावेळी सरकारमध्ये राहून भाजप दलित, आदिवासी इतर मागासवर्गीयांच्या विरोधात काम करतील. त्यांच्या उद्धारासाठी काम करणार नाहीत. त्यांच्या शिक्षणामध्ये अखडता हात घेतील. किंवा विरोधाला उतरतील..,त्यावेळेला मी तिथे (भाजपसोबत)  नसेल", असं अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ म्हणाले. 'शाहू,फुले,आंबेडकरांच्या विचारांचे पुढे काय होणार? ' या विषयावर छगन भुजबळ यांनी मुंबई Tak बैठकीत चर्चा केली. यावेळी ते बोलत होते. 

हे वाचलं का?

'सरकार सर्व समाजांना सोबत घेऊन जात आहे'

छगन भुजबळ म्हणाले, मराठा समाजासाठी सारथी, दलित समाजासाठी बार्टी संस्था स्थापन झाल्या. त्यांना सरकारने फंड दिला. ओबीसींना स्कॉलरशिप दिली. अशा सर्व गोष्टी ते करत आहेत. भिडे वाड्यासाठी 23 वर्ष मी लढत होतो. त्याला आता निधी मंजूर झालाय.. सरकारमध्ये असं आढळलं नाही की, ते एकाच समाजाच्या बाजून आहेत. ते सर्व समाजांना सोबत घेऊन जात आहेत. महात्मा फुले ब्राम्हणांचे विरोधी असल्याचा प्रचार केला गेला. त्यांच्यासोबत त्यांचे अनेक ब्राम्हण मित्र होते. 

'पुलोदच्या सरकारमध्ये वेगवेगळ्या विचारांचे लोक होते'

पुढे बोलताना छगन भुजबळ म्हणाले, समतेच्या विचाराला विरोध करणारे त्यावेळी देखील होते. 140 कोटी लोक आहेत. सर्वजण बदलेले नाहीत. मीडिया याबाबत सारखं बोलतो. आंतरजातीय विवाह वाढलेले आहेत. महात्मा फुलेंनी जे केले, ते आंबेडकरांनी कायद्यात आणलं. त्या पद्धतीनेच कारभार सुरु आहे. शरद पवारांनी पुलोदचं सरकार स्थापन केलं. त्यामध्ये सगळ्या विचारांचे लोकं होतं. वेगवेगळ्या विचारांचे लोक एकत्र आले हे पहिल्यांदाच घडतंय असं नाही. यापूर्व देखील घडलेलं आहे. आम्हाला वाटलं की, त्या फुले-शाहू-आंबेडकरांच्या मार्गावर चालण्यात अडचणी येतील, तेव्हा आम्ही देखील विचार करु. 

काही लोकांच्या मनात जातीवाद भरवला जातो. मात्र, हळूहळू देखील कमी होईल. आपण लहान पणापासून वेगवेगळ्या जातींच्या आश्रम शाळा बांधतो. मला वाटतं त्यांना एकत्र बसवलं पाहिजे., पवार साहेबांनी देखील हा विचार मांडला होता. सर्वजण एकत्रित बसले पाहिजे. काही प्रमाणात ते झालं. महात्मा फुलेंच्या वाड्यात असलेल्या वडाच्या झाडाला फेऱ्या फारुन वट-सावित्री पौर्णिमा साजरी करतात, अशी खंतही भुजबळ यांनी व्यक्त केली. 

समाजात सगळेच लोकं फुले-शाहू आंबेडकरांच्या विचारानेच चालतात, असं मी म्हणत नाही. दुसऱ्याही विचारांचे लोक आहेत.  वाजपायी साहेबांनी म्हटलं होतं जो इतिहास विसरला त्याला भविष्य नाही. इतिहास लोकांसमोर गेला पाहिजे. तो छत्रपती शिवाजी महाराजांचा असेल महापुरुषांचा असेल.. भाऊराव पाटलांपासून नंतरच्या काळातील अनेक समाजसुधारक  फुले-शाहू आंबेडकरांच्या विचाराने प्रेरीत होते, असंही भुजबळ यांनी सांगितलं. 

इतरांचं काय चाललंय यापेक्षा  हे सांगतो आम्ही फुले-शाहू आंबेडकरांच्या मार्गाने जाणार आहोत. पुढे या विचारांमध्ये सुधारणाच होणार आहे. दलित-आदिवासी आणि मागासवर्गीयांच्या शिक्षणाच्या मार्गात सरकारने हात आखडता घेतला तर मी त्यावेळी भाजपसोबत नसेल.. फुले-शाहू आंबेडकरांचा विचार जपण्यासाठी संघर्ष करावा लागला तरी मागे पुढे पाहाणार नाही. हा विचार जपण्याचे काम एकाचे काम नाही. हे माध्यम, शैक्षणिक अशा सर्व क्षेत्रातील लोकांचे काम आहे. ती एकट्याचीच लढाई नाही, असंही छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं.